Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

DIO लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी २३, २०१९

नागपूर मनपाच्या शाळा होणार डिजीटल

नागपूर मनपाच्या शाळा होणार डिजीटल

शिक्षण समितीच्या प्रस्तावाला पालकमंत्र्यांची मंजुरी

नागपूर/प्रातिनिधी:

नागपूर महानगरपालिकेच्या शाळा आता डिजीटल होणार आहेत. महापालिकेच्या १५० शाळांचे वर्ग आता डिजीटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण समितीतर्फे शाळा डिजीटल करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. या कामासाठी सहा कोटी रूपयांचा निधी देखील शासनाच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली. शुक्रवारी (ता.२२) मनपा मुख्यालयात शिक्षण समितीची बैठक आयोजित कऱण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपसभापती भारती बुंदे, सदस्य रिता मुळे, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मंथरानी, मनोजकुमार गावंडे, मो .इब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर बैठकीत मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बूट व मोजे देण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावही पारीत करण्यात आला. बनातवाला शाळेसाठी मनपाने चार कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते लवकरच करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 
पुढे बोलताना समिती सभापती प्रा.दिवे म्हणाले, यावर्षी विद्यार्थ्यांना गणवेशासह स्वेटर पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्यासाठी देखिल प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सायकल बॅंक योजनेअंतर्गत दुरून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. प्रारंभी शिक्षण समिती सभापती प्रा.दिवे यांनी शाळा निरिक्षकाकडून स्वेटर वाटप केल्याबाबत शाळानिहाय आढावा घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ५ ते १० वर्गात सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शासनाच्या निर्णयानुसार नागरी भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्याबाबत विचार करण्यात यावा, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्देशानुसार व अध्यादेशानुसार त्याची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले.

 पुढील शैक्षणिक वर्षात घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रस्ताव समितीपुढे सादर केला. त्यावर बोलताना समिती सभापती यांनी लवकरच या प्रस्तावावर विचार करण्यात येईल, असे सांगितले.

शनिवार, जानेवारी २६, २०१९

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ जाहीर

दिल्ली/वृत्तसंस्था:

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र शासनाने आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्ररत्न नानाजी ठरले भारतरत्न
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी ११ ऑक्टोबर १९१६ मध्ये नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगिण विकास होऊ शकतो या विचाला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नितकालिकांचे जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले. देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहीले आहे. गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पध्दतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य,आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्त्वपूर्ण कार्य नानाजींनी केले. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय योगदानाची दखल
प्रसिध्द अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. पश्चिम बंगाल मध्ये ते भारत देशाचे १३ वे राष्ट्रपती ठरले. ११ डिसेंबर १९३५ मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे ६ दशकांच्या सक्रिय राजकारणात लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले. केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्रव्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री आदी पद त्यांनी भुषविली आहेत. भारतदेशाचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती म्हणून त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कार्य केले. 
भूपेन हजारिकांच्या अविट व अमिट सुरांचा सर्वोच्च सन्मान
प्रसिध्द गायक व संगितकार भूपेन हजारिका यांच्या अविट व अमिट सुरांची दखल घेवून त्यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. आसाममध्ये ८ डिसेंबर १९२६ जन्मलेले हजारिका यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून आसमी भाषेत गायनास सुरुवात केली. कलकत्त्यात वयाच्या दहाव्यावर्षीच त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिले गाणे लिहीले. बंगाली गीतांना हिंदीत अनुवादीत करून स्वर देत असत. रूदाली, मिलगयी मंजील मुझे, साज, दरमिया, गजगामिनी, दमन आणि क्यों या सुपरहीट चित्रपटांचे गीत लिहीले. हजारिका यांनी एकूण १ हजार गीत रचणा केल्या व एकूण १५ पुस्तके लिहिली. 

