Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ११, २०१८

दादाजी खोब्रागडे यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारणार

नागभीड/प्रतिनिधी:
जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.
सोमवारी ना. अहीर यांनी एमएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची नांदेड येथील निवासस्थानी भेट घेऊ न सांत्वन केले. ना. अहीर म्हणाले, दादाजींनी मोठमोठ्या संशोधकांना मागे टाकत धानाच्या नऊ वाणांचे संशोधन केले. दादाजींच्या कर्तृत्वाचा अभिमान जिल्ह्यासह राज्यातील धान उत्पादकांना होता. दादाजींचे हे संशोधन जागतिक स्तरावर पोहोचले. त्यांच्या संशोधनामुळे शेतकरी स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करू शकला. या संशोधकाला जिल्हा मुकला. दादाजींच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार व शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही ना. अहीर यांनी दिले. यावेळी आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजी आ. अतुल देशकर, चंद्रपूरचे उपमहापौर अनिल फुलझेले, राजेश मून, जि. प. सदस्य संजय गजपुरे, राहुल सराफ, एसडीओ काळे, उपसरपंच परेश शेंडे उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.