Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

परभणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परभणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, मार्च २५, २०२१

 नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांची निवड

नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांची निवड


परभणी - येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रा मध्ये सदा अग्रेसर असलेले तरुण तडफदार युवा नेते,सा. जन आक्रोश संपादक मयूर चंद्रकांतराव देशमुख याची आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारचे संघटन असलेल्या नवी दिल्लीच्या इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी निवड आली

इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कुमार कोठेजा , महाराष्ट्र वुमेन्स विंगच्या राज्य संघटक सचिव श्रीदेवी पाटील , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे मराठवाडा कार्याध्यक्ष धाराजी भुसारे , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन  परभणी जिल्हा अध्यक्ष मदनजी कोल्हे , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन  हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धारजे या मान्यवरच्या हस्ते या बाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र देण्यात आले.
परभणी येथील राजकीय , सामाजिक क्षेत्रात तरुण , तडफदार आणि धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांचे नाव घेतले जाते .  
मयूर मोरे यांनी पत्रकारितेची सुरुवात साप्ताहिक जन आक्रोश मधून 2017 पासून सुरु केली असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या जन आक्रोश या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत . आपल्या पेपर च्या माध्यमातून समाजात पर्यावरण संरक्षण महत्व वाढावे व नवोदित साहित्यिकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले .
विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने आंदोलने करून मोर्चे काढून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. (NSUI) नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (विद्यार्थी काँग्रेस) या संघटनेच्या ते महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पदाला पूर्णपणे न्याय देताना मयूर मोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्ह्यातील अनेक तरुणा मधील सामाजिक भान हेरून त्यांनी या तरुणाना पुढे आणत एकत्र केलं आहे. त्यांचे सहकार्य घेत त्यांनी जिल्ह्यातील गावागावात संघटनेची पाळेमुळे रोवली आहेत. आणि याच माध्यमातून त्यांनी तळागाळातील विध्यार्थीच्या प्रश्न समजून घेऊन त्यांना वाचा फोडण्याचे, तसेच ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मयूर मोरे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यते प्राप्त काम करणारी, संपूर्ण भारतातील तसेच काही दिवसांपूर्वी जागतिक पातळीवर पोचलेली सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असो. या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या परभणी शहर अध्यक्षपदी श्री. मयूर मोरे (देशमुख) यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे .
यावेळी देवानंद वाकले , अब्दुल रहीम , महमूद खान , विजय चट्टे रामेश्वर शिंदे , प्रवीण मोरे , आदी पत्रकार उपस्थिती होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची परभणी शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभय देशमुख , सचिन जवंजाळ , राजपाल शिंदे तसेच सर्व क्षेत्रातून अभिनंदन वर्षाव होत आहे

बुधवार, एप्रिल २९, २०२०

पाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर

पाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर

मुलाच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह
सदर कुटुंब औरंगाबादहून गावात आले होते




हिंगोली/ प्रतिनिधी - सेनगाव तालुक्यातील क्वारंटाइन सेंटर मधील 5 वर्षाचा बालक पॉझिटिव आला असून त्याबाबतचा अहवाल मंगळवारी (27 एप्रिल) सकाळी शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.

जिल्हाभरात मोठ्या शहरातून येणाऱ्या गावकऱ्यांची गावपातळीवर माहिती घेऊन त्यांना तातडीने क्वारंटाइन केले जात आहेत. त्यानुसार सेनगाव तालुक्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या 61 गावकऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 51 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दहा जणांचा अहवाल येणे बाकी होते. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये पाच वर्षांचा बालक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.


दरम्यान सदर मुलाचे आई-वडील औरंगाबाद येथे कामासाठी गेले होते. लॉकडाउननंतर ते सर्वजण सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे गावात आले. सदर कुटुंब औरंगाबाद येथून आल्याची नोंद झाल्यानंतर त्यांना तातडीने सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल यांच्या पथकाने या गावकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. या गावकऱ्यांपैकी 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आज सकाळी एका पाच वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यानंतर आरोग्य विभागामध्ये धावपळ सुरु झाली.

गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू
यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन जांभरून रोडगे गावांमध्ये तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय गाव सील करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील दोन दिवस जांभरून रोडगे या गावामध्ये सर्वेक्षणाचे काम केले जाणार असून सर्दी ताप खोकला असलेल्या रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल यांनी सांगितले की सदरील बालक जाभरून रोडगे येथील असून त्याचे कुटुंबीय 20 एप्रिल रोजी गावात आले होते. त्यानंतर तातडीने त्यांना सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या आई-वडिलांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.


गावकर्‍यांनी घाबरून जाऊ नये : रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी

सेनगाव तालुक्यातील पाच वर्षांचा बालक आल्यानंतर त्या गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतले जात आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गावकऱ्यांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.

