Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जालना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जून ०९, २०२२

चंद्रपुरातील बड्या पोलिस अधिकाऱ्याची बदली

अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उस्मनाबाद येथे बदली

चंद्रपूर पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांची बदली झाली असून, आज 9 जून रोजी त्यांची नियुक्ती उस्मनाबादमधील पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

अतुल कुलकर्णी हे चंद्रपूर येथे येण्यापूर्वी गोंदिया येथे कार्यरत होते. 2015 च्या बॅचचे अधिकारी असलेले अतुल कुलकर्णी हे 2016 मध्ये सोलापूर येथे नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी 2017 ते 2019 या काळात भायंदर येथे कार्यरत होते. 2019 जुलै मध्ये यांची गोंदिया येथे बदली झाली आणि त्यानंतर मागील दीड वर्षांपासून ती चंद्रपूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आज वीस एप्रिल 2022 रोजी त्यांची जालना पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. मात्र, ते तिथे रुजू झाले नव्हते. आज 9 जून रोजी त्यांची उस्मनाबादमधील पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

Atul Kulkarni superintendent of police

Police officer Gondia Chandrapur Solapur Mira Bhayandar Thane Maharashtra police IPS

अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उस्मनाबाद येथे बदली

शनिवार, सप्टेंबर ०५, २०२०

शैक्षणिक वर्षात बदल करण्यासाठी थेट पंतप्रधानांना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे साकडे

जालना– कोविड -१९ ह्या जागतिक महामारीमुळे अवघे विश्व संकटात आहे. ह्या महामारी मुळे मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येत आहेत. दरवर्षी माहे जून मध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते ती या वर्षी देखील झाली पण देशातील सर्व शाळा, महाविदयालय, विद्यापीठ बंद आहेत. शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरु असले तरी देशाच्या तळागाळातील ग्रामीण भागातील सर्वच मुलांना ह्या ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळताना दिसत नाही. ह्या महामारीमुळे विद्यार्थ्याचे अर्धे शैक्षणिक सत्र जवळपास वाया गेले आहे. हे मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे. मुलाच्या सर्वंकष व्यक्तिमत्व विकासासाठी शाळा सुरु राहणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक नाही. सततच्या ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक शारीरिक आजार उदभवत आहे. म्हणून संपूर्ण भारत देशातील सर्व शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्यात यावे अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशात माहे जून व जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात शेतीच्या पेरणीची कामे होतात याच काळात शाळा उघडतात परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपस्थितिचे अतिशय अल्प प्रमाण असते कारण विध्यार्थी शेतात कामासाठी जातात. त्यामुळे ह्या मुलांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते. कोरोनामुळे आधीच विध्यार्थ्यांचे सहा महिने वाया गेले आहेत ही बाब विचारात घेवून संपूर्ण भारतात जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष जाहीर करण्यात यावे व शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात होणारे शोषण व भेदभाव टाळण्यासाठी सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., स्टेट बोर्ड असे वेगवेगळे अभ्यासक्रम रद्द करून एक देश एक शैक्षणिक वर्ष व एकाच अभ्यासक्रम राबविण्यात यावा अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल ,महासचिव सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते, सतिष काळे, प्रा.शेषराव येलेकर, अंबादास रेडे, डाँ.विलास पाटील, राजकिरण चव्हाण, विनोद आगलावे, शामराव लवांडे, वसंत नेरकर, राजेंद्र भोयर, शालिक बोरसे, बंडू डाखरे, प्रल्हाद कर्हाळे, देवेंद्र टाले, ज्ञानेश्वर गायकवाड ,प्रेमचंद आहिरराव, आर.आर.वांडेकर, के.डी.वाघ, विठ्ठल घायाळ, अनंत मिटकरी, भास्कर शिंदे, पंजाब दांदले, संजय निंबाळकर, नंदा वाळके,सुरेंद्र बनसिंगे,पुसप्पा कोंडलवर,हर्षा वाघमारे, संजीव शिंदे,राजेश मालापुरे,योगेश कडू,प्रवीण मेश्राम, गजानन कोंगरे चेतना कांबळे,प्रिया मेश्राम, कीर्ती वनकर, स्वपींल ठाकरे,संगीता ठाकरे, चेतन चव्हाण, सुरज बमनोटे,अतुल बोबडे, अश्विन शम्बरकर, मेघराज गवखरे,भास्कर कढवणे, अनिल घोरपडे, वल्लभ गाढे, राजेश भोसले, बलवंत घोगरे, देविदास शिंदे, राजेंद्र चव्हाण, निलेश पाटील, बंडू गाडेकर, राजेश वैद्य, कुंदन पाटील, रत्नाकर मुंगल, दिलीप गायकवाड, अशोक कुटे, अशोक ढोले, अनिल खेमडे, आनंद पिंगळे, हरिभाऊ लोखडे , भालचंद्र कोकाटे, विनोद आगलावे, रमेश पाटील, मनोजकुमार रणदिवे, निलेश पाटील, आनिल बोधे, डी.के.देसाई, गणेश उढाण, विजय कर्हाळे, मधुकर मोरे, किरण पाटील, शंकर काळे, आनिल भुसारी, राजकुमार शिंगनजुडे, सुरेश दास,बी.एन.पवार, अजित कणसे, सुनिल चौधरी, अजित वाकसे, सुरेंद्र बालशिंगे, शिवशंकर स्वामी, नितीन पवार, संगिता निंबाळकर, परमेश्वर वाघ, सुनिल मनवर, भारत पाटील, रमेश पाटेकर, प्रविण पंडीत, शिवाजी मुळे, बाळासाहेब यादव, प्रविण ठोंबरे, विनोद डाखोरे, संजय आम्बरे, राम गायकवाड यांच्या सह्या आहेत                                             आपला विश्वासु    लक्ष्मण नेव्हल                        प्रदेशाध्यक्ष  ९८९००१४४१७ 