महाराष्ट्राला ११ पद्म पुरस्कार

महाराष्ट्राला ११ पद्म पुरस्कार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
दिल्ली/वृत्तसंस्था:
सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, प्रसिध्द अशोक कुकडे यांना पद्म भूषण तर प्रसिध्द नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, गायक शंकर महादेवन, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र व स्मिता कोल्हे यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

दरवर्षी गणराज्य दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी पद्म विभूषण पुरस्कार ४ मान्यवरांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना कला व नाट्य क्षेत्रातातील उल्लेखनीय योगदानासाठी तर अनिल कुमार नाईक यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र व स्मिता कोल्हे या दाम्पत्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये कला व नाटय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक व प्रसिध्द नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे तसेच कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द कलावंत मनोज बाजपेयी या मान्यवरांचा समावेश आहे. याशिवाय कला गायन व चित्रपटातील योगदानासाठी प्रसिध्द गायक शंकर महादेवन, आरोग्य क्षेत्रासाठी सुदान काटे, कला व नाट्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिनयार कॉन्ट्रॅक्टर,साहित्य-शिक्षण व पत्रकारितेतील योगदानासाठी नगीनदास संगवी, सामाजिक कार्य व प्राण्यांसाठी उत्कृष्ट कार्य करणारे शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

यावर्षी एकूण ११२ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ४ पद्म विभूषण, १४ पद्म भूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यात २१ माहिला तर ११ हे अप्रवासी भारतीय, परदेशी नागरिक आहेत. ३ मान्यवरांना मरणोत्तर तर एका तृतीय पंथीय व्यक्तीस पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

बुधवार, जानेवारी १६, २०१९

विश्वास नांगरे पाटील यांना ऐकण्यासाठी तरुणांची तुफान गर्दी

एकलव्याच्या भूमीतून अर्जुनाचे विक्रम मोडीत निघतील:सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरच्या वाघांनो! नियोजन करा आणि स्पर्धा परीक्षेच्या युद्धाला सज्ज व्हा!!
चांदा क्लबवर हजारोंच्या उपस्थितीला विश्वास नांगरे पाटील यांनी दिले यशाचे गुरुमंत्र
चांदा क्लब ग्राउंडवर हजारोंच्या उपस्थितीत मिशन सेवा या उपक्रमाचा शानदार शुभारंभ
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 जेव्‍हा ब्रिटीश सरकारला भारत छोडोचा इशारा देण्‍यात आला त्‍या आंदोलनात लक्षणीय सहभाग देणारा चंद्रपूर जिल्‍हाच होता. 1942 मध्‍ये वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या प्रेरणेने क्रांतीज्‍योत प्रज्‍वलीत करणारा चंद्रपूर जिल्‍हाच होता. मिशन शौर्यच्‍या माध्‍यमातून चंद्रपूर जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यानी माऊंट एव्‍हरेस्‍टवर चंद्रपूर जिल्‍हयाचा झेंडा फडकविला. आता स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये अव्‍वल ठरणा-या विद्यार्थ्‍यांमध्‍ये चंद्रपूर जिल्‍हयातील विद्यार्थ्‍यांचे प्रमाण लक्षणीय राहावे यादृष्‍टीने मिशन सेवा यशस्‍वी करण्‍याचे आवाहन राज्‍याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तर यशाचा संकल्प करून चंद्रपूरच्या वाघांनो स्पर्धा परीक्षेच्या युद्धाला सज्ज व्हा, असे आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिशन सेवा स्पर्धा महोत्सवाचे आज आयोजन केले होते. जिल्हाभरातील शाळा-कॉलेजच्या युवकांचा हजारोचा समुदाय या महोत्सवासाठी आला होता. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा महाराष्ट्रातील तरुणाईचे स्पर्धा परीक्षांसाठी आयकॉन असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या व महाराष्ट्रातील अन्य वक्त्यांच्या स्पर्धा परिक्षेवरील प्रेरणादायी व्याख्यानासाठी ही हजारोंची गर्दी जमली होती.

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा या उपक्रमामागील भूमीका विशद केली. ते पुढे म्‍हणाले, चंद्रपूर ही पराक्रमाची भूमी आहे. या ठिकाणी पराक्रमाचा इतिहास आहे. त्यामुळेच यापूर्वी या जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी मिशन शौर्य अंतर्गत विमानाच्या उंचीएवढ्या एव्हरेस्टवर चंद्रपूरसह महाराष्ट्राचा झेंडा व भारताचा झेंडा फडकवला. चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक गुणवान तयार झाले आहेत. मात्र ही संख्या वाढविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात वाचनालय तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन शक्ती अभियानाचीही माहिती दिली. निवडक सहा क्रीडाप्रकारांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी सिद्ध करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी देखील यासाठी चंद्रपूर मध्ये येणार असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले. ते म्हणाले की, ही भूमी एकलव्याची आहे. या ठिकाणी फक्त मार्गदर्शन करणा-या द्रोणाचार्यांची गरज आहे. त्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहे. त्यांच्या वाणीतून, विचारातून युवकांनी प्रेरित होऊन स्पर्धा परीक्षेचा गड जिंकावा. यशासाठी पूर्ण ताकतीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायची असेल त्यासाठी राज्याचा वित्त मंत्री म्हणून पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी आश्वासन दिले. आपण कायम माझ्या पाठीशी उभे असल्याच्या घोषणा देतात. परंतु या स्पर्धा परीक्षेच्या गड जिंकण्यासाठी मी आपल्या पाठीशी असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