गुरुवार, एप्रिल २३, २०२०

कलेक्टर व तहसीलदार येण्याची अफवा करून गर्दी जमवली

कलेक्टर व तहसीलदार येण्याची अफवा करून गर्दी जमवली



१२५ जणांसह पत्रकारांवर गुन्हा दाखल


परभणी /प्रतिनिधी
पालम : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस निरीक्षक सुनील माने आणि त्यांच्या टीमने गावातील 125 व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात बोलताना पोलिस निरीक्षक सुनील माने म्हणाले. की पारवा गावात विविध अडचणी सोडविण्यासाठी गावातील काही मंडळींनी लाऊड स्पीकर द्वारे गावातील लोक जमा केले. वास्तविक कलेक्टरांचे जमावबंदी आदेश आहेत. सध्या या कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी गर्दी जमा होऊ नये असेही आदेश आहेत.परंतु पारवा गावातील लोकांनी याचे उल्लंघन केले. तसेच तहसीलदार आणि कलेक्टर येणार आहेत अशा अफवा पसरविल्या. त्याच प्रमाणे काही मिडीयाला देखील मुलाखती दिल्या. त्यामुळे पत्रकारावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली. या गावातल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तहसीलदार आणि परभणीचे कलेक्टर येणार आहेत. अशा आशयाच्या अफवा उठवीत गावातील लाऊड स्पीकर द्वारे घोषणा करून जमावबंदी असताना गर्दी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून गावातील 125 जणांसह पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना घडलीय. पालम तहसील कार्यालयाचे मंडळ निरीक्षक कालिदास शिंदे यांनी यासंदर्भात पालम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे या तक्रारी नुसार गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरक्षक सुनिल माने याच्या मार्गदर्शनाखाली फोजदार सचिन ईगेवाड तपास करत आहेत.

मंगळवार, एप्रिल २१, २०२०

२३ तारखेपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी दोन दिवसात ग्रेडर नेमण्याचे दिले आदेश

२३ तारखेपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी दोन दिवसात ग्रेडर नेमण्याचे दिले आदेश

आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य - पालकमंत्री धनंजय मुंडे


जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक




परभणी : प्रतिनिधी( बिड) :-
दि. २१ कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे, येथून पुढे देखील सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

यावेळी राज्य सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग सह खबरदारी पाळत कापूस खरेदी केंद्रांवर येत्या २३ तारखेपासून कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश ना. मुंडेंनी दिले. तसेच हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी दोन दिवसाच्या आत ग्रेडर नेमण्याचे आदेशही ना. मुंडेंनी संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील हे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, करोणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगले काम झाले आहे परंतु येथून पुढे देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरील जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देत आहोत, या प्रसंगी योग्य ती काळजी घेतली जावी. इतर जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने प्रवासी जिल्ह्यात येऊ नये यासाठी देखील खबरदारी घेतली जावी असे ते म्हणाले. तसेच यासाठी पोलीस बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना श्री. मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना केल्या.

  मंत्री महोदयांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करताना कोणताही भेदभाव अथवा तक्रारी होऊ नये यासाठी लक्ष दिले जावे . अंबाजोगाई येथे कोरोना विषाणूचे नमुने तपासण्यासाठी लवकरच तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाचा आवारात सुरु होणाऱ्या केंद्रात काम वेगात केले जावे. 

           शेतकऱ्यांच्या बाबत देखील संवेदनशील राहून उपाययोजना केल्या जाव्यात , फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना विक्री करण्यासाठी अधिक सोयीस्कर निर्णयाची अंमलबजावणी केली जावे, शासनाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जावी असेही यावेळी त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री . रेखावार म्हणाले की, रेशन कार्डधारकांसाठी मंजूर धान्य नियतन सर्व स्वस्त धान्य दुकानात पर्यंत पोहोचविण्यात आले आहे याच बरोबर साखर चे नियतन देखील जिल्ह्यात प्राप्त झाले असून एप्रिल ते जूनपर्यंते पात्र लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे. कोरोना विषाणूची नमुने तपासण्यासाठी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वतंत्र इमारत तयार होत असून त्यासाठी यंत्र व साहित्य सामग्री देखील लवकरच प्राप्त होत आहे.

 पोलीस अधीक्षक श्री पोद्दार यांनी आज दुपारपर्यंत जिल्ह्यात 6740 ऊसतोड कामगार आले असल्याचे आकडेवारी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभार, डॉ. थोरात डॉ. पवार व श्री. आघाव पाटील आदींनी यावेळी माहिती सादर केली.

