Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जुलै १२, २०१८

चंद्रपुरात सुरु आहेत अनाधिकृत शाळा

चंद्रपुरात सुरु आहेत अनाधिकृत शाळा

शाळा साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
        चंद्रपूर जिल्हयात शासनाची परवानगी न घेता अनाधिकृत इंग्रजी शाळा मोठया प्रमाणात सुरु केलेल्या आहेत.  त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा पालकांनी अशा शाळेमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेण्याचे टाळावे. ज्या शाळा शासनाची परवानगी शिवाय सुरु असून अशा अनाधिकृत शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यासाठी पालक स्वत: जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे अशा शाळेत पाल्यांचे प्रवेश घेण्यात येवू नये.
चंद्रपूर जिल्हयात शासनाची परवानगी न घेता सुरु असलेल्या शाळेमध्ये डिलाईट कॉन्व्हेट चिचाळा, ग्लोबल माऊन्ट पब्लीक स्कुल, गोल्डन किडस अकाडमी, स्टेला मारीस स्कुल कोरपना जि.चंद्रपूर, के.जी.एन.पब्लिक स्कुल राजेन्द्रप्रसाद वार्ड बल्लारपूर, शारदा इंग्लीश मंदीर वादरा ब्रम्हपूरी, विद्यानिकेतन इंग्लीश कॉन्व्हेट उपरवाही कोरपना, नाईस इंग्रजी कॉन्व्हेट सरकार नगर चंद्रपूर, राज इंग्लीश मिडीयम स्कुल गडचांदूर, डिलाईट कॉन्व्हेट स्कुल इंदीरानगर चंद्रपूर या शाळांचा समावेश  समावेश आहे. त्यामुळे या शाळेत प्रवेश घेण्यात येवू नये, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी कळविले आहे.

बुधवार, जून २७, २०१८

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

On the very first day, the locals locked the three schools | पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूपचंद्रपूर/प्रतिनिधी:
 २०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची घंटा वाजली. वाजत गाजत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले गेले. प्रभात फेरी, शाळेत पुष्पगुच्छ व विविध साहित्य वाटप करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र भद्रावती तालुक्यातील चिरादेवी शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी तर सावली व राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे शाळा इमारतीसाठी गावकºयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शिक्षण विभागासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
पहिल्याच दिवसापासून सावलीच्या दोन शाळा बेमुदत बंद
सावली : येथील दोन जि. प. शाळा इमारतीचे निर्लेखन करण्यात आले. परंतु, गत चार वर्षांपासून इमारत बांधण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी इमारत बांधकामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शाळांमध्ये १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. त्या शाळेतील विद्यार्थी शाळा क्र. २ येथे विद्यार्जनासाठी येत असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना साधारणपणे तीन किमी पायपीट करावी लागत आहे. या कारणाने संतप्त झालेल्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे अर्ज देऊन टीसी मागितली आहे. अशाच प्रकारचे आंदोलन सहा महिन्यापूर्वी झाले होते. मात्र आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी आंदोलन केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सावलीचे संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, नगराध्यक्ष विलास यासलवार आदींनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहील, यावर पालक ठाम आहेत.
संतप्त पालकांनी विहिरगाव शाळेलाही ठोकले टाळे
विरुर (स्टे.): 
राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत पाडून नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र दोन वर्षानंतरही बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. विहिरगाव गावात जि.प. प्राथमक शाळा असून येथे वर्ग १ ते ५ आहे. या सत्रात शाळेत १५० च्या जवळपास पटसंख्या आहे. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शिक्षकवर्ग आले. तसेच विद्यार्थीही आले. मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांना बाहेरच रहावे लागले. वर्गखोलीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विरुर पोलसांना पाचारण करण्यात आले. ही बाब वरिष्ठांना कळविण्यात आली. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही.
शिक्षकासाठी चिरादेवी शाळेत पालकांचे ठिय्या आंदोलन
भद्रावती :
 शिक्षकांसह पालकांनी सुद्धा शिक्षण विभागाला विनंती अर्ज करुनही चिरादेवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची आॅनलाईन पद्धतीने बदली झाली. त्यामुळे शिक्षकाची बदली रद्द करा व पुन्हा त्यांना चिरादेवी शाळेतच नियुक्तीच्या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेला कुलूप ठोकून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत त्या शिक्षकाला रुजू करुन घेणार नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवून ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा येथील पालकांनी घेतला आहे. चिरादेवी शाळेत गेल्या चार वर्षापूर्वी बंडू दडमल हे शिक्षक रुजू झाले. त्यांची शिकवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. त्यांच्यामुळे ही शाळा संपूर्ण डिजीटल असून उन्हाळ्याच्या सुट्यातही येथील शिक्षकाने इंग्रजी व गणित या विषयाचे विद्यार्थ्यांना धडे दिले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली. शिक्षण विभागाकडे आपली बदली करू नये, असा विनंती अर्ज शिक्षकाने केला होता. परंतु, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी या विनंती अर्जाला केराची टोपली दाखवली व बंडू दडमल यांची आॅनलाईन पद्धतीने सिंदेवाही तालुक्यातील पागळी गावात बदली केली. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापन कमिटीने बदली झालेले शिक्षक पुन्हा आमच्या शाळेत रुजू होत नाही, तोपर्यंत शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. गटशिक्षणाधिकारी संजय हेडाऊ यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. परंतु पालकांनी शाळेचे दार उघडू दिले नाही. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्का मंगाम, उपाध्यक्ष अंकुश दर्वे, सदस्य तुळशिराम बदखल, शंका आत्राम, माधुरी वासेकर, ज्योती राजूरकर तसेच पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
हेच का अच्छे दिन? विरोधकांचा सवाल
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्याचे फर्माण सोडण्यात आले. मात्र दाखलपात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोली नसल्याने रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागणे, ही दुदैवी बाब आहे. इमारत बांधकामासाठी निधी देण्याची मागणी वारंवार जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आली. मात्र सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, परिणामी शिक्षण विभागाचा १.२८ कोटींचा निधी परत जाणार आहे, असल्याचा आरोप काँग्रेसचे जि.प. गटनेते डॉ. सतीश वारजुकर यांनी केला आहे.