यावेळी आपल्या हृदयस्पर्शी भाषणाने विश्वास नांगरे पाटील यांनी लोकांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्‍यांशी संवाद साधताना कोल्‍हापूरचे पोलिस उपमहानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील म्‍हणाले, उत्तुंग गुणवत्ता असतानादेखील साध्या सुविधा नसल्यामुळे अनेकांचे करिअर धोक्यात येते. अशावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षारुपी वाघिणीचे दुध तुमच्यासाठी उपलब्ध केले आहे. त्यामुळे योग्य नियोजन करा, कठोर परिश्रमाची त्याला साथ द्या आणि यशाचा संकल्प करून चंद्रपूरच्या वाघांनो स्पर्धा परीक्षेच्या युद्धाला सज्ज व्हा, असे आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केले. 

विश्वास नागरे पाटील यांनी नाविन्याचा ध्यास, गरीब वंचितांसाठी काम करण्याची पोटतिटिकीने आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या युवकांचा कायापालट करण्यासाठी ना. मुनगंटीवार यांनी मिशन सेवा सारख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. असा आधार कुणी दिला असता तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुखसुविधा नाही म्हणून ज्या दुर्घटना घडल्या त्या घडल्या नसत्या. 

त्यांनी यावेळी आपल्या स्पर्धा परीक्षाच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या गावात झाली असल्याचे सांगितले. चंद्रपूरच्या बछड्यांना स्पर्धा परीक्षा रुपी वाघिणीचे दुध ना.मुनगंटीवार देत आहेत. ही रानफुलांची भूमी आहे, या ठिकाणी विपरीत परिस्थितीत काहीतरी भव्यदिव्य करण्याची पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणची मुले यश मिळवतील. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी यशाची सूत्र सांगताना स्पष्ट केले की, काय करायचे? कसे करायचे? किती वेळेत करायचे? कोणते साहित्य घेऊन करायचे? याचे काटेकोर नियोजन मनात करणे गरजेचे आहे. आज मी यशस्वी आहे. मात्र दहावीमध्ये असताना सकाळी तीन वाजता उठून, थंड पाण्याने आंघोळ करून अभ्यासाला सुरुवात केली. आठवडाभर त्रास झाला. मात्र त्यानंतर पहाटेचे वाचलेले डोक्यात कायम बसण्याची ही वेळ झाली. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी जिल्ह्यामध्ये एक रचनात्मक आणि होकारात्मक वातावरण ना.सुधीर मुनगंटीवार यांनी निर्माण केले असून आता स्पर्धा परीक्षांसाठी आपण सज्ज व्हावे, असे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, रुलर रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे, सीजीएसटी मुंबईचे सहाय्यक आयुक्त राहुल गावंडे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन ईटनकर,अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपवनसंरक्षक गजेंद्र अहिरे,बांबू संशोधन परीक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपमहापौर अनील फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची उपस्थिती होती. 
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांनी देखील संबोधित केले. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी किमान दोन वर्षाची पूर्वतयारी आवश्यक आहे. हा वर्ष जुन्या प्रश्नपत्रिका चाळून घेणे खूप आवश्‍यक असून शासकीय पुस्तकांचे वाचन यामध्ये महत्त्वाचे ठरते. इंग्रजी वर्तमानपत्र व मराठी वर्तमानपत्र दोन्हीही वर्तमानपत्रांचे वाचन या परीक्षांसाठी आवश्यक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सहाय्यक आयुक्त राहुल गावंडे हे मूळचे नागभीड तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याचे असून ते सध्या केंद्रीय जीएसटी विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा युपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतो. मात्र हे स्वप्न उराशी बाळगतांना टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. एक पुस्तक अनेकवेळा वाचण्याची व गतीने वाचण्याची सवय लावावी असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. चंद्रपूर जिल्ह्यातून 70 वर्षांमध्ये आपण 70 देखील अधिकारी देऊ शकलो नाही. त्यामुळे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या मोहिमेचा लाभ घेऊन आता अधिकाधिक अधिकारी आपल्या जिल्ह्यातून तयार व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. 

अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांनी देखील यावेळी संबोधित केले. मोहिते यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही कालावधी गेल्यानंतर समाज व परिवारातून आणखी किती वर्षे तयारी करणार असे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपण एकाग्रचित्ताने आपले मार्गक्रमण करत राहावे, असे स्पष्ट केले. ते म्हणाले आठ ते दहा तास मनापासून जर तुम्ही कष्ट करत असाल तर यश तुम्हाला निश्चित मिळेल. जाहिरातीची वाट बघून तुमचा अभ्यास सुरू झालेला नसतो आणि नसावा त्यामुळे चांगल्या मित्रांची साथ घ्या, ग्रुप डिस्कशन करा जास्तीत जास्त वाचन करा, आत्मचरित्र ललित लेखन वाचा, सामाजिक विषयावरचे पिक्चर बघा, सहलीला जा यातून एक दृष्टी मिळत राहते. या दृष्टीचा आपल्याला सामाजिक, भौगोलिक परिस्थिती समजण्यासाठी मदत होते. ज्यांना परीक्षेमधून नोकरी लागेल त्यांनी मात्र मित्र आपल्या सोबत परीक्षेची तयारी करत होते. त्यांना मार्गदर्शन करा त्यांना आर्थिक दायित्व द्या.

ग्रामीण भागामध्ये ग्रंथालयाचे जाळे निर्माण करणारे रुलर रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अतिआत्मविश्वास नको केवळ आत्मविश्वास ठेवा, मन लावून अभ्यास करा, इतरांच्या चरित्राची, त्यांच्या यशाची, कारण मीमांसा व त्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्या अभ्यासाची गती वाढवून यश मिळविण्याकडे लक्ष द्या असे त्यांनी सांगितले स्वतःला स्वतः घडवणे हे स्पर्धा परीक्षा मध्ये सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या मार्गदर्शनानंतर जवळपास एक तास विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे देखील स्वतः सहभागी झाले होते. जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ग्रंथालयाच्या अभ्यासिकाची वेळ वाढवण्यात यावी, ग्रंथालय निर्माण करण्यात यावे, अशा सूचना झाल्या. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न यावेळी विचारले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार व कल्पना बन्सोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन या कार्यक्रमाच्या संयोजिका पालकमंत्री इंटर्न स्नेहा मेघावत यांनी केले.

सोमवार, जानेवारी १४, २०१९

प्रमाणित वाणाचीच लागवड करा:शेंडे

प्रमाणित वाणाचीच लागवड करा:शेंडे

चंद्रपूर/प्रतिनिधी:

पिकांवर रोंगाचे प्रमाण वाढणे, रोपे बरोबर न येणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून, यासाठी शेतकऱ्यांनी सावध होणे आवश्यक आहे. रोपे लावण्यापूर्वी किंवा लागवडीपूर्वी वाणाची शहानिसा करणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाने प्रमाणित केलेले. नोंदणीकृत वाणाची नागवड करावी, असे आवाहन सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक पी. व्ही. शेंडे यांनी केले. कृषी महोत्सवात धानपिक लागवड या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 

चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्हास्तरीय कृषी व सरस महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काल सोमवारी दुपारी 1 वाजता धानपीक लागवड या विषयावर शेंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्राची निर्मिती केली. चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्र आहे. शेतकऱ्यांनी एकदा तरी या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन पाहणी करावी, पीक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान, अन्य उत्पादन, माती परीक्षण याबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन शेंडे यांनी केले. सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात धानाचे संशोधन केले जाते. आतापर्यंत सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राने धानाचे 15 वाण विकसित केले आहे.
 यापैकी 12 वाण पूर्वप्रसारित असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शेंडे यांनी शास्त्रीय पद्धतीने वाण कसे विकसित केले जाते, याची माहिती शेतकऱ्यांना दिली. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या विविध वाणाची माहिती देत शेतकऱ्यांनी कोणत्या जागेवर कोणते वाण लावले पाहिजे. धानाची लागवड खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, कीटकनाशकचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत शेंडे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