सोमवार, एप्रिल २०, २०२०

घरगुती विज ग्राहक व शेतक-यांचे सरसगट विजबील माफ करा : नदीम ईनामदार

घरगुती विज ग्राहक व शेतक-यांचे सरसगट विजबील माफ करा : नदीम ईनामदार

उर्जामंत्र्याकडे केली मागणी - उद्योगधंदे बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ





परभणी : प्रतिनिधी
देशात व राज्यात कोरोना या विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन कऱण्यात आले आहे त्यातल्या त्यात परभणीत मागील तीन दिवसापासून संचारबंदी लावण्यात आली होती.याकाळात लहान उद्योग, दुकाने, गॅरेज, बांधकाम व व्यवसाय मागील २५ दिवसापासून बंद असल्यामुळे या ठिकाणी काम करणारे कारागीर,मजुर, मिस्त्री, खाजगी नौकर किंवा लहान मोठे व्यवसाय करून आपल्या परिवाराची उपजिवीका भागविणाºयांचे हाल होत आहे. या काळात सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे १००युनिटच्या आत घरगुती वीज ग्राहक व शेतक-यांचे विजबील सरसगट माफ करण्याची मागणी कॉग्रेसचे शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी केली. कॉग्रेसच्या पक्षाच्यावतीने अनेकांना मदत करण्याचे कार्य सुरु असून अन्नधान्य वाटपही करण्यात येत आहे.जिल्हयात आजतागायत २ लाख वीजग्राहक आहेत. त्यापैकी १५९००० हे घरगुती तर ३० हजार कमर्शीयल, ३ हजार आयपी, ग्राहक व मोठे एस.टी. १५० असे मिळून २ लाख ग्राहक आहेत. अशा ग्राहकांना १०० युनिटच्या आत वीजबील माफ करण्याची मागणी जिल्हाधिकाºयामार्फत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार, नगरसेवक मोईन मौली, विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख आदींच्या स्वाक्षºया आहेत.
14 लाख 87 हजाराचा गुटख्याचा साठा जप्त

14 लाख 87 हजाराचा गुटख्याचा साठा जप्त

पालम पोलीसांची धाडशी कामगिरी




तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल


परभणी प्रतिनिधी:- गोविंद मठपती
पालम :- शहराजवळील पेठपिंपळगाव रस्त्यावरील मोकळ्या मैदानावर एका ऑटोमधून पालम पोलिसांनी गोवा गुटख्याचा खचाखच भरलेल्या बॅगा जप्त केल्या आहेत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्यासह फोजदार विनोद साने व जगदीश काळे, आशोक केदारे, व्यकटी यवते, गवळी हे शनिवारी दि.18 च्या रात्री पेट्रोलिंग करीत आसताना पेठपिंपळगाव रस्त्यावर ऑटो (क्रमांक एम.एच. 26 बीई 56 45 ) संशयित स्पदरित्य आढळून आला त्यावेळी पोलिस पथकातील वाहनचालक प्रभाकर शिवाजी रूद्रघाटे यांच्या मदतीने पाहणी केली तेव्हा ऑटोत खचाखच भरलेल्या गुटख्या बॅगा दिसून आल्या तो माल लोहा येथील अनिल उत्तम कदम यांचा असल्याचा व ते स्वतः वाहनासोबत पालमला आल्याचे वाहनचालकाने म्हटले तो गुटख्याचा माल लक्ष्मण केरबा पवार (रा.शेखराजूर ता.पालम ) यांना देण्याकरिता आणला होता परंतू वाहन मालक व लक्ष्मण पवार हे दोघे पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले असल्याचे वाहनचांलकांनी म्हटले या पथकाने तातडीने तो गुटख्याचा माल पोलिस ठाण्यात आणला पाठोपाठ परभणी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या माघ्यमातून पंचनामा केला तेव्हा अंदाजे 14 लाख 87 हजार 850 रूपायांचा गुटख्या आसल्याचे निदर्शनास आले दरम्यान प्रभाकर शिवाजी रूद्रघाटे, अनिल उत्तम कदम व लक्ष्मण केरबा पवार या तिघां विरूध्द पालम पोलिसं ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार, एप्रिल १९, २०२०

परळीतील थर्मल टेस्टिंगच्या तिसऱ्या दिवस अखेर एकूण ३६ हजारहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण

परळीतील थर्मल टेस्टिंगच्या तिसऱ्या दिवस अखेर एकूण ३६ हजारहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण



परभणी(प्रतिनिधी) :- गोविंद मठपती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या 'नाथ प्रतिष्ठान' व मुंबई येथील 'वन रुपी क्लिनिक'च्या माध्यमातून परळी मतदारसंघात नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग सुरू आहे. आज तिसऱ्या दिवस अखेर परळी शहरातील एकूण ३६ हजारहून अधिक नागरिकांची थर्मल टेस्टिंग च्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.

थर्मल टेस्टिंगच्या तिसऱ्या दिवशी आज शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये हालगे गल्ली, गांधी मार्केट, हमालवाडी, हिंद नगर, भवानी नगर, विवेकानंद नगर, पोपळे गल्ली, स्वाती नगर, प्रेम प्रज्ञा नगर, जय नगर आदी भागांमध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन ही तपासणी करण्यात आली. आज तपासणीची सुरुवात परळीच्या नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांची प्रथम तपासणी करून करण्यात आली.

