चंद्रपूर/प्रतिनिधी:
गेल्या 11 तारखेपासून चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राउंड वर सुरू असलेल्या जिल्हा कृषी व सरस महोत्सवाचा समारोप उद्या अकरा वाजता होणार आहे. उद्याच्या शेवटच्या दिवसाचा लाभ चंद्रपूरच्या जनतेने घ्यावा ,असे आवाहन आयोजकांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.
उद्या दुपारी 11 वाजता चांदा क्लब ग्राउंड वर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.याशिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य ना.गो. गाणार, विधान परिषद सदस्य अनिल सोले, विधानपरिषद सदस्य रामदास आंबटकर, आमदार विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धानोरकर, आ.संजय धोटे, आ. किर्तिकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर ,कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती अर्चना जीवतोडे, विभागीय कृषी सहाय्यक रवींद्र भोसले आदींची उपस्थिती या समारोपीय कार्यक्रमाला राहणार आहे.
चंद्रपूर जनतेने गेल्या पाच दिवस दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर उद्या समारोपीय कार्यक्रमाला व शेवटच्या दिवशी बचत गटाच्या स्टॉलला भेट देण्यासाठी चंद्रपुरातील जनतेने यावे, असे आवाहन चंद्रपूरचे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रकांत वाघमारे तसेच प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.