Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सैनिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सैनिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जून ०९, २०१८

माजी सैनिकांचा मेळावा

माजी सैनिकांचा मेळावा

x military  indian साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर व गडचिरोली जिल्हृयातील सर्व माजी सैनिकांना,विधवांना व त्यांच्या अवलंबितांना कळविण्यात येते की,गार्डस रेजिमेंटल सेंटर व एम.एम.एच.कामठी यांचे सहकार्याने 26 जून 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यत जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर परिसरातील सभागृह बचत साफल्य भवन येथे वैद्यकीय तपासणी,सी.एस.डी. कॅन्टीन सुविधा,निवृत्ती कुटूंब निवृत्ती वेतनाबाबतच्या समस्या सोडविण्याबाबत तसेच डिआयव्हि पोर्टलवर सर्व माजी सैनिक व माजी विधवांच्या नोंदणीसाठी माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
तरी सदर मेळाव्यास येतांना सर्वानी आपल्यासोबत डिस्चार्ज बुक,ओळखपत्र,पी.पी.ओ. पासबुक, आधारकार्ड, कॅन्टीन कार्ड व तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणणे आवश्यक आहे.तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील सर्व माजी सैनिकांनी, विधवांनी व त्यांच्या अवलंबितांनी या मेळाव्यादरम्यान मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊन या मेळाव्यास यशस्वी करावे असे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

शुक्रवार, मार्च ३०, २०१८

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 सन्मित्र सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलांनी शाळेची भिंत ओलांडून पळून जात फोनवरुन पालकांना ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने थोडी शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
चंद्रपूर येथील सन्मित्र सैनिकी शाळेतील घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शाळेतील इयत्ता नववीच्या मोहीत उज्वलकर आणि जगजितसिंग भट्टी यांनी शाळेची भिंत ओलांडून पळ काढला. शाळेतील सैनिकी शिस्तीचे कमांडंट सुरिंदर राणा यांनी आपल्याला आणि बहुतांश विद्यार्थ्यांना अनावश्यक मारहाण केली, असा आरोप या मुलांनी केला आहे. या मुलांनी पळून गेल्यावर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलातून पालकांशी संपर्क साधला. यांनतर ही घटना उजेडात आली. 
या मुलांना घेऊन पालक थेट चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. कमांडंट राणा मुलांना सिगरेट आणण्यासाठी दबाव आणत होते. त्यातूनच ही मारहाण झाली आहे. इयत्ता नववीची एक प्रश्नपत्रिका फुटल्याचा या विद्यार्थ्यांवर केलेला आरोप, हे अन्य कारण असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या मुलांना झाडाला बांधून दंडुक्याने मारहाण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी त्याचे वळ देखील दाखवले.
सन्मित्र सैनिकी शाळेच्या कमांडंटचे हे कृत्य अमानूष आहे. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या व्यक्तीविरोधात गुन्हे दखल करून कारवाई करावी. तसेच सन्मित्र सैनिकी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी संतप्त पालकांनी यावेळी केली आहे. 
सन्मित्र सैनिकी शाळेशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हे २ विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले होते. यांच्याजवळ सिगरेट असल्याची माहिती पालकांनी फोनवरून व्यवस्थापनाला दिली होती. त्यानंतर घेतलेल्या झडतीत त्यांच्या पेटीत सिगरेट - तंबाखू- खर्रा आढळला होता. त्यानंतर त्यांच्यावर सैनिकी शाळेच्या शिस्तीनुसार थोडी शिक्षा करण्यात आली. मात्र, त्यात कुठलाही अमानुषपणा नव्हता, असे प्राचार्यांनी सांगितले. आम्ही या घटनेची चौकशी करत असून, पोलिसांना देखील सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नावाजलेली शाळा म्हणून सन्मित्र सैनिकी शाळेची ओळख आहे. अशा शाळेसंदर्भात मारहाण आणि विद्यार्थी पलायनाचे प्रकरण पुढे आल्याने घटनेतील सत्यता पुढे यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.