आज तिसऱ्या दिवशी एकूण १४६५० नागरिकांची थर्मल टेस्टिंग करण्यात आली असून अगदी नगण्य स्वरूपात १४ नागरिकांना ताप सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना कोरोना चाचणीचा (swab test) सल्ला दिला असल्याचे वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष चंदूलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, बाबासाहेब बळवंत, चेतन सौंदळे, जयपाल लाहोटी, पप्पू पाटसकर, देवेंद्र कासार, पिंटू सारडा, कुमार केदारी, कुमार व्यवहारे, नणेश जाजू यांसह आदींनी नागरिकांशी समन्वय साधून यशस्वी टेस्टिंग करून घेतले. या टेस्टिंगला मतदारसंघातून वरचेवर प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे.
केवळ पाच रुपये प्रमाणे तीनशे गरजूंना मिळणार 'शिवभोजन'

केवळ पाच रुपये प्रमाणे तीनशे गरजूंना मिळणार 'शिवभोजन'

जिल्हास्तरावरची योजना धनंजय मुंडेंनी पोचवली तालुक्यावर; शिवभोजन थाळीच्या तीन केंद्रांचा परळीत शुभारंभ




परभणी(प्रतिनिधी) :- गोविंद मठपती
महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तालुका स्तरावर पोहचवले असून परळी शहरात आज नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते तीन शिवभोजन थाळी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.

शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरजूंची भूक भागवण्यास मदत होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही योजना पोचवणार असल्याचे ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच परळीत कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याचा माणसही त्यांनी व्यक्त केला आहे.

परळीत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राद्वारे लॉकडाऊनच्या काळात केवळ पाच रुपये प्रमाणे गरजूंना भोजनाचे डबे पुरवले जाणार असून प्रत्येक केंद्रातून १०० असे एकूण ३०० डबे रोज पुरवले जाणार आहेत.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने राज्यात शिवभोजन थाळी चा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला ही योजना जिल्हास्तरावर होती. बीड जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची संख्या बघता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बीड जिल्ह्यात तालुका स्तरावर ही योजना सुरू करण्याबाबत विनंती केली होती; शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत बीड जिल्ह्यात शिवभोजन थाळी या मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात आज परळीतून केली आहे.

यामध्ये वैद्यनाथ मंदिर परिसरातील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनगृह आणि रेल्वे स्थानकासमोरील पंचवटी भोजनालय या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी उदघाटन किंवा अन्य कोणताही बडेजाव न करण्याच्या सूचना ना. मुंडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते गरजूंना थाळीचे प्रत्यक्ष वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, माजी उपनगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, राजाभैय्या पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माणिक भाऊ फड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माऊली फड, सचिव बलविर रामदाशी, राजेश विभूते, रमेश चौंडे, अतुल दुबे, अनंत ईंगळे, मनजीत सुगरे, सुरेशनाना फड, अनिल लाहोटी, राकेश चांडक, उमेश टाले, संतोष पंचाक्षरी, वैजनाथ कळसकर, मोहन साखरे, कचरूलाल उपाध्याय, दामजी पटेल, संजय स्वामी, नरेश साखरे, तसेच पत्रकार मोहन व्हावळे, धीरज जंगले, दिलीप बद्दर, महादेव गित्ते, जयराम गोंडे, रणजित सुगरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी तीन केंद्रे व कम्युनिटी किचन लवकरच...

दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या वतीने परळीत आणखी तीन शिवभोजन केंद्र उभारणे प्रस्तावित असून एक कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर अशा प्रतिकूल परिस्थितीतही गोरगरीब गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू केल्याबाबद्दल नागरिकांनी ना. मुंडेंचे आभार मानले आहेत.
छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना मोफत भोजन उपक्रम

छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना मोफत भोजन उपक्रम




परभणी/प्रतिनिधी -गोविंद मठपती
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सध्या सर्वत्र संचारबंदी सुरू आहे .या काळात परभणी येथील छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील गरजूंना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. दिनांक 28 मार्च पासून हा उपक्रम सुरू असून दररोज तीनशे लोकांना मोफत अन्नाची पाकिटे वितरित करण्यात येत आहेत. यासाठी परभणी शहरातील धाररोड येथे स्वतःच्या प्लॉटमध्ये जेवण तयार करण्यासाठी शेड तयार करण्यात आले असून दहा महिलांना भोजन तयार करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. संचार बंदीच्या काळात शहरातील निराधार नागरिक , मोल मजुरी करणारे तसेच सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नातेवाईक अशा 300 गरजूंना मोफत अन्नाची पाकिटे वितरीत करण्यात येत आहेत .संस्थेचे अध्यक्ष किशोर रणेर ,अमोल गिरवलकर ,रवी घायाळ, श्रावण वैरागड, संतोष वर्मा आदी पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. आमदार डॉक्टर राहुल पाटील ,पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे,आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले असल्याचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किशोर रणेर यांनी सांगितले

