Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कोसळले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोसळले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जुलै २८, २०१८

WCL वसाहतीतील क्वॉर्टर कोसळले

WCL वसाहतीतील क्वॉर्टर कोसळले

Ballarpur WCL's quarters collapsed | बल्लारपूर वेकोलिचे क्वॉर्टर कोसळलेबल्लारपूर/प्रतिनिधी: 
येथील वेकोलिच्या ब्लॉक क्र. ३ मधील क्वार्टर नं. ६३/१ ची मागची बाजू शुक्रवारी अचानक कोसळली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सुदैवाने क्वाटर्रमध्ये कुणीच नसल्यामुळे मोठी जीवित हाणी टळली. ब्लॉक ६३ मधील केशव सातपुते हे या क्वार्टरमध्ये राहतात. मात्र घटनेच्या दिवशी घरातील सर्व जण बाहेर होते. यापूर्वीही १३ जुलैच्या रात्री ब्लॉक ७१ मधील क्वार्टर नं.७१/१ अशाच पद्धतीने कोसळले.मायनर्स क्वाटर्सची वस्ती ही खूप जुनी असून याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्ल्याने क्वार्टर कोसळण्याच्या घटना घडत आहेत.मायनर्स क्वाटर्स मधील ब्लॉक ५५ सोबतच इतरही ब्लॉक जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे मोठी जीवित हाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्वाटर्सच्या दुरूस्तीचे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी अलर्टनेट वेलफेअर बोर्डाचे सदस्य लोमेश लाडे व कल्याण समिती सदस्य रामचंद्र यादव यांनी केली आहे.