Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

DIO लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी २३, २०१९

नागपूर मनपाच्या शाळा होणार डिजीटल

नागपूर मनपाच्या शाळा होणार डिजीटल

शिक्षण समितीच्या प्रस्तावाला पालकमंत्र्यांची मंजुरी

नागपूर/प्रातिनिधी:

नागपूर महानगरपालिकेच्या शाळा आता डिजीटल होणार आहेत. महापालिकेच्या १५० शाळांचे वर्ग आता डिजीटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण समितीतर्फे शाळा डिजीटल करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. या कामासाठी सहा कोटी रूपयांचा निधी देखील शासनाच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली. शुक्रवारी (ता.२२) मनपा मुख्यालयात शिक्षण समितीची बैठक आयोजित कऱण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपसभापती भारती बुंदे, सदस्य रिता मुळे, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मंथरानी, मनोजकुमार गावंडे, मो .इब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर बैठकीत मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बूट व मोजे देण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावही पारीत करण्यात आला. बनातवाला शाळेसाठी मनपाने चार कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते लवकरच करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 
पुढे बोलताना समिती सभापती प्रा.दिवे म्हणाले, यावर्षी विद्यार्थ्यांना गणवेशासह स्वेटर पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्यासाठी देखिल प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सायकल बॅंक योजनेअंतर्गत दुरून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. प्रारंभी शिक्षण समिती सभापती प्रा.दिवे यांनी शाळा निरिक्षकाकडून स्वेटर वाटप केल्याबाबत शाळानिहाय आढावा घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ५ ते १० वर्गात सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शासनाच्या निर्णयानुसार नागरी भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्याबाबत विचार करण्यात यावा, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्देशानुसार व अध्यादेशानुसार त्याची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले.

 पुढील शैक्षणिक वर्षात घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रस्ताव समितीपुढे सादर केला. त्यावर बोलताना समिती सभापती यांनी लवकरच या प्रस्तावावर विचार करण्यात येईल, असे सांगितले.

शनिवार, जानेवारी २६, २०१९

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ जाहीर

दिल्ली/वृत्तसंस्था:

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र शासनाने आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्ररत्न नानाजी ठरले भारतरत्न
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी ११ ऑक्टोबर १९१६ मध्ये नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगिण विकास होऊ शकतो या विचाला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नितकालिकांचे जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले. देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहीले आहे. गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पध्दतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य,आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्त्वपूर्ण कार्य नानाजींनी केले. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय योगदानाची दखल
प्रसिध्द अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. पश्चिम बंगाल मध्ये ते भारत देशाचे १३ वे राष्ट्रपती ठरले. ११ डिसेंबर १९३५ मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे ६ दशकांच्या सक्रिय राजकारणात लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले. केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्रव्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री आदी पद त्यांनी भुषविली आहेत. भारतदेशाचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती म्हणून त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कार्य केले. 
भूपेन हजारिकांच्या अविट व अमिट सुरांचा सर्वोच्च सन्मान
प्रसिध्द गायक व संगितकार भूपेन हजारिका यांच्या अविट व अमिट सुरांची दखल घेवून त्यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. आसाममध्ये ८ डिसेंबर १९२६ जन्मलेले हजारिका यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून आसमी भाषेत गायनास सुरुवात केली. कलकत्त्यात वयाच्या दहाव्यावर्षीच त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिले गाणे लिहीले. बंगाली गीतांना हिंदीत अनुवादीत करून स्वर देत असत. रूदाली, मिलगयी मंजील मुझे, साज, दरमिया, गजगामिनी, दमन आणि क्यों या सुपरहीट चित्रपटांचे गीत लिहीले. हजारिका यांनी एकूण १ हजार गीत रचणा केल्या व एकूण १५ पुस्तके लिहिली. 

महाराष्ट्राला ११ पद्म पुरस्कार

महाराष्ट्राला ११ पद्म पुरस्कार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
दिल्ली/वृत्तसंस्था:
सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, प्रसिध्द अशोक कुकडे यांना पद्म भूषण तर प्रसिध्द नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, गायक शंकर महादेवन, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र व स्मिता कोल्हे यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

दरवर्षी गणराज्य दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी पद्म विभूषण पुरस्कार ४ मान्यवरांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना कला व नाट्य क्षेत्रातातील उल्लेखनीय योगदानासाठी तर अनिल कुमार नाईक यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र व स्मिता कोल्हे या दाम्पत्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये कला व नाटय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक व प्रसिध्द नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे तसेच कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द कलावंत मनोज बाजपेयी या मान्यवरांचा समावेश आहे. याशिवाय कला गायन व चित्रपटातील योगदानासाठी प्रसिध्द गायक शंकर महादेवन, आरोग्य क्षेत्रासाठी सुदान काटे, कला व नाट्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिनयार कॉन्ट्रॅक्टर,साहित्य-शिक्षण व पत्रकारितेतील योगदानासाठी नगीनदास संगवी, सामाजिक कार्य व प्राण्यांसाठी उत्कृष्ट कार्य करणारे शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

यावर्षी एकूण ११२ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ४ पद्म विभूषण, १४ पद्म भूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यात २१ माहिला तर ११ हे अप्रवासी भारतीय, परदेशी नागरिक आहेत. ३ मान्यवरांना मरणोत्तर तर एका तृतीय पंथीय व्यक्तीस पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.