गुरुवार, एप्रिल १६, २०२०

परभणीत तीन दिवस संचारबंदीच; रस्त्यावर आढळल्यास कठोर कार्यवाही

परभणीत तीन दिवस संचारबंदीच; रस्त्यावर आढळल्यास कठोर कार्यवाही




परभणी /प्रतिनिधी
परभणी महानगर पालीकेच्या हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असणारा रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज रात्री १२ वा. पासून सलग तीन दिवस म्हणजेच १७ ते १९ एप्रिल दरम्यान तीन दिवस संचारबंदी लागू केली आहे.
परभणी मनपा हद्दीत ही संचारबंदी तीन दिवस लागू राहणार आहे. या संचारबंदीत सर्व शासकीय कार्यालया त्याचे कमर््ाचारी त्यांची वाहने सर्व शासकीय वाहने, औषधे दुकाने , शासकीय निवारागृह , कॅम्पमध्ये अन्न धान्य वाटप करणारे प्रतिनिधी व त्याची वाहने अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतेलेली वाहने व व्यक्ती यांना सूट राहणार आहे.या शिवाय इतर कुणी व्यक्ती , रस्त्यावर बाजारात, गल्लीत किंवा घराबाहेर फिरतांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. शिक्षेस पात्र असलेला अपराध केला ़असल्याचे समजले जाईल व पुढील कार्यवाही केली जाईल. या आदेशाची अमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, सहा.आयुक्त, तालुका दंडाधिकारी यांच्यावर राहील असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला

परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला





शहरात मोठी अस्वस्थताः प्रशासन हायअर्लट


प्रतिनिधी। परभणी: गोविंद मठपती
गेल्या 15 दिवसांपुर्वी पुण्यातून परतलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून याप्रकाराने जिल्हा प्रशासन अक्षरक्षः खडबडून जागे झाले आहे.
लॉकडाऊन पहिल्या टप्प्यात 21 दिवस या जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणारा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासनाने, आरोग्य विभागाने या संदर्भात कमालीची दक्षता बाळगली. परिणामी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.असे चित्र असतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयित म्हणून दाखल केलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल गुरूवारी(दि.16) सकाळी ये़वून धडकला. त्यामुळे आरोग्य अधिका-यांसह महसुल व पोलिस प्रशासन कमालीचे हादरले आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या त्या युवकाने 15 दिवसांपुर्वीच परभणी गाठली होती. तो कुटुंबिया समवेत राहत होता. सर्दी, खोकलाच्या तक्रारीमुळे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल गुरूवारी प्राप्त झाल्याबरोबर वैद्यकीय अधिका-यांनी त्या रुग्णांची स्वतंत्र अशी व्यवस्था केली असून त्यांच्यासह वैद्यकीय निगराणी ठेवून आहेत.

कुटुंबियांची तपासणी होणार
त्या 21 वर्षीय युवकांच्या कुटुंबियांची तपासणी होणार असल्याची माहिती हाती आली असून यसंदर्भात आरोग्य विभागाने अधिक तपशील दिला नाही. त्या युवकाचे नाव, त्याचा पत्ता, भाग वगैरे बाबत गुतप्ता बाळगली जाणार आहे.

गुरुवार, मे ०९, २०१९

मुख्यमंत्र्यांनी साधला परभणी जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद

मुख्यमंत्र्यांनी साधला परभणी जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद


दुष्काळ निवारण उपाय योजनांना जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 9 : मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 58 टँकर्स देण्यात आले आहेत. अद्याप एकही चारा छावणी सुरु करण्याची आवश्यकता भासली नाही. मात्र दुष्काळ निवारण करताना या जिल्ह्यात आवश्यक असलेला पाणी पुरवठाटँकर्स व छावण्यांची आवश्यकता याचा आढावा घेऊन दुष्काळ निवारण उपाय योजनांना जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्हा प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा निवास्थान येथून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील सरपंचग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी,गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी टँकर पुरवठाचारा छावणीरोहयोची कामे आदीसंदर्भातील स्थानिक तक्रारींबाबत थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
पाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीरोहयोमधील कामे सुरळीत सुरु राहतील याची काळजी घेताना आचारसंहितेचे कोणतेही कारण जिल्हा प्रशासनाने सांगू नये असे स्पष्ट केले.
या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारीतहसीलदार व गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सरपंचांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्य शासनाने परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ निवारणाच्या या उपाय योजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होते की नाहीत्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत कायासंबंधी माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे.
सध्या आजपर्यंत परभणी जिल्ह्यात 58 टँकर सुरू आहेत. त्यामध्ये पालम तालुक्यात सर्वाधिक 18 तर पाथरीमध्ये एकही टँकर सुरु नाही. मात्र  असे असले तरी आवश्यक आहे तेथे तातडीने टँकर्सची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करावी. जिल्ह्यातील 29 विंधन विहिरी31 नळ पाणी पुरवठा योजना,7 तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना290 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींची देयके ही पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार देण्यात येणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी 226.44 लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकही चारा छावण्या सुरू करण्यात आलेली नसली तरी आवश्यक आहे तेथे शासकीय चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
श्री. फडणवीस म्हणालेजिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यातील 479 गावांमधील 2 लाख 54 हजार 589 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 181.47 कोटी दुष्काळ निधी जमा करण्यात आला आहे. पीक विमा योजनेत नोंदणी केलेल्या 5लाख 850 हजार 173 शेतकऱ्यांपैकी 1 लाख 41 हजार 352 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 61.85 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील 1.20 लाख शेतकऱ्यांपाकी 34 हजार 500 शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यातील 7 कोटी रुपये देण्यात आले असून ऊर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याची कार्यवाही सुरू आहे.
रोहयोतून 660 कामे सुरू असून त्यावर 4 हजार 542 मजूर काम करत आहेत. जिल्ह्यात 9 हजार 802 कामे शेल्फवर असून आवश्यकता असल्यास व मागणी केल्यास आणखीन कामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेतअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सरपंच संगीता मोरगिल आणि मारुती माने यांनी पालम गावात टँकर्सची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तर परभणी गावातील सरपंच तारामती दंडवते  यांनी जलयुक्त शिवाराअंतर्गत कामे मिळावी असे सांगितले. त्यावर तहसीलदार यांनी याबाबत लक्ष घालावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
सरपंच सीमा काकडेसंजय प्रधान यांनी चारा छावण्या सुरु कराव्यात तसेच सरपंच वैजनाथ कदमसुभाष जाधवगणेश काळे यांनी टँकर्स सुरु करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत मुख्यमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाने 2018 च्या लोकसंख्येनुसार आणि माणसांबरोबरच जनावरांची संख्या गृहित धरून चारा छावण्याटँकर व पाणी पुरविण्याचे नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
परभणी जिल्ह्यातील 37 सरपंचानी आज मुख्यमंत्री महोदयांशी  ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. या सर्व संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्हा प्रशासनाला टँकर मंजुरीचे व चारा छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदारांना यांना दिले तसेच याबाबत काय कार्यवाही केली याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
ऑडिओ संवादद्वारे आलेल्या तक्रारींची नोंद प्रशासनाने घेतली असून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच व्हॉटसअपवर आलेल्या तक्रारींचे शिघ्रगतीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव यु.पी.एस. मदानमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीपाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवलेमदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना- जिल्हा परभणी

• सर्व 9 तालुक्यात दुष्काळ जाहीर
• जिल्ह्यात 58 टॅकर्सनी पाणी पुरवठा;पालम तालुक्यात सर्वांत जास्त 18 टँकर्स तर पाथरी तालुक्यात एकही टँकर नाही
29 विंधन विहिरी31 नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती7 तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना290 विहिरींचे अधिग्रहण
पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची 226.44 लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.
एकही चारा छावणी सुरु करण्यात आलेली नाही
 6 तालुक्यातील 479 गावातील 2 लाख 54 हजार 589 शेतकऱ्यांना 181.47 कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 660 कामे सुरु त्यावर 4542 मजूरांची उपस्थिती. सर्वांत जास्त 1228 मजूर पूर्णा तालुक्यात तर सर्वांत कमी 110 मजूर पालम तालुक्यात
• जिल्ह्यात 9 हजार 802 कामे शेल्फवर.
• परभणी जिल्ह्यातील एकूण 5 लाख 85 हजार 173 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली.  हंगाम नुकसान भरपाई म्हणून शासनामार्फत 61.85 कोटी रुपये अदा करण्यात येणार असून आतापर्यंत 60 कोटी रुपये रक्कम 1 लाख 41 हजार 352 शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.
• प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण34 हजार 500 शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी एकूण 7 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले तर उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९

व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून 2 लाख लुटले

व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून 2 लाख लुटले

  • गंगाखेडचे प्रसिध्द व्यापारी निलेश फरकंडकर त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून चोरट्यांनी लुटले दोन लाख रुपये
  • संतोष मुरकुटे मित्र मंडळाने माणुस धर्म पाळला

गोविंद मठपती/परभणी 

 दि. 21 रोजी गंगाखेडचे प्रसिध्द व्यापारी निलेश फरकंडकर हे त्यांच्या व्यापारा निमित्त सकाळी 11-30 या दरम्यान नांदेड येथे आपल्या मोटर सायकलवर ऐकटे जात असताना पालम - लोहा सिमेवर त्यांच्यावर लक्ष ठेऊन असणार्‍या चोरट्यानी त्यांच्या डोळ्यात, तोंडात मिरची पावडर टाकली व रोख दोन लाख लुटले या वेळी निलेश यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांना खुप असाह्य अशा वेदना होत होत्या. त्यांना काही दिसत नव्हते. काही सुचत नव्हते. त्याच वेळेस गंगाखेड येथून संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाचे अमोल दिवाण, दिपक मुरकुटे, अशोकराव मुरकुटे, सुधाकरदादा येवले हे लग्न सोहळ्या निमित्त लोहा येथे जात असताना सदर घटना त्यांच्या निर्दशनात आली. नंतर सर्वानी मिळुन निलेश यांना आपल्या गाडीत लोहा येथील  डाॅ.कानवटे यांच्या कडे पुढील उपचारासाठी तातडीने नेऊन लोहा पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली. व तेथे लोहा पोलीस प्रशासनातील पोलीस दाखल झाले. प्रथमउपचारा नंतर त्यांना नांदेड येथे डोळ्याच्या दवाखान्यात हलवण्यात आले. वरिल सर्वांनी मदत केली. व हे करुन खर्‍यार्थाचा माणुस धर्म पाळला.

