Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जुन्या आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जुन्या आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जुलै २१, २०२०

आठवणीतील चिमणी

आठवणीतील चिमणी

आज या चिमणीला विसरून कस चालेल  ?
जिने बाळ असताना ,अंधार्या बाळांतखोलीत प्रकाश दिला .

जिने एवढ्या मोठ्या चिरेंबंदी चौसोपी वाड्यात , रात्रीच्यावेळी अंधारातील बागुलबुवा पळवला .
रात्रीच्या जेवणाच्या वेळी स्वयंपाकगृहात जिच्या साथीने व जिच्या मंदमंद प्रकाशात आईने मला मायेने अमृत घास भरवले .
जिच्या  प्रकाशात भांवडांसोबत व मित्रांसोबत  इ.४थी ते इ.७वी पर्यंत तिला मधोमध डब्यावर ठेवून सभोवती मंडलाकार बसून मनोभावे अभ्यास केला .
जिला धक्का लावून लवंडल्यावर आईचा मार खाल्ला .
जिला हातात धरून ,वाड्यातून इकडून तिकडे जाताना डोक्यावरचा पदर थोडा पुढे ओढून ,विझू नये म्हणून पदाराआड घेऊन जाताना तिच्या तांबूल पांढर्या धूसर प्रकाशात आईचा प्रेमळ प्रेमळ तेजाळलेला चेहरा पाहून मनाला किती आधार वाटला .
गरिबाच्या घरी व श्रीमंताच्या घरी जी सुखाने राही .
ती ही चिमणी आता अडगळीत गेली .
आज ती घासून -पुसून स्वच्छ होऊन देवघरासमोर पाटावर विराजमान होईल .
आणि  हसून म्हणेल ,--
" बाळांनो आनंद वाटला . माझी आठवण ठेवलीत .
   प्रकाशाची पूजा करा .
   प्रकाशात चालत रहा.
    प्रकाशाकडे चालत रहा .
    एक दिवस तुम्ही--
     स्वतः दिवे व्हा !!! "

आठवणीतील चिमणी
*****************************