Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शिवसेना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवसेना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जून २७, २०१८

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

Shivsena's Rastaroko movement for farmers' questions in Wardha | वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलनवर्धा/प्रतिनिधी:
 स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या रेटून लावण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार विलास कातोरे यांनी स्वीकारले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून एक वर्षांचा कालावधी होत आहे. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांना सदर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. विविध बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून बँकांच्या अधिकाऱ्यांना पीक कर्ज वितरणाबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात यावे. गत वर्षी गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सदर नुकसानीपोटी देण्यात येणारी शासकीय मदत जाहीरही करण्यात आली. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांना ही शासकीय मदत मिळाली नसून ती त्वरित देण्यात यावी. याकालावधीत सुमारे ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु, त्यापैकी केवळ २८ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. राज्यातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब तात्काळ बंद करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियोजन बद्द कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करावी, या मागण्या सदर रास्तारोको आंदोलनादरम्यान रेटून लावण्यात आल्या होत्या. तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, माजी आमदार अशोक शिंदे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, महिला आघाडीच्या सुधा शिंदे, गणेश इखार आदींनी केले. मोर्चासह रास्तारोको आंदोलनात महिला व पुरुष शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
सरकारविरोधी केली घोषणाबाजी
आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेनेच्या काही पुढाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी भाजपा सरकार सध्या कसे शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे याची माहिती दिली. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

बुधवार, मार्च १४, २०१८

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

मुंबई/काव्यशिल्प ऑनलाईन:
bjp shivsena साठी इमेज परिणाम
"शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला आहे.‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.‘उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला,आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.
एकीकडे शिवसेनेनं 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. अशावेळी मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपण एकत्र लढणार असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सोमवार, मार्च ०५, २०१८

भगवे झेंडे काढल्याने शिवसेना आक्रमक

भगवे झेंडे काढल्याने शिवसेना आक्रमक

मनपा अधिकाऱ्यांना घेराव घालत केला गदारोळ
चंद्रपूर(रोशन दुर्योधन):चंद्रपुरात पुन्हा एकदा जुना "बॅनरवॉर" सोमवारी चांगलाच उफाळून आलेला आहे.नेहमी नानाविविध कारणावरून चर्चेत राहणाऱ्या शिवसेनेने चंद्रपूर शहरात शिवजयंती निमित्त काही मोजक्या ठिकाणी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अश्या आशयाचे होर्डिंग्स व शहरात झेंडे लावले होते. शहरात कोणत्याही ठिकाणी बॅनर लावण्यास मनपा प्रशासन तयार नसून ही लावलेली बॅनर व झेंडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकली,आणि झेंडे हटविण्याची भनक शिवसेनेच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी आपल्या सैनिकांसोबत मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला.
                   शिवसेनेने शिवाजी महाराजांचे बॅनर काढण्यावरच आक्षेप घेत मनपा अधिकारी कर्मचारी व शिवसेना नेते व कार्यकर्ते यांच्यात चांगलीच जुंपली शिवाजी महाराजांची शुभेच्छा फलक काढले कसे ? असा प्रश्न करत मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी चांगलेच धारेवर धरले. चंद्रपुरात काही दिवसा आगोदर योग गुरु रामदेव बाबा हे योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आले असता संपूर्ण शहरभर त्यांचे शुभेच्छुक बॅनर लावण्यात आले होते तेव्हा हे बॅनर कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढलेले नाही . मात्र 4 मार्च रोजी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लावलेले हे बॅनर अतिक्रमण विभागाने काढताच  मनपा अधिकारी कर्मचारी व शिवसेनेने चांगलीच जुंपली . हा वाद वाढत गेला आणि हमरीतुमरी होत शाब्दिक बाचाबाचीवर देखील आला होता.
                      गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात जटपुरा गेट सौंदर्यकरनावावरून तू-तू-मैं-मैं आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिवाजी महाराजांची झेंडे काढण्याचा वाद समोर येताच जटपुरा गेट येथे सुरू असलेल्या सौंदर्य करण्याचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले आणि जोवर या जटपुरा गेट च्या वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर जटपुरा गेट चे काम बंद पाडू असा इशारा देत सुरू असलेले जटपुरा गेटच्या सौंदयीकरणाचे काम शिवसैनिकांनी बंद पडले.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गीरे, जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे उपजिल्हा प्रमुख   किशोर जोरगेवार यांच्या शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, माजी नगरसेवक आकाश साखरकर, माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर यांच्या सह सेनेच्या ईतर पदाधिका-यांची व शिवसैनिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. शहरात भाजपचे बॅनर चालतात तर मग शिवाजी महाराजांचे का नाही असा प्रश्न शिसैनिकांनी उपस्थित करत महानगर पालिकेसमोर जोरदार निदर्शने केलीत तसेच यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमूख सुभाष थोंबरे आणि उपायुक्त विजय देवळीकर यांचे कार्यालय गाठून शिवसैनिकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामूळे काही काळ महानगर पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.






