Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुजरात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुजरात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध

  गुजरात विधानसभा निवडणूक

अहमदाबाद –  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत 70 उमेदवारांची नावे आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत. यादीमध्ये पहिलेच नाव मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे आहे. रुपानी राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.
उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा येथून निवडणूक लढवणार आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 9 आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. भाजपा या निवडणुकीत नव्या उमेदवारांना संधी देईल असे वाटत होते. पण पहिल्या यादीवर नजर टाकल्यास भाजपाने जुन्याच चेह-यांना संधी दिली आहे.



भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पहिली यादी निश्चित करण्यात आली. पक्षाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बैठकीला उपस्थित होते.  गुजरातमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपासमोर काँग्रेस आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलने आव्हान निर्माण केले आहे. हार्दिक पटेलची सेक्स सीडीसमोर आल्याने गुजरातमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
मागच्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाला  प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाने गुजरातची लढाई प्रतिष्ठेची केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदामुळे मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर झाला होता. मोदींच्या काळात भाजपाने इथे आपली पाळंमुळं अधिक  घट्टपणे रोवली. पण मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय उलथापालथी घडल्या.
मोदींच्या नंतर आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण नंतर त्यांना हटवून त्यांच्या जागी विजय रुपानी यांना आणण्यात आले. याच दरम्यान गुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे राहिले. गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचारही झाला. पटेल आरक्षण महत्वाचा मुद्दा बनला. गुजरातमध्ये पटेल समाजाने नेहमीच भाजपाला साथ दिली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत पटेलांना सोबत ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे.

 

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडिओमुळे गुजरातमध्ये वादळ

हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडिओमुळे गुजरातमध्ये वादळ

अहमदाबाद - गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली आहे. गुजरातमध्ये पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
हार्दिक पटेलच्या विरोधकांकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आपण नसून, मला बदमान केल्यास हरकत नाही, पण या व्हिडिओमधूम गुजरातमधील महिलांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला आहे.
सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेलसारखा दिसणार तरुण एका महिलेसोबत बंद खोलीत असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तारखेवरून हा व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. मात्र हार्दिकने या व्हिडिओत आपण असल्याचा आरोप हार्दिकने फेटाळला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुणी लिक केला याबाबत मात्र अद्याप  माहिती मिळालेली नाही.
hardik patel sex साठी इमेज परिणाम

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

सेना उतरणार गुजरातच्या आखाड्यात

सेना उतरणार गुजरातच्या आखाड्यात


मुंबई /प्रतिनिधी– मोदींना कोणताही अपशकून करायचा नाही असं घोषित करत गुजरात निवडणुकीपासून लांब राहिलेल्या शिवसेनेनं अचानक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई, राजुल पटेल आणि हेमराज शहा हे आज गुजरातला रवाना होता आहेत. गुजरातमध्ये आज ते संध्याकाळी उशीरा पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.
सुरत आणि बडोदा या मराठीबहुल भागात उमेदवार उभे करण्याचे संकेत शिवसेनेनं दिलेत. साधारणपणे 40 जागांवर शिवसेना उमेदवार देईल अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. तसंच हार्दिक पटेल यांनी काँगेससोबत हातमिळणी करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ज्या पाटीदारांना काँग्रेसचा पर्याय मान्य नाही. ते शिवसेनाला जवळ करु शकतात.
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपसमोर कडवं आव्हान निर्माण झालं आहे. तेही मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. त्यामुळे भाजपसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणूकीकडं पाहिलं जातंय. यंदा पहिल्यांदाच हिंदुत्ववादाच्या ऐवजी जातीपातीच्या पातळीवर ही निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली आहे. त्यात आता शिवसेनेनं भाजपाल डिवचण्यासाठी अचानक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.