Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मारहाण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मारहाण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जून ०९, २०१८

चंद्रपुरात किडणी चोर असल्याच्या संशयावरून मंदबुद्धी तरुणास बेदम मारहाण

चंद्रपुरात किडणी चोर असल्याच्या संशयावरून मंदबुद्धी तरुणास बेदम मारहाण

नागपूर/ललित लांजेवार:
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सोशल मीडियातून किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा चांगलीच पसरली आहे, अश्यातच  शनिवारी चंद्रपूर येथील रयतवारी परिसरातील बी.एम.टी चौका नजिक दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान एक मंदबुद्धी तरुण भटकत असतांना त्या तरुणाला किडनी चोर असल्याच्या संशयावरून नागरिकांनी बेदम मारहाण केली. विवेक नगराळे असे या मंदबुद्धी असलेल्या तरुणाचे नाव असून तो राजुरा जवळील चुनाळा येथील असल्याचे सांगितल्या जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास रयतवारी परिसरातील बी.एम.टी चौकाजवळ परिसरातील काही लहान मुले खेळत होती आधीच संपूर्ण जिल्ह्यात किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली असतांना अश्यातच मंदबुद्धी विवेक हा या मुलांच्या अवती भवती वावरतांना दिसला तेव्हा परिसरातील महिलांना विवेकवर संशय आला आणि त्याला तेथील  महिलांनी किडणी चोर व लहान मुलांना पळविणाऱ्या टोळीतील व्यक्ती असल्याचा संशयावरून चांगलीच मारहाण केली, यानंतर तेथील युवकांनी त्याला जखमी अवस्थेतच दुचाकीवर बसवून रामनगर पोलिसात आणले, रामनगर पोलिसांनी चौकशी केली असता तो मंदबुद्धी असल्याचे निष्पन्न झाले,मारहाणीत विवेक जखमी झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले व त्याच्या परिवाराला बोलावून त्याला सुपूर्त करण्यात आले.
 विवेक हा मंदबुद्धी असल्यने तो गेल्या बऱ्याच दिवसापासून कुठेही फिरत असल्याचे चौकशी दरम्यान समजले  ,तर त्याच्या अश्या वागण्याने देखील घरच्यांनी त्याला वाऱ्यावर सोडल्याचे समजते.  असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपासून कोठारी परिसरात घडत आहे.कोठारी व परिसरातील अनेक गावांत किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात असून नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.  सोशल मीडियातून व्हिडिओ चित्रफित व मॅसेज वायरल करण्याच्या घटना वाढतच आहे़ त्यामुळे अशी अफवा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी  नजर ठेवणे आवश्यक आहे,अश्या अफवांच्या आधारावर अनोळखी इसमांना पकडून त्यांचेकडे संशयतेने बघितले जात आहे.व संशयतांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन न करता व कोणतीही शहानिशा न करता त्यांना बेदम मारहाण केली जात आहे.सदर घटनेत देखील नागरिकांनी कायदा स्वताच्या हातात घेतल्याचे चित्र दिसून आले व एका निरपराध मंदबुद्धी व्यक्तीला विनाकारण मारहाण करण्यात आली,अश्या घटनांकडे पोलिसांनी जातीने लक्ष घालून जनजागृती करण्याची आवश्यकता या प्रकारावरून दिसून येत आहे.

शुक्रवार, मार्च ३०, २०१८

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 सन्मित्र सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलांनी शाळेची भिंत ओलांडून पळून जात फोनवरुन पालकांना ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने थोडी शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
चंद्रपूर येथील सन्मित्र सैनिकी शाळेतील घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शाळेतील इयत्ता नववीच्या मोहीत उज्वलकर आणि जगजितसिंग भट्टी यांनी शाळेची भिंत ओलांडून पळ काढला. शाळेतील सैनिकी शिस्तीचे कमांडंट सुरिंदर राणा यांनी आपल्याला आणि बहुतांश विद्यार्थ्यांना अनावश्यक मारहाण केली, असा आरोप या मुलांनी केला आहे. या मुलांनी पळून गेल्यावर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलातून पालकांशी संपर्क साधला. यांनतर ही घटना उजेडात आली. 
या मुलांना घेऊन पालक थेट चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. कमांडंट राणा मुलांना सिगरेट आणण्यासाठी दबाव आणत होते. त्यातूनच ही मारहाण झाली आहे. इयत्ता नववीची एक प्रश्नपत्रिका फुटल्याचा या विद्यार्थ्यांवर केलेला आरोप, हे अन्य कारण असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या मुलांना झाडाला बांधून दंडुक्याने मारहाण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी त्याचे वळ देखील दाखवले.
सन्मित्र सैनिकी शाळेच्या कमांडंटचे हे कृत्य अमानूष आहे. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या व्यक्तीविरोधात गुन्हे दखल करून कारवाई करावी. तसेच सन्मित्र सैनिकी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी संतप्त पालकांनी यावेळी केली आहे. 
सन्मित्र सैनिकी शाळेशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हे २ विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले होते. यांच्याजवळ सिगरेट असल्याची माहिती पालकांनी फोनवरून व्यवस्थापनाला दिली होती. त्यानंतर घेतलेल्या झडतीत त्यांच्या पेटीत सिगरेट - तंबाखू- खर्रा आढळला होता. त्यानंतर त्यांच्यावर सैनिकी शाळेच्या शिस्तीनुसार थोडी शिक्षा करण्यात आली. मात्र, त्यात कुठलाही अमानुषपणा नव्हता, असे प्राचार्यांनी सांगितले. आम्ही या घटनेची चौकशी करत असून, पोलिसांना देखील सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नावाजलेली शाळा म्हणून सन्मित्र सैनिकी शाळेची ओळख आहे. अशा शाळेसंदर्भात मारहाण आणि विद्यार्थी पलायनाचे प्रकरण पुढे आल्याने घटनेतील सत्यता पुढे यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