बुधवार, फेब्रुवारी २८, २०१८

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

आदिवासी समाज व चंद्रपूरची जनता किशोर जोरगेवारांन सोबत - सुरेश पचारे
चंद्रपूर (ललित  लांजेवार):   
shivsena bhajap साठी इमेज परिणाम
                       राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना यांच्यातला वाद काही नवीन नाही,खांद्याला खांदा लाऊन सत्तेत बसेले दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दररोज करतात,तुझ माझ जमेना, तुझ्या वाचुन करमेना अशी स्थिती  राज्यात या पक्षाची आहे.
                   मात्र चंद्रपूरच्या राजकारणात देखील आज परीयंत कधी न झालेला  शिवसेना भाजप वाद आता शहराच्या राजकारणात जोर पकडू लागल्याचे चिन्ह दिसु लागले आहे. सोमवारी चंद्र्पूर येथे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेत वाहतुकीची कोंडी होत असणाऱ्या जटपूरा गेट येथून वाहतुकीचा मार्ग मोकळा करा व नंतरच सौंदर्यीकरण करा यासाठी आंदोलन केले, तसेच जिल्हाधिकारी यांना माहितेचे निवेदन देत सूचनाही सुचविल्या,हे आंदोलन होत नाही तर लगेच चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांनी या आंदोलनावर आक्षेप घेत एक प्रेस नोट माध्यमांत प्रकाशित केली. जटपूरा गेटला धक्का जरी लागला तर आदिवासी समाज चूप बसणार नाही.  असा घानाघात करत शिवसेनेच्या आंदोलनाला विरोध दर्शविला.
                     याच भाजप व शिवसेनेच्या तू-तू मै-मै मध्ये आता चंद्रपूरचे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी एक प्रेस नोट काढत भाजपला थेट प्रतिउत्तर देत धारेवर धरले आहे. पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला असा खोचक उत्तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार याची बाजू राखत सुरेश पचारे यांनी भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांना दिले आहे. 
                   याच सोबत प्रसिद्धी पत्रकात शिवसेने भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांच्यावर बराचश्या प्रश्नांची भडीमार केली आहे.  शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेतल्या नंतर भाजपाच्या नगर सेविका शितल कुळमेथे यांना आदिवासी समाजाच्या पुरातन वास्तुंचा साक्षात्कार झाला आहे. जेव्हा महानगर पालीकेने गिरनार चौकातील विर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या नावाचा फलक काढून तो कच-यात टाकला तेव्हा त्या परदेशात होत्या का? असा टोला हाणत किशोर जारगेवार यांच्या लोकोपयोगी आंदोलनाला आदिवासी समाजाचा पाठींबा असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगर सेवक सुरेश पचारे यांनी स्पष्ट केले आहे. 
शिवसेनेचा विकासकामांना कधिच विरोध नव्हता ना तो असेल मात्र नको त्या गोष्टीवर खर्च करुन मुळ समस्या जैसे तेच ठेवली जात असेल तर त्याला मात्र शिवसेना तिव्र विरोध आहे असे देखील या पत्राच्या माध्यमातून म्हटल्या गेले आहे , सौंदर्यीकरनाला आमचा विरोध नाही मात्र पहिले येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवा व नंतर हे सौंदर्यीकरण करा अशी भुमीका किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे.
                         यात गोंड कालीन जटपूरा गेटचे अतिस्व मिटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शिवसेना असे पर्यंत तरी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा असलेले गोंड कालीन वास्तूंना हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही. आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव आहे या समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे मात्र त्याच्या वीर पुत्रांचे एकही  स्मारक शहरात नाही. त्यामुळे जटपुरा गेट समोर विर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सेनेची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र आता नगरसेविका शितल कुळमेथे यांनी प्रेसनोट प्रकाशित करुन यात जातीय राजकार घोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला आदिवासी समाज कधीही स्विकारणार नाही. गोंड कालीन वास्तुंची दशा आजघडीला अतिशय बिगट झाली आहे. त्यासाठी कूळमेथे यांनी आजवर किती निवेदण दिलेत? पहिले  हे सांगावे ,त्याच्या स्वताच्या भानापेठ प्रभागात नागरिकांनी गोंड कालीन परकोटांवर अतिक्रम केले आहे. त्यांना ते दिसत नाही का ? ईक्रो प्रो संघटणेच्या वतीने परकोट स्वच्छता मोहीम  राबवली जात असतांना शितल कुळमेथे यांनी कितीदा उपस्थिती लावली पाहिले हे सांगावे केवळ राजीकय हेतुतून समाजाच्या नावाचा गैरवापर करून उघीच  बडबड करु नये, आदिवासी समाज हा जागरुत आहे. आणि भाजपाने या समाजासाठी काय केले हेही या समाजाला चांगल्याने कळते त्यामूळे अश्या नगर सेवीकांच्या मागे हा समाज कधिच उभा राहणार नाही.  हे आदिवासी समाजाचे नेते तसेच आदी जनचेतना जागर या संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी किशोर जोरगेवार यांच्या धरणे आंदोलनात उपस्थित राहून दाखऊन दिले आहे. त्यामुळे कुळमेथे यांनी पहिले त्यांच्या प्रभागातील परकोटांवर नारिकांनी केलेले अतिक्रमण काढावे त्यात भाजप त्यांना मदत करत नसेल तर तसेही सांगावे आम्ही गोंड कालीन वसा वाचवीण्यासाठी प्रयत्नशील असुन हे अतिक्रमण काढण्यात आम्ही तुम्हाला मदत करु असा सल्लाही पचारे यांनी शितल कुळमेथे यांना दिला आहे. 
                        याअगोदर पाच ठिकाणी गोंड कालीन परकोट तोडल्या गेले ते कुणाला विचारून तोडण्यात आले व त्यावेळेस कोणते अधिकारी होते? तसेच २.५० कोटी रुपये जटपुरा गेटच्या सौदर्याकरीता सरकारकडून दिले आहे जटपुरा गेट येथे वाहतूक कोंडी हि खूप मोठी समस्या आहे आणि इथल्या लोकप्रतीनिधीकडून तिथे सौंदर्यीकरणासाठी २.५० कोटी रुपये खर्च करीत आहेत ते पैसे तिथे खर्च करण्याची काही गरज नाहि तेच २.५० कोटी रुपये परकोटाच्या डागडुजी करीता खर्च करावे. या जटपुरा गेटच्या सौंदर्याकरीता शहरातील मोठे व्यापारी तसेच अनेक कंपन्या करायला तयार आहे पण त्यांना हे शासन करू देत नाही.  आणि तेच काम फुकट होत असताना त्याठिकाणी २.५० कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नाही आहे या संपूर्ण विषयाकडे नगरसेविका शितल कुळमेथे यांनी लक्ष द्यावे आणि विनाकारण दोषारोपण करू नये.  असा सवाल देखील पचारे यांनी करत भापला चांगलच सवालाच्या घेऱ्यात उभे केले.  त्यामुळे दररोज होणाऱ्या भाजप शिवसेना वादात नक्कीच चंद्रपूरच्या नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार का ? कि हे दोन्ही पक्ष दररोज आप-आपल्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून एकमेकांवर टीका करतच राहणार हे मात्र योग्य ती वेळच ठरवेल.त्यामुळे शिवसेनेच्या या खोचक सावलांचे उत्तर भाजप कोणत्या पद्धतीने देते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 
shivsena bhajap साठी इमेज परिणाम