शुक्रवार, फेब्रुवारी ०८, २०१९

 पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

परभणी/ प्रतिनिधी :-

  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून यामध्ये 5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी आधारकार्ड व बँक पासबुकाची छायांकीत प्रत संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक गावात हजर राहतील त्यांच्याकडे शुक्रवार दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याबाबत दि.6 फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश  सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे समिती प्रमुख तर ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे सदस्य असणार आहेत. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

 पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

परभणी/ प्रतिनिधी :-

  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून यामध्ये 5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी आधारकार्ड व बँक पासबुकाची छायांकीत प्रत संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक गावात हजर राहतील त्यांच्याकडे शुक्रवार दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याबाबत दि.6 फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश  सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे समिती प्रमुख तर ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे सदस्य असणार आहेत. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

रविवार, जानेवारी १३, २०१९

 देवगांव ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढा

देवगांव ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढा

सामतांची केंद्रीय मंत्री गडकरी कडे मागणी
परभणी/गोविंद मठपती:

 नियोजित देवगांव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-इंजेगाव या 548-बी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढून काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन योगेश्वरी शुगर्स साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रकाश सेठ सामत यांनी केंद्रिय दळण वळण मंत्री नितिन गडकरी यांची 2 जनपथ येथील निवास स्थानी शुक्रवारी 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदना व्दारे केली आहे.
देवगांव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-इंजेगांव या नियोजित राष्ट्रीय महामार्ग 548-बी कामा संदर्भात टेंडर प्रक्रिया सुरू होती. परंतू जिओ टँगिंग ने रहदारी कमी नोंदवल्या मुळे.सदरील कामाची प्रक्रिया पुढील अर्थिक वर्षात करण्याचे ठरले होते. परंतू परभणी येथे 19 एप्रिल 2018 रोजी समाधान शिबिराच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी सदरील कामाची प्रक्रिया चार महिण्यात पुर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. मात्र अद्यापही या कामाला सुरूवात झालेली नाही. त्या मुळे या कामाची लवकरात काम सुरू करण्याचे आदेश काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी अशी मागणी प्रकाश सेठ सामत यांनी केली आहे. या वेळी या कामा साठीचा क्रमांक काढून पुढील कार्यवाही तात्काळ करण्या साठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन केंद्रिय दळन वळन मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याचे प्रकाश शेठ सामत यांनी सांगितले. या वेळी सामत यांची कन्या तृष्णा प्रकाश सामत लिखित 'ताजे सपने' या ग्रंथाचे प्रकाशन या वेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
 देवगांव ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढा

देवगांव ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढा

सामतांची केंद्रीय मंत्री गडकरी कडे मागणी
परभणी/गोविंद मठपती:

 नियोजित देवगांव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-इंजेगाव या 548-बी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढून काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन योगेश्वरी शुगर्स साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रकाश सेठ सामत यांनी केंद्रिय दळण वळण मंत्री नितिन गडकरी यांची 2 जनपथ येथील निवास स्थानी शुक्रवारी 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदना व्दारे केली आहे.
देवगांव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-इंजेगांव या नियोजित राष्ट्रीय महामार्ग 548-बी कामा संदर्भात टेंडर प्रक्रिया सुरू होती. परंतू जिओ टँगिंग ने रहदारी कमी नोंदवल्या मुळे.सदरील कामाची प्रक्रिया पुढील अर्थिक वर्षात करण्याचे ठरले होते. परंतू परभणी येथे 19 एप्रिल 2018 रोजी समाधान शिबिराच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी सदरील कामाची प्रक्रिया चार महिण्यात पुर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. मात्र अद्यापही या कामाला सुरूवात झालेली नाही. त्या मुळे या कामाची लवकरात काम सुरू करण्याचे आदेश काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी अशी मागणी प्रकाश सेठ सामत यांनी केली आहे. या वेळी या कामा साठीचा क्रमांक काढून पुढील कार्यवाही तात्काळ करण्या साठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन केंद्रिय दळन वळन मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याचे प्रकाश शेठ सामत यांनी सांगितले. या वेळी सामत यांची कन्या तृष्णा प्रकाश सामत लिखित 'ताजे सपने' या ग्रंथाचे प्रकाशन या वेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