सोमवार, डिसेंबर २४, २०१८

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

जालना - बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या  बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.
अभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण केले होते. पण त्यानंतर बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण केले आणि दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बाला रफिक शेखने एक गुण मिळवत ३-१ अशी आघाडी मिळवली.
पुण्याच्या अभिजीत कटकेने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बाला रफिक शेख याच्याशी दोन केले.

सोमवार, डिसेंबर १७, २०१८

पिण्यासाठी पाणी व मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा

राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

जालना,दि.17 : निसर्गाच्या अवकृपेमुळे आपणा सर्वांना भीषण पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागणार आहे. टंचाईच्या अनुषंगाने पिण्यासाठी पाणी व मजुरांच्या हाताला काम या बाबींचे सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश पदुम व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात जालना मतदासंघाच्या पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज्यमंत्री श्री.खोतकर बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती पांडूरंग डोंगरे, द्वारकाबाई खरात आदींची उपस्थिती होती. राज्यमंत्री श्री.खोतकर म्हणाले की, जानेवारी ते जून या कालावधीसाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये यंत्रणांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी. पदाधिकाऱ्यांनी गटातटाचे राजकारण न करता टंचाई परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज रहावे. टँकरद्वारे पाणी पुरवठा हा शेवटचा पर्याय असून टंचाईच्या अनुषंगाने नळयोजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी बाबींवर भर देण्यात यावे. त्याचबरोबरच 200 फुटावर पाणी लागणाऱ्या बोअरसाठी तातडीने मंजुरी देण्यात यावी. कुठल्याही पाणी पुरवठा येाजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये तसेच विहीर अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे तातडीने अदा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी राज्यमंत्री श्री.खोतकर यांनी टंचाईच्या अनुषंगाने जालना मतदासंघातील गावनिहाय पाण्याबाबत परिस्थिती उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून जाणून घेत पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही टंचाईच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या.

बैठकीस जिल्हा परिषदेतील सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व गावचे सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.