मंगळवार, जून १२, २०१८

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ शाळांना ‘अटल टिंकरिंग लॅब’

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ शाळांना ‘अटल टिंकरिंग लॅब’

राज्यात टिंकरिंग लॅबची संख्या ३८७ 
अटल टिंकरिंग लॅब साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यासाठी देशातील आणखी 3 हजार शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 196 शाळांचा समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यात राज्यातील 191 शाळांची निवड झाली असून राज्यात उभारण्यात येणा-या लॅबची संख्या 387 पर्यंत पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ४ शाळांना ‘अटल टिंकरिंग लॅब’ मिळेल.
माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता व उद्योजकतेची जोपासना व्हावी, विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहेत. नीती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेश मिशन’चे व्यवस्थापकीय संचालक रामनाथम रामानन यांनी आज ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यासाठी देशातील आणखी 3 हजार शाळांची निवड झाल्याची घोषणा केली, यामध्ये महाराष्ट्रातील 196 शाळांचा समावेश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत देशातील 5 हजार 441 शाळांची निवड करण्यात आली आहे व महाराष्ट्रातील एकूण 387 शाळांचा यात समावेश आहे.
राज्यातील 387 शाळांसाठी ७७  कोटी ४० लाखांचे अनुदान
‘अटल टिंकरिंग लॅब’साठी निवड झालेल्या प्रत्येक शाळेला टिंकरिंग लॅब तयार करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यानुसार पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील एकूण 387 शाळांना 77 कोटी 40 लाख रूपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.
विदर्भातील ४३ शाळांचा समावेश
‘अटल टिंकरिंग लॅब’ साठी विदर्भातील 43 शाळांची निवड झाली आहे. या विभागात निवड झालेल्या शाळांची जिल्हा निहाय यादी पुढील प्रमाणे. नागपूर (11), अमरावती (6), गोंदिया (5), वाशिम (4), चंद्रपूर (4), गडचिरोली (3), वर्धा (3), यवतमाळ (3), अकोला (2), भंडारा (1) व बुलढाणा (1).