 आज कृषी प्रदर्शनी व सरस महोत्सवाचा समारोप

 गेल्या 11 तारखेपासून चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राउंड वर सुरू असलेल्या जिल्हा कृषी व सरस महोत्सवाचा समारोप उद्या अकरा वाजता होणार आहे. उद्याच्या शेवटच्या दिवसाचा लाभ चंद्रपूरच्या जनतेने घ्यावा ,असे आवाहन आयोजकांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.
DSC08610
उद्या दुपारी 11 वाजता चांदा क्लब ग्राउंड वर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.याशिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य ना.गो. गाणार, विधान परिषद सदस्य अनिल सोले, विधानपरिषद सदस्य रामदास आंबटकर, आमदार विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धानोरकर, आ.संजय धोटे, आ. किर्तिकुमार भांगडिया, जिल्‍हाधिकारी डॉ कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर ,कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती अर्चना जीवतोडे, विभागीय कृषी सहाय्यक रवींद्र भोसले आदींची उपस्थिती या समारोपीय कार्यक्रमाला राहणार आहे. 
चंद्रपूर जनतेने गेल्या पाच दिवस दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर उद्या समारोपीय कार्यक्रमाला व शेवटच्या दिवशी बचत गटाच्या स्टॉलला भेट देण्यासाठी चंद्रपुरातील जनतेने यावे, असे आवाहन चंद्रपूरचे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रकांत वाघमारे तसेच प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

चंद्रपूरच्या १२ शेतकऱ्यांनी साधला मुख्यमंत्र्यांसोबत संवाद

 चंद्रपूर जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने नोकरी सोडून शेतीमध्ये केलेल्या अभिनव प्रयोगाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली आहे. वर्षाला लक्षावधी रुपये कृषी यांत्रिकीच्या साह्याने मिळवत असलेल्या विनोद मारुती कोटकर यांना वाह !छान शेती करता तुम्ही !अशा शब्दात त्यांनी शाब्बासकी दिली.

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी व कृषी संलग्न क्षेत्रातील योजनांचा कशा पद्धतीने लाभ होतो. यासंदर्भात लाभार्थ्यांसोबत आज महासंवाद या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुंबईतील स्टुडिओ मधून संपर्क साधला. जवळपास तीन तास त्यांनी शेतकऱ्यांशी वार्तालाप केला.

आज मुख्यमंत्र्यांशी ज्यांची चर्चा झाली त्यामध्ये उसगाव येथील मंगेश मारुती आसुटकर, चोरगाव येथील पांडुरंग गोपाळ कोकोडे, चारगाव येथील मधुकर चिंधुजी भलमे, दादापूर येथील विनोद मारुती कोटकर, शेगाव येथील पंचफुला सुखदेव गायकवाड, वडगाव येथील विक्रम मारोती भोयर, पाटाळा येथील संदीप मुकुंदराव एकरे, चिरादेवी येथील लक्ष्मण नानाजी वासेकर, चकबापूर येथील गजानन विठोबा काळे, मोहबाडा येथील दत्तू विठ्ठल कापसे, शेगाव येथील सखुबाई मधुकर दोहतरे, वेंडली येथील नंदा शंकर पिंपळशेंडे यांचा समावेश होता.

