Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मुनगंटीवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुनगंटीवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै २९, २०१८

जागतिक व्याघ्र दिनानिमित्य  Bagh or main short documentary

जागतिक व्याघ्र दिनानिमित्य Bagh or main short documentary

International Tiger Day special short documentary
Providing information/lalit lanjewar:(9175937925):
A beautifully made short documentary released on at Nagpur by the forest department. The documentary is prepared by the staff of Pench Tiger Reserve Conservation Foundation Maharashtra under the guidance of CCF & FD Mr. M S Reddy (IFS). the documentary tells us the importance of the tiger species as well as how any common man can contribute towards protecting the tiger and its habitat the forests.





शुक्रवार, जुलै १३, २०१८

रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाल्या नंतर सुधीर मुनगंटीवार यांचे रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश

रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाल्या नंतर सुधीर मुनगंटीवार यांचे रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश

सुधीर मुनगंटीवार साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 मागील आठवडाभर सतत चंद्रपूर शहरासह इतर भागामध्ये चांगला पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. तसेच गेल्या 2 दिवस चंद्रपूर शहरात झालेल्या रस्ते अपघाताच्या प्रकरणी मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीने अर्थसहाय्य देण्यात यावे तसेच शहरातील मुख्य रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर आणि सार्वजननिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांना दिले आहेत.
शहरात झालेल्या रस्ते अपघातात गेलेले बळी या अतिशय दुर्देवी घटना असून या घटनांची पुनरावृत्ती होवू नये, या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे कडक निर्देश पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रशासनाला दिले आहेत.


रविवार, जुलै ०१, २०१८

मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर/ललित लांजेवार:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वडाळा गावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद श्रीरामे असं आरोपीचं नाव आहे. गावातील दोन लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हे पत्र त्यांच्या नावाने लिहीले होते.
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या महिन्यात मंत्रालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना लक्ष करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नक्षलीविरोधी कारवाई केल्यामुळे ते पत्र आलं होतं. आता हे इतरांना त्रास देण्यासाठी हे पत्र लिहिलं असल्याची प्राथमिक माहिती असली तरी पोलीस याची कसून चौकशी करत आहेत. मात्र अश्या निनावी पात्रांनी खळबळ माजविणाऱ्याना विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी !

मंगळवार, जून १९, २०१८

आता होणार पीक कर्ज वाटपासाठीप्रत्येक तालुक्यात मेळावे

आता होणार पीक कर्ज वाटपासाठीप्रत्येक तालुक्यात मेळावे

ना.मुनगंटीवार यांचे निर्देश
सुधीर मुनगंटीवार साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य शासनाने महा कर्जमाफीनंतर येत्या हंगामामध्ये खरिपासाठी शेतकऱ्यांना सुलभ व सहज कर्ज मिळावे, यासाठी उपाय योजना केली आहे. तथापि चंद्रपूर जिल्हयात काही ठिकाणी शेतकऱ्यांना बँकेमध्ये सुलभतेने कर्ज दिले जात नसल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी शेतक-यांच्या हातात पीककर्ज मिळावे, यासाठी जिल्हयातील सर्व यंत्रणांना सक्रीय करुन तालुकास्तरावर खरीप पिक कर्ज वाटपासाठी मेळावे घेण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. पात्र असणाऱ्या कोणताही शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी नव्या हंगामात खरीप पीक कर्जासाठी पात्र आहेत. तथापि असे असताना देखील काही बँकाकडून शेतकऱ्यांची कागदपत्रांसाठी किंवा थकित दाखवून कर्ज देण्यासाठी हरकत घेतली जात आहे. ही बाब योग्य नसून गावागावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, बँक शाखा व गावातील चावडी मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे या यादीमध्ये नाव असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळायला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांना सन 2018-19 या वर्षात शेतक-यांना अधिकाधिक लाभ देण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यासाठी बँकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. राज्य शासनाने 2018-19 या वर्षासाठी चंद्रपूर जिल्हयाचा कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चंद्रपूर जिल्हयात 15 जूनपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बॅकेच्यामाध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील 41 हजार 764 शेतक-यांना 296 कोटी 59 लाख 61 हजार रुपयाचे खरीप पीक कर्जाचे वाटप शेतक-यांना करण्यात आले आहे.
दिलेल्या उद्दिष्टांपैकी फार कमी कर्ज वाटप जिल्हयात झाले असून बँकांनी ही बाब लक्षात घ्यावी तसेच बँकांनी पेरणीचा हंगाम बघता तातडीने शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, असे आव्हान त्यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शीर्ष बँक व अधिनस्त सर्व बँकांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या यंत्रणेमार्फत कर्जवाटपाच्या प्रक्रियेवर लक्ष वेधावे असेही त्यांनी सुचविले आहे. ज्या बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी मागेपुढे पाहत असतील त्या बँकेवर आवश्यक कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवार, जून ०९, २०१८

या विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात पाण्याचे ATM

या विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात पाण्याचे ATM

चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्रांचे लोकार्पण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावातील नागरिकाला पिण्‍यासाठी शुध्‍द पाणी मिळावे हा मी केलेला संकल्‍प आज पूर्णत्‍वास आला याचा मला आनंद आहे. चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये आज जलशुध्‍दीकरण संयंत्र अर्थात वॉटर एटीएम जनतेच्‍या सेवेत रूजु झाले आहेत. बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात वॉटर एटीएम बसविण्‍यात येतील आणि हा मतदार संघ अशा पध्‍दतीने नागरिकांना शुध्‍द पाणी देणारा देशातील एकमेव मतदार संघ ठरेल असे प्रतिपादन अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर तालुक्‍यातील दुर्गापूर परिसरात जलशुध्‍दीकरण संयंत्राच्‍या लोकार्पण सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, वर्षभरापूर्वी जेव्‍हा मी या परिसरात आलो असता वेकोलि च्‍या कॉलनीत शुध्‍द पाणी मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्‍या होत्‍या. त्‍याचवेळी मी प्रत्‍येक गावात जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याचा संकल्‍प केला होता. पहिल्‍या टप्‍प्‍यात उर्जानगर, कोठारी, विसापूर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना मी लोकार्पित केल्‍या. मुल आणि बल्‍लारपूर तालुक्‍यासाठी अनुक्रमे ३८ व ४७ कोटी रू. खर्चुन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण करीत आहोत. त्‍यानंतर मुल तालुकयातील उथळपेठ येथे वॉटर एटीएम बसविण्‍याचा पहिला प्रयोग मी केला. तेथील सरपंचांनी मला दिलेल्‍या माहितीनुसार त्‍या गावातील ९५ जार संपुष्‍टात आले आहेत. याचा अर्थ आजार होण्‍यामागील प्रमुख कारण अशुध्‍द पाणी आहे. म्‍हणूनच या मतदार संघातील प्रत्‍येक गावात वॉटर एटीएम बसविण्‍याचा संकल्‍प मी केला, असेही ते म्‍हणाले.
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्‍यक्‍त करत ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, भेल आणि महानिर्मीती या कंपन्‍यांच्‍या सीएसआर निधीतुन चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याची विनंती मी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. त्‍यांनी ती तात्‍काळ मान्‍य केली. या परिसरातील उष्‍णता लक्षात घेता या जलशुध्‍दीकरण संयंत्राला चिलर बसविण्‍याची विनंती मी त्‍यांना केली. ती सुध्‍दा त्‍यांनी तात्‍काळ मान्‍य केली. आता शुध्‍द पाण्‍यासह थंड पाणी सुध्‍दा नागरिकांना प्‍यायला मिळणार आहे. ही संयंत्रे देखभाल व दुरूस्‍तीसाठी आपण महिला बचतगटांना देत आहोत. १५ हजार कुटूंबांना जार आणि कार्ड आपण देत आहोत. या पुढील टप्‍प्‍यात बल्‍लारपूर तालुक्‍यात वे.को.लि. च्‍या माध्‍यमातुन २९ ठिकाणी जलशुध्‍दीकरण संयंत्र आपण बसविणार असुन टप्‍प्‍या टप्‍प्‍याने संपूर्ण मतदार संघात प्रत्‍येक गावात हे संयंत्र बसविण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते प्रमोद कडू, रामपाल सिंह, रामू तिवारी, हनुमान काकडे, रोशनी खान, शांताराम चौखे, लोकचंद कापगते, विलास टेंभुर्णे, वनिता आसुटकर, संजय यादव, फारूख शेख आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते उर्जानगर येथील केसरीनंदननगर, कोंडी, दुर्गापूरातील वार्ड नं. 2 आझाद चौक, वे.को.लि. कॉलनी, लख्‍मापूर या ठिकाणी जलशुध्‍दीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्‍यात आले. अन्‍य गावांमध्‍ये भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्‍या हस्‍ते ही संयंत्रे लोकार्पित करण्‍यात आली.
प्रत्‍येक गावात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. नागरिकांना पिण्‍याचे शुध्‍द व थंड पाणी मिळणार असल्‍याने नागरिकांमध्‍ये आनंद व उत्‍साह दिसुन येत होता. तशा भावना सुध्‍दा नागरिकांनी व्‍यक्‍त केल्‍या. या लोकार्पण सोहळयाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
वेकोलि दुर्गापूर कॉलनी, ऊर्जानगर, समतानगर, आयुषनगर, नेरी, दुर्गापूर वार्ड क्र. 1, भटाळी, किटाळी, पायली, चिंचोली, वढोली, कढोली, विचोडा, मोहुर्ली, डोणी, चोरगांव, आंभोरा, वरवट, अडेगांव, चिचपल्‍ली, जांभर्ला, जुनोना, अजयपूर, टेमटा, लोहारा, घंटाचौकी, बोर्डा, वलनी, दुधाळा, पहामी, पेठ, नंदगूर, पिंपळखुट, हळदी, झरी, नागाळा (म.), गोंडसावरी, चक मरारसावरी, झोपला मारोती, मामला, वायगांव, चक निंबाळा, निंबाळा, ऊर्जानगर येथील केसरीनंदन नगर, दुर्गापूर वार्ड क्र. 2 येथील आझाद चौक, लख्‍मापूर, ऊर्जानगर परिसरातील कोंडी या ठिकाणी सदर जलशुध्‍दीकरण संयंत्रे लोकार्पित करण्‍यात आली.