Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

दादाजी खोब्रागडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दादाजी खोब्रागडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जून १३, २०१८

मोदींनी निरव मोदी व मेहुल चोक्सिला ३५ हजार कोटी दिले:राहुल गांधी

मोदींनी निरव मोदी व मेहुल चोक्सिला ३५ हजार कोटी दिले:राहुल गांधी

चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी संवाद मेळाव्यात 
राहुल गांधी यांचे वक्तव्य 
नागपूर/प्रतिनिधी:
केंद्रातील मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करतेय.भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार असून गरिबांच्या व सामन्यांच्या सर्व खिश्यातले पैसे हे उद्योग पतींच्या खिश्यात घालत आहेत,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असून सुद्धा देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.याचा फायदा हा देशातील १०-१५ मोठ्या उद्योगपतींना भाजप सरकार करून देत आहे.देशातील गरीबांचा पैसा घेऊन पळालेले मेहुल चोक्सी व नीरव मोदी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत व दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षाचा पैसा घेऊन परदेशात पळाले.असा घणाघाती आरोप भा.रा.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी तसेच एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांचे सांत्वन करून शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी ते नांदेड या गावी आले होते.
पंतप्रधान मोदींनी नीरव मोदी सारख्या माणसाला ३५ हजार कोटी रुपये दिले यातीलच 5 कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधक शेतकरी माणसाला दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती,या 
भागातील युवक त्यांच्या कार्याने प्रेतीत झाला असता.जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा मदत केली पाहिजे, मदत करन्या इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे.असेही ते यावेळी म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू,असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले.यावेळी मदत म्हणून खोब्रागडे कुटुंबियांना काँग्रेसतर्फे अडीच लाख वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले दिले. उद्या पाच लाखांची अधिक मदत दिली जाणार आहे. नरेश पुगलिया यांच्याकडून १ लाख मदत देण्यात आली.
'मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. म्हणजेच दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होत नाही.आज दररोज पेट्रोलचे दर का वाढताहेत ?, हा एवढा पैसा कुठे जातोय?'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 
दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान राहुल गांधी यांचे नांदेड येथे आगमन झाले त्यानंतर ते स्व.दादाजी खोब्रागडे यांच्या घराकडे सभामंडपांकडे प्रस्तान केले.यावेळी एचएमटी वाणाचे संशोधक स्व.दादाजी खोब्रागडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मौन देखील पाळण्यात आला. राहुल गांधी येताच "राहुल गांधी आगे बढो" "हम तुम्हारे साथ है"चे नारे देखील लावण्यात आले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व अ.भा. काँ. कमिटीचे महासचिव अशोक गहलोत ,विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे,माजी खासदार नरेश पुगलिया,माजी खासदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार,प्रकाश देवतळे,अविनाश वारजुरकर, खोब्रागडे कुटुंबीय आदी उपस्थित होते.
अखेर पुगलिया यांना मिळाला प्रवेश
राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी एकूण ६० जणांची यादी एसपीजी यंत्रानेला देण्यात आली होती.
मात्र सुरक्षेच्या नावाखाली फक्त २२ जणांचीच यादी मंजूर करण्यात आले व सुरक्षेच्या नावाखाली कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष राहुल गांधीयांच्या पासून दूरच ठेवण्यात आले.या ६० नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या यादीत माजी खासदार नरेश पुगलिया व राहुल पुगलिया यांचे देखील नाव होते,अखेर परियंत हे ओळखपत्र त्यांना मिळाले नव्हते अखेर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने पुगलिया यांना प्रवेश मिळाला.
एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केलेल्या वाणाची पाहणी करतांना राहुल गांधी







सोमवार, जून ११, २०१८

दादाजी खोब्रागडे यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारणार

दादाजी खोब्रागडे यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारणार

नागभीड/प्रतिनिधी:
जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.
सोमवारी ना. अहीर यांनी एमएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची नांदेड येथील निवासस्थानी भेट घेऊ न सांत्वन केले. ना. अहीर म्हणाले, दादाजींनी मोठमोठ्या संशोधकांना मागे टाकत धानाच्या नऊ वाणांचे संशोधन केले. दादाजींच्या कर्तृत्वाचा अभिमान जिल्ह्यासह राज्यातील धान उत्पादकांना होता. दादाजींचे हे संशोधन जागतिक स्तरावर पोहोचले. त्यांच्या संशोधनामुळे शेतकरी स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करू शकला. या संशोधकाला जिल्हा मुकला. दादाजींच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार व शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही ना. अहीर यांनी दिले. यावेळी आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजी आ. अतुल देशकर, चंद्रपूरचे उपमहापौर अनिल फुलझेले, राजेश मून, जि. प. सदस्य संजय गजपुरे, राहुल सराफ, एसडीओ काळे, उपसरपंच परेश शेंडे उपस्थित होते.

रविवार, जून ०३, २०१८

कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे देहावसान

कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे देहावसान

नागपूर -गेल्या महिन्याभरापासून खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे एचएमटी भात वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे सर्च हॉस्पिटल (जि़ गडचिरोली) येथे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते़ त्यांच्यावर सोमवारी दुपारी मूळ गाव नांदेड (ता़ नागभीड) येथे अंत्यसंस्कार होईल.


अल्पभूधारक असलेल्या दादाजींनी १९८३मध्ये भाताचे वाण शोधण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांनी एचएमटी या बारिक आणि चवदार अशा भात वाणाचा शोध लावला़ त्यानंतर त्यांनी धानावर प्रयोग करीत विविध वाण विकसित केलेत़ या कार्याबद्दल त्यांना अनेक राज्यशासन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दादाजींनी ‘विजय नांदेड’, ‘नांदेड ९२’, ‘नांदेड हिरा’, ‘डीआरके’, ‘नांदेड चेन्नूर’, ‘नांदेड दीपक’, ‘काटे एचएमटी’ आणि ‘सुगंधी’ हे नऊ वाण विकसित केले आहेत. या कामासाठी दादाजींना १२ पुरस्कार मिळाले असून, राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त झाला. मध्य प्रदेशातील इंदूर येथील संस्थेतर्फे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते दादाजींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ २०१० मध्ये फोर्ब्ज मासिकातर्फे प्रकाशित जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांचे नाव होते़ मागील महिन्यापासून त्यांची प्रकृती बिघडली होती़ त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात पक्षाघाताचे उपचार सुरू होते़ त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांचे सहाय्य मंजूर केले़ पुढील उपचारासाठी शनिवारी प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या सर्च हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते़ रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालावली़ त्यांच्यामागे मुलगा मित्रजित, सून इंदिरा, नातू मनीष, विजय, दीपक असा परिवार आहे़

बुधवार, मे २३, २०१८

कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांना उपचारासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत

कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत

मुंबई/प्रतिनिधी:
 तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांचे सहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आहे.
नागभीड तालुक्यातील नांदेड (जि. चंद्रपूर) येथील दादाजी रामाजी खोब्रागडे हे सध्या पक्षाघाताने आजारी असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंजूर केली आहे. मुंबई येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून हे अर्थसहाय्य स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर शाखेत वर्ग करण्यात आले आहे. श्री. खोब्रागडे हे उपचार घेतील, त्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये आवश्यकतेनुसार ही रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्री. खोब्रागडे यांनी धानावर प्रयोग करीत विविध वाण विकसित केले आहेत. हे वाण प्रसिद्ध असून या कार्याबद्दल त्यांना निरनिराळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.