या वेळी विनोद कोटकर यांनी एका कंपनीतील नोकरी सोडून स्वतःच्या शेतीमध्ये राबायला कशी सुरुवात केली आणि बीएससी एग्रीकल्चर असल्यामुळे त्याच्या ज्ञानाचा त्यांना कसा फायदा झाला, याबाबतची माहिती दिली. श्री. विनोद यांनी शेडनेट हाऊस उभारणी करून त्यामध्ये कारले व काकडी याचे उत्पादन घेतले आहे. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात ते उत्पादन घेतात. सुरुवातीला बैलजोडीवर शेती करणारे विनोद यांनी ट्रॅक्टर घेतल्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला अधिक महत्त्व दिल्यामुळे त्यांची झालेली बरकत व त्यामुळे अन्य शेतकऱ्यांना मिळालेली प्रेरणा याबाबतही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सोबतच दुसरे शेतकरी मधुकर चिंधुजी भलमे यांच्याशी देखील संवाद साधला. भलमे यांनी पांदण रस्ते बनवितांना शेततळ्यातील मुरूम वापरण्यात यावा, त्यामुळे शेततळे खोलीकरण सहज शक्य होईल अशी एक सूचना केली. तसेच प्रत्येक पुलाला पूल कम बंधारा करावा, जेणेकरून पावसाचे पाणी मोठ्या संख्येने कमी खर्चात अडविले जाईल, अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांकडे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकत्रित आलेले सर्व शेतकरी कुठल्या ना कुठल्या योजनेचे लाभार्थी होते. मात्र या प्रत्येकाची एक यशकथा होती. आणि ही यशकथा त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगायची होती. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांशी संपर्क साधल्यामुळे काही मोजक्या लोकांशी त्यांना बोलता आले. तथापि,थेट मुख्यमंत्र्यांशी बोलायला भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.

या सर्व शेतकऱ्यांनी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यशकथा ऐकण्याची संधी मिळाल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या व्हिडिओकॉन्फरसिंग नंतर सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देत त्यांचे कौतुक केले. शेतकऱ्यांनी मनमोकळेपणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ .उदय पाटील यावेळी उपस्थित होते.

मंगळवार, डिसेंबर ११, २०१८

सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा:डॉ कुणाल खेमनार

सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
मानवाधिकाराचा उपयोग व्हावा : जिल्हाधिकारी
मानवाधिकाराच्या प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांची  रॅली

 चंद्रपूर /प्रतिनिधी:
सामान्य माणसांविरुध होणारा अन्याय व या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यासोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. या मानवाधिकार आयोगाच्या कार्याबद्दल जनमानसामध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांनी आज येथे केले.

दरवर्षी 10 डिसेंबरला मानवाधिकार दिन साजरा केला जातो. मानवाधिकार दिनानिमित्त चंद्रपूर येथील जुबिली हायस्कूलमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या आयोजनानंतर जुबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातील गांधी चौक पर्यंत रॅली काढून सामान्य जनतेला मानवाधिकार बद्दल माहिती दिली. एक विशेष रॅली काढली. या रॅलीमध्ये मानवाधिकाराच्या संदर्भातील नारे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या मानवाधिकाराच्या संदर्भातील माहिती देणारे फलक आपल्या हातामध्ये घेतले होते. तसेच यासंदर्भातील माहिती देणा देणारे बॅचेस आपल्या गणवेषावर लावले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तत्पूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद मानवाधिकार आयोगामध्ये आहे. आपल्या देशामध्ये मानवाधिकाराचा प्रचंड आदर केला जातो. सगळ्या यंत्रणांमार्फत मानवाधिकार भंग होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाते. तथापि,कोणत्याही परिस्थितीत सामान्यातील सामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेबाबत माहिती दिली. 10 दिसेंबर 1948 रोजी मानवी अधिकार यांची घोषणा संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये करण्यात आली. सयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर संपूर्ण मानव जातीला चांगले आणि शांततामय जीवन जगता यावे, यासाठी 58 देशांनी मानवी हक्क प्रस्तावाला मान्यता दिली होती. भारतात मानवी हक्क संरक्षण कायदा संमत होऊन 1993 रोजी मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. महाराष्ट्रात 6 मार्च 2001 मध्ये मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये जुबिली हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी मयुरी आलम हिने देखील मानवाधिकार संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मयुरी आलम व गौरव गोगे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. रॅलीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री दोरलीकर यांच्या नेतृत्वात जुबिली हायस्कूलचे व्ही एम तोडासे. श्रीमती खान, श्रीमती एस पी वाघमारे, एम. आर. भारसाकडे ,पी.सी कोटेवार, एम. डी. मोरे, एस .टी. बर्डे, ए. पी.सुरपाम,एच.पी. धनेवार,एस .डी. बोंडे,एस. यु. उरकुडे,पी.पी मुडेवार, कोमल वारदे, वैशाली परसोडकर, अभिजीत कृष्णापूरकर, गोविंद प्रसाद बनवाल आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन एम.आर. बारसाकडे यांनी केले.