Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आधार कार्ड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आधार कार्ड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑगस्ट १९, २०२१

असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड

असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड

 असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड


ज्यावेळी मतदान नसते त्यावेळी आपणास "मतदार ओळखपत्राची" आठवण देखील येत नाही.पण निवडणुका लागल्या की,आपणास मतदान ओळखपत्राची आठवण येते. किंवा सरकारी योजना साठी सुध्दा ओळखपत्राची गरज भासते. शोधाशोध केल्यास आपल्या लक्षात येते की, आपले मतदान ओळखपत्र हरवले आहे किंवा खराब झाले आहे. मग आपली पळापळ होते.त्यावेळी वेळ कमी असतो व आपणास मतदान ओळखपत्र लवकर हवे असते.

असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड

हे होऊ नये म्हणून आपले मतदान ओळखपत्र वेळीच नविन काढून घेणे योग्य आहे. 

आतातर आपल्या मोबाईल वरून आपण आपले मतदान ओळखपत्र डाउनलोड करून घेऊ शकतो.

असे करा मतदान ओळखपत्र डाउनलोड

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला आहे, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे.किंवा डाउनलोड करता येणार आहे.

ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणी करुन घ्यावा लागेल

सर्व प्रथम डिजिटल वोटर आयडीसाठी voterportal.eci.gov.in वर नोंदणी करावी लागेल.यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://www.nvsp.in/account/login  वर लॉगिन करावे लागेल.

येथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला EPIC क्रमांक किंवा फॉर्म क्रमांक द्यावा लागेल.

आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.

आपल्याला वेब पोर्टलवर ओटीपी टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला बर्‍याच वेबसाईटवर दिसतील, तुम्हाला डाऊनलोड ई-ईपीआयसीवर क्लिक करावे लागेल.

 आता तुमचा डिजिटल मतदार आयडी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड होईल.याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता.

याशिवाय व्होटरआयडी संबंधित कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर 1950 वर संपर्क साधू शकता.

सोमवार, जून ०७, २०२१

ड्रायव्हिंग लायसनला आधार कार्ड असे लिंक करा

ड्रायव्हिंग लायसनला आधार कार्ड असे लिंक करा

 

ड्रायव्हिंग लायसनला आधार कार्ड असे लिंक करा 

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव


तुम्ही आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसनला जोडण्याचा विचार करत असाल तर ते एकदम सोपे आहे. बनावट लायसनला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड हे आज आवश्यक कागदपत्रे बनली आहेत.ड्रायव्हिंग लायसन्स घेतल्याशिवाय वाहन चालवू शकत नाही.त्याचप्रमाणे आधार कार्डशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.अशा परिस्थितीत आपल्या मनात हा प्रश्न येत असेल की ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत आपण का बोलत आहोत? वास्तविक आपण आपल्या बँक खात्यासह आधार जोडला असेलच तो जोडल्यानंतरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळू लागला असेल.
ड्रायव्हिंग लायसनला आधार कार्ड असे लिंक करा

वास्तविक असे सरकारचे म्हणणे आहे की,असे केल्याने बनावट ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती सहज कळेल आणि तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सविषयी योग्य माहितीही मिळेल.त्यामुळे शासनाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश जारी केले आहेत. आपण घरबसल्या आपल्या ड्रायव्हिंग लायसन्ससह आधार कार्ड कसे जोडू शकता ते जाणून घ्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाची वेबसाईट  https://parivahan.gov.in  वर जा. यानंतर तुम्हाला ‘Link Aadhaar’ च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला ड्रॉप-डाऊन वर जावे लागेल आणि ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे आपल्याला आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांकाबद्दल विचारले जाईल. तो नंबर एंटर करा.
वरील प्रक्रिया पूर्ण केल्यावर आपल्याला Get Details चा पर्याय मिळेल. येथे क्लिक केल्यावर आपल्याला आपला आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर एंटर करावा लागेल. यानंतर आपल्यासमोर Submit चा पर्याय असेल. आपण जिथे क्लिक करता तिथे आपल्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. तुमचा DL पाठविताच आधारशी लिंक केला जाईल.व तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक होईल