मंगळवार, फेब्रुवारी २७, २०१८

 शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

विकासाला बगल देत राजकारण
bjp logo साठी इमेज परिणाम चंद्रपूर(ललित लांजेवार)
सोमवारी जटपुरा गेट येथे शिवसेनेने केलेल आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी आहे असा अनाघाती आरोप आता चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी केला आहे,  चंद्रपूर शहराला ५००  वर्षांचा इतिहास आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभलेले असल्याची नोंद आहे.  येथील परकोट,किल्ले,मंदिर,  समाधी स्थळे, हे गुंड राज्याचे वैभव दर्शविणारे केंद्र आहे.  त्यांच्या सौंदर्यात लाइटिंगमुळे  भर पडणार आहे.  वाहतुकीची कोंडी आणि लाइटिंग हा सबंध सामान्यांच्या बुद्धीला न पटणारा आहे.त्यामुळे जोरगेवार हे  राजकीय हेतूने पूर्वजांनी 500 वर्षांपासून जतन केलेल्या पुरातत्त्व संपत्तीला संपवण्याचा डाव खेळात आहेत असा आरोप  भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी शिवसेनेवर केला आहे. या जटपुरा गेटला धक्का जरी लागला तर आम्ही आदिवासी समाज रस्त्यावर उतरू असा ईशारा यावेळी नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी दिला  आहे,
                चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाज 500 वर्षांपासून गोंड राजांनी उभारलेल्या वैभवाचे जतन करत आलेला आहे.  या संपत्तीला अधिक वैभव लाभण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने लावण्यासाठी भरीव निधी देऊन मदत केली आहे.  इतिहासाला आपण जपायला हवे परंतु विकासापोटी असंतुष्ट प्रवृत्तीचे लोकी  ऐतिहासिक वारसा जतन न करता तो नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे हे आम्ही आदिवासी समाज कदापी खपवून घेणार नाही, 

 ५००  वर्षांचा पुरातत्त्व गोंड राजाचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकाद्वारे पुढच्या पिढीला न सांगता तो प्रत्यक्षात जतन करून ठेवू, या सौंदर्यीकरण आला कुठलाही विरोध केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाहीर  निषेध करू असे देखील म्हणाले. 
पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न 
अशा प्रकारचे पुरातन वस्तू यांचे जतन करण्यासाठी दिल्ली,औरंगाबाद येथे अशा प्रकारची लाइटिंग लावण्यात आलेली आहे. याच प्रकारची लाइटिंग चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवात वाढ करण्याकरिता लावण्यात येणार आहे यामुळे चंद्रपूर आकर्षणाचे केंद्र बनेल व  गोंड राज्याच्या ऐतिहासिक पुढची पिढी  माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेन.  की आमच्या आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे विकासाला साथ देत विकासासोबत राहायला हवे असा सल्ला देखील यववेली देण्यात आला