चंद्रपूर जिल्हयात शासनाची परवानगी न घेता अनाधिकृत इंग्रजी शाळा मोठया प्रमाणात सुरु केलेल्या आहेत. त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा पालकांनी अशा शाळेमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेण्याचे टाळावे. ज्या शाळा शासनाची परवानगी शिवाय सुरु असून अशा अनाधिकृत शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यासाठी पालक स्वत: जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे अशा शाळेत पाल्यांचे प्रवेश घेण्यात येवू नये.
चंद्रपूर जिल्हयात शासनाची परवानगी न घेता सुरु असलेल्या शाळेमध्ये डिलाईट कॉन्व्हेट चिचाळा, ग्लोबल माऊन्ट पब्लीक स्कुल, गोल्डन किडस अकाडमी, स्टेला मारीस स्कुल कोरपना जि.चंद्रपूर, के.जी.एन.पब्लिक स्कुल राजेन्द्रप्रसाद वार्ड बल्लारपूर, शारदा इंग्लीश मंदीर वादरा ब्रम्हपूरी, विद्यानिकेतन इंग्लीश कॉन्व्हेट उपरवाही कोरपना, नाईस इंग्रजी कॉन्व्हेट सरकार नगर चंद्रपूर, राज इंग्लीश मिडीयम स्कुल गडचांदूर, डिलाईट कॉन्व्हेट स्कुल इंदीरानगर चंद्रपूर या शाळांचा समावेश समावेश आहे. त्यामुळे या शाळेत प्रवेश घेण्यात येवू नये, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी कळविले आहे.