बुधवार, मार्च १४, २०१८

जमिनीच्या वादातुन पोलीसाला मारहाण

जमिनीच्या वादातुन पोलीसाला मारहाण

आरोपींच्या विरूद्ध गुन्हा दाखल
पोलिसांना मारहाण साठी इमेज परिणामरामटेक तालुका प्रतिनिधी: 
रामटेक तालुक्यातील मौजा भंडारबोडी येथे शेतजमीनीची मोजणी करतेवेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस हेड काॅंस्टेबल संजय रामलाल तिवारी व त्यांच्यासोबतच्या महीला पोलीस कर्मचारी यांना आरोपींनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली.दिनांक 14 मार्च 2018 चे दुपारी 1.30 वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक वृत्त असे की,भंडारबोडी येथील शेतजमीन मोजणी प्रकरणात रीतसर अर्ज व संबधित रकमेचा भरणा करुन पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.सरकारी आदेशानुसार तिवारी व महीला पोलीस कर्मचारी भंडारबोडी येथे कर्तव्यावर हजर असतांना तिथे त्याच गावातील रामराव सोमा कुथे,इंदिरा कुथे,निर्मला नाकाडे,राजकुमार नाकाडे,अरुण नाकाडे व रंजना कुथे यांनी मोजणी करणारे कर्मचारी यांचेशी हुज्जत घातली.त्पामुळे तिवारी व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र ऊपरोक्त आरोपी हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.त्यंनी मध्यस्थी करीत समजूत घालण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पोलीसांना मारहाण केली.
तिवारी यांचे तक्रारीवरुन आरोपींविरूद्ध भादंवी च्या 332,353 व 143 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व काही आरोपींना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.पो.ऊपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे पुढील तपास करीत आहेत.

सोमवार, मार्च १२, २०१८

सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण

सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण

मीरारोड(ऑनलाईन काव्यशिल्प ):
The teacher was assaulted by a sixth student as he did not give up on math solving | गणित सोडवताना हाच्चा दिला नाही म्हणून सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण
 मीरा भार्इंदर महापालिकेच्या मुर्धा गावातील मराठी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थीनीने हाच्चा दिला नाही म्हणून शिक्षिकेने काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
मुर्धा गावात महापालिकेची मराठी शाळा असून सदर शाळेत शिकणारी ११ वर्षाची विद्यार्थिनी ही ६ वी इयत्तेत शिकते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी शाळेची वेळ आहे. आज सोमवारी नेहमीप्रमाणे ही विद्यार्थीनी शाळेत गेली. दुपारी वर्ग शिक्षिका सायली पिंपळे या गणिताची चाचणी घेत होत्या. त्यावेळी फळ्यावर गणित सोडवण्यास सदर विद्यार्थिनीस सांगितले असता भागाकार करताना हाच्चा लिहायाचे राहिले जेणे करुन संपूर्ण गणित चुकले. याने संतप्त झालेल्या पिंपळे यांनी काठी विद्यार्थिनीच्या दंडावर जोरात मारली. तसेच तिच्या डोक्यावर देखील मारहाण केली.
शाळा सुटेपर्यंत ती विद्यार्थिनी वर्गात हात दुखत असताना देखील तशीच बसून होती. तिच्या दंडावर मारहाणीमुळे मोठा व्रण आला होता. सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी गेली असता घडला प्रकार आईला कळला. अखेर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. त्या शिक्षिकेस आम्ही पोलीस ठाण्यात बोलावले असून चौकशीनंतर पुढील कार्यवाहीचे ठरेल असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

आमदार बाळू धानोरकर यांचे सोबत ६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल;वीज टॉवर उभारणी प्रकरण

आमदार बाळू धानोरकर यांचे सोबत ६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल;वीज टॉवर उभारणी प्रकरण

चंद्रपूर:(ललित लांजेवार):
वीज टॉवर उभारणीचे काम करीत असलेल्या एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण करणारे वरोराचे शिवसेना आमदार बाळू  धानोरकर यांच्यासह ईतर ६ कार्यकर्त्यांवर राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
राजुरा आणि कोरपना तालुक्यात KEC ही कंपनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतात वीज टॉवर उभारत होते,याला शेतकऱ्यांनी कित्तेकदा विरोध केला मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता या कंपनीने आपले काम सुरूच ठेवले. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा अशा २ राज्यातून येणा-या भल्या मोठ्या वीज टॉवर लाईन उभारल्या जात आहेत. हे काम करण्यासाठी हजारो हेक्टर उभ्या शेतजमिनीतुन पीक तुडवत काम सुरु आहे. हे काम कोणत्याही शेतक-याच्या मर्जीने कायद्यानुसार होत नाहीये.त्यामुळे चिडलेले शेतकरी यांनी हे वरोराचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्याकडे पोहचले.धानोरकर यांनी देखील अनेकदा सांगून न ऐकणाऱ्या कंपनीला हिंगा दाखवत कंपनीच्या एका व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला,कार्यकर्त्याने काठीने मारत आमदार धानोरकर यांनी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाच्या थोबाडीत लावली, या मारहाणीच्या विरोधात कंपनीच्या कर्मचारी अबुजकुमार सिंग रा.गडचांदूर याने राजुरा पोलिस स्टेशन येथे आमदार बाळू धानोरकर यांच्यासह ६ कार्यकर्त्यांन विरोधात कलम १८ ,१४३,१४७,१४८,३२३ अंतर्गत गुम्हा दाखल करण्यात आल आहे .