शुक्रवार, मार्च ३०, २०१८

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 सन्मित्र सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलांनी शाळेची भिंत ओलांडून पळून जात फोनवरुन पालकांना ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने थोडी शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
चंद्रपूर येथील सन्मित्र सैनिकी शाळेतील घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शाळेतील इयत्ता नववीच्या मोहीत उज्वलकर आणि जगजितसिंग भट्टी यांनी शाळेची भिंत ओलांडून पळ काढला. शाळेतील सैनिकी शिस्तीचे कमांडंट सुरिंदर राणा यांनी आपल्याला आणि बहुतांश विद्यार्थ्यांना अनावश्यक मारहाण केली, असा आरोप या मुलांनी केला आहे. या मुलांनी पळून गेल्यावर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलातून पालकांशी संपर्क साधला. यांनतर ही घटना उजेडात आली. 
या मुलांना घेऊन पालक थेट चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. कमांडंट राणा मुलांना सिगरेट आणण्यासाठी दबाव आणत होते. त्यातूनच ही मारहाण झाली आहे. इयत्ता नववीची एक प्रश्नपत्रिका फुटल्याचा या विद्यार्थ्यांवर केलेला आरोप, हे अन्य कारण असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या मुलांना झाडाला बांधून दंडुक्याने मारहाण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी त्याचे वळ देखील दाखवले.
सन्मित्र सैनिकी शाळेच्या कमांडंटचे हे कृत्य अमानूष आहे. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या व्यक्तीविरोधात गुन्हे दखल करून कारवाई करावी. तसेच सन्मित्र सैनिकी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी संतप्त पालकांनी यावेळी केली आहे. 
सन्मित्र सैनिकी शाळेशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हे २ विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले होते. यांच्याजवळ सिगरेट असल्याची माहिती पालकांनी फोनवरून व्यवस्थापनाला दिली होती. त्यानंतर घेतलेल्या झडतीत त्यांच्या पेटीत सिगरेट - तंबाखू- खर्रा आढळला होता. त्यानंतर त्यांच्यावर सैनिकी शाळेच्या शिस्तीनुसार थोडी शिक्षा करण्यात आली. मात्र, त्यात कुठलाही अमानुषपणा नव्हता, असे प्राचार्यांनी सांगितले. आम्ही या घटनेची चौकशी करत असून, पोलिसांना देखील सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नावाजलेली शाळा म्हणून सन्मित्र सैनिकी शाळेची ओळख आहे. अशा शाळेसंदर्भात मारहाण आणि विद्यार्थी पलायनाचे प्रकरण पुढे आल्याने घटनेतील सत्यता पुढे यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८

शासनाने टाळे ठोकलेल्या जिल्हा परीषद शाळाचे कुलूप गावकऱ्यानी तोडले;अन् केली शाळा सुरु

शासनाने टाळे ठोकलेल्या जिल्हा परीषद शाळाचे कुलूप गावकऱ्यानी तोडले;अन् केली शाळा सुरु

शासनाने बंद केलेल्या शाळेचे कुलूप तोडतांना गावकरी व विध्यार्थी
ब्रम्हपुरी /प्रतिनिधी:  शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता , या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत असतांना मात्र दुसरीकडे शासनाचे अश्या शाळांना टाळे ठोकण्याचे काम केले ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी - परसोडी या गटग्राम पंचायत अंतर्गत परसोडी गावातील हि  शाळा देखील  शासनाने बंद केली ,शासन व अधिकाऱ्यांच्या या अफलातून निर्णयाने शाळा बंद झाली तेव्हा पासून गावकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला होता.मात्र या शाळेचे कुलूप आता गावकर्यांनीच तोडून गावातील विध्यार्थ्यांना हि शाळा सुरु करून देण्यात आली आहे. शाळा बंदल्यानंतर शाळेतील मुलांना झिलबोडीला येथे जाऊन शिक्षण घ्यावे,असे सांगण्यात आले होते.शाळा बंद होणार हे माहित होताच गावातील सुजन शिक्षित नागरिक व विद्यार्थ्यांनी शासन दरबारी निवेदने देण्यात आली, पञकार परिषद घेण्यात आली, विविध शिक्षणप्रेमींनी आंदोलने केली परंतु शासनाला जाग आली नाही.
प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात असतांना देखील शासनाने हि शाळा बंद केली मात्र 
खेड्यात आजही शिक्षणासाठी लागणाऱ्या परिपूर्ण सोयी नसल्याने आमचे चिमुकली दुस-या गावी शिकणार तरी कशी? असा प्रश्न गावकर्यांनी उपस्थित केला. आंम्ही दुसरीकडे जाणार नाही, असा सूर देत ग्रामवासियांचा उद्रेक झाला अन् गावक-यांनीच शाळेचे  कुलूप तोडले. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील फक्त परसोडी या गावातिलच शाळा हि शासनाने बंद केली होती. ता यावेळी शिक्षणप्रेमी अॅड.गोविंदराव भेंडारकर,विनोद झोडगे,मंदा तुपट, देवकन्याताई लांडेकर ग्रा. प.सदस्या,नामदेव दमके,प्रेमलाल मेश्राम,वामन मंडपे,नारायण खरकाटे,भिवाजी खरकाटे, हिरालाल तुपट,लक्ष्मण तुपट,दिलीप कार,मधुकर लांडेकर,किशोर खरकाटे,आशा गाडगे,वच्छला तुपट,शामलाल लोखंडे,रघुनाथ लांडेकर,आशा कार आदी गावकरी मंडळींनी सहकार्य केले.