गुरुवार, डिसेंबर २७, २०१८

देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक

देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक


न प अग्नीशमन बंबामुळे मोठी हानी टळली


प्रतिनिधी/ पाथरी: -तालुक्यात आगोदरच पाण्या अभावी उभा उस वाळून जात असतांना पुन्हा विजेच्या तारां मुळे उस जळून नुकसान होण्याचे सत्र सुरूच असून गुरूवारी पावने चार च्या सुमारास देवेगांव शिवारात पुन्हा एक एक्कर उस, आणि बैलगाडी जळून शेतक-याचे मोठे नुकसान झाले. वेळीच पाथरी न प चा अग्नीशमन बंब पोहचल्याने मोठी हानी टळली.
बोरगांव येथील शेषनारायण आप्पाराव बेंडकर यांचा देवेगाव शिवारात तीन एक्कर उस असून गुरूवारी पावने चार वाजता विज तारांचे घर्षन झाल्याने या उसाला आग लागली. या वेळी अजुबाजूचे शेतकरी आणि पाथरी न प च्या अग्नीशमन बंबाने ही आग तात्काळ आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत एक एक्कर उसा सह लाकडी गाडी आणि त्यातील दोन खताचे पोते जळाले होते मात्र या ठिकाणी या शेतक-यां सह इतरांचा उर्वरीत सहा एक्कर उस वाचवण्यान न प अग्नीशमन बंबाला यश आले. यात जवळ पास साठ टन उसा सह खत,आणि लाकडी गाडी असे सव्वा लाखावर नुकसान झाले आहे. या वेळी माजी उप सभापती माऊली गलबे यांच्या सह देवेगाव ग्रामस्थ आणि न प अग्निशमनचे जवान खुर्रम खान, शेख शेरु, बळीराम गवळी यांनी मोठे परिश्रम घेतले.
देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक

देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक


न प अग्नीशमन बंबामुळे मोठी हानी टळली


प्रतिनिधी/ पाथरी: -तालुक्यात आगोदरच पाण्या अभावी उभा उस वाळून जात असतांना पुन्हा विजेच्या तारां मुळे उस जळून नुकसान होण्याचे सत्र सुरूच असून गुरूवारी पावने चार च्या सुमारास देवेगांव शिवारात पुन्हा एक एक्कर उस, आणि बैलगाडी जळून शेतक-याचे मोठे नुकसान झाले. वेळीच पाथरी न प चा अग्नीशमन बंब पोहचल्याने मोठी हानी टळली.
बोरगांव येथील शेषनारायण आप्पाराव बेंडकर यांचा देवेगाव शिवारात तीन एक्कर उस असून गुरूवारी पावने चार वाजता विज तारांचे घर्षन झाल्याने या उसाला आग लागली. या वेळी अजुबाजूचे शेतकरी आणि पाथरी न प च्या अग्नीशमन बंबाने ही आग तात्काळ आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत एक एक्कर उसा सह लाकडी गाडी आणि त्यातील दोन खताचे पोते जळाले होते मात्र या ठिकाणी या शेतक-यां सह इतरांचा उर्वरीत सहा एक्कर उस वाचवण्यान न प अग्नीशमन बंबाला यश आले. यात जवळ पास साठ टन उसा सह खत,आणि लाकडी गाडी असे सव्वा लाखावर नुकसान झाले आहे. या वेळी माजी उप सभापती माऊली गलबे यांच्या सह देवेगाव ग्रामस्थ आणि न प अग्निशमनचे जवान खुर्रम खान, शेख शेरु, बळीराम गवळी यांनी मोठे परिश्रम घेतले.

शुक्रवार, डिसेंबर २१, २०१८

पाथरीत ऊसाच्या ट्रॉली खाली सापडल्याने तरुण ठार

पाथरीत ऊसाच्या ट्रॉली खाली सापडल्याने तरुण ठार



परभणी/ प्रतिनिधी

पाथरी - सेलू रोडवर ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली आलेल्या एका तरुणाचे निधन झाले हि घटना शुक्रवार दि.२१डिसेंबर रोजी दुपारी २वाजता घडली. याबाबत ची माहिती याप्रमाणे पाथरी तालुक्यातील लिंबा येथील भागवत मंकाजी चव्हाण वय २६ वर्षे या तरूणाचा रेणुका शुगर इंडस्ट्रीत परिसरात  कारखान्यात ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२२ ए.डी. २०५४ ऊस घेऊन जात असताना सेलू रोडवरील साई भोजनालयासमोर  ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पाठीमागील टायर खाली  तरुण आल्याने अपघात झाला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर थांबवून घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी तरुणाला खाजगी वाहनाद्वारे उपचारसाठी परभणीला घेऊन जात असतांना वाटेतच त्याचे  निधन झाले. पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करतांना
 रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी सेलूच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.रात्री वृत्त लिहीपर्यंत  या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.