बुधवार, जानेवारी १३, २०२१

तुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का?हे असं तपासून बघू शकता

तुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का?हे असं तपासून बघू शकता



तुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का?हे असं तपासून बघू शकता

____________________________
🌠 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌠
____________________________
दि. १३ जानेवारी   २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3nABPHe
आपले आधार कार्ड वापरात असताना आपल्याला काही गोष्टींबाबत सतर्क राहणे देखील गरजेचे आहे.
काही दिवसांत अश्या अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात असे दिसून आले की, अनेकांचे आधार कार्ड त्यांच्या परवानगी शिवाय वापरण्यात येत आहेत. ज्यामुळे देशातील नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेवर गदा येण्याची शक्यता आहे. याला आळा घालण्यासाठी आधार ऑथोरिटी UIDAI ने आपल्या वेबसाईटवर एक नवीन सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. ज्यामुळे आपण घरबसल्या आपल्या आधारकार्डचा कुठे कुठे आणि कशासाठी वापर झाला आहे हे जाणून घेऊ शकतो. जर कुठल्या व्यक्तीला त्यात असे आढळले की त्याच्या आधारकार्ड नंबर चा कुठल्या वाईट उद्देशाकरिता वापरण्यात आला आहे तर तुही तिथे आपली तक्रार देखील नोंदवू शकता.पण या सुविधेचा लाभ घेण्याकरिता एकच अट आहे ती म्हणजे तुमचा मोबईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवा.   
         
╔══╗ 
║██║      _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ_*
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहेकि तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे कुठे करण्यात आला आहे, तर तुम्ही खालील स्टेप्स नुसार ते जाणून घेऊ शकता.
▪स्टेप १-सर्वात आधी UIDAI च्या आधिकारिक वेब साईट वर जा. जिथे एक पेज उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला “Aadhar Authentication History” या लिंकवर क्लिक करायचे आहे.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,तसेच आणखीन पुढील▪स्टेप २-OTP जनरेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…
ह्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ आकड्यांचा आधार नंबर टाका आणि सेक्युरिटी कोड टाका. त्यानंतर तुमचा OTP जनरेट करा. त्यानंतर अश्या प्रकारची विंडो ओपन होईल.▪स्टेप ३-वेळेची निवड करा, येथेच तुम्हाला तुमचा OTP टाकायचा आहे. या स्टेपमध्ये तुम्ही जास्तीतजास्त ५० रेकॉर्ड्स बघू शकता. येथे तुम्हाला अगदी सतर्क राहून Authentication Type या ऑप्शनमध्ये OTP ची निवड करायची आहे. कारण इतर ऑप्शन्समध्ये तुम्ही Authentication चे प्रमाण बघू शकत नाही. सर्व माहिती टाकून झाल्यावर ‘सबमिट’ वर क्लिक करा.
OTP एंटर केल्यावर तुम्हाला त्यावेळेदरम्यान सर्व माहिती मिळेल. जर तुम्हाला हिस्ट्री बघून काही गडबड वाटली, उदा. जर तिथे असे दाखवत असेल की तुमचा आधार नंबर कुठल्या अश्या ठिकाणी वापरण्यात आला आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही तर याची तक्रार करण्यासाठी तुम्ही UIDAI च्या १९४७ या नंबर वर कॉल करू शकता.तुमचे आधार कार्ड जेव्हाही कुठे वापरले जाते, त्याआधी ते वापरण्यासाठी संबंधित व्यक्ती /संस्थेला UIDAI ला एक विनंती पाठवावी लागते. याच्या आधारे UIDAI तुमचा डाटा त्यांच्याशी शेअर करते.आजकाल जशा घटना घडत आहेत त्या लक्षात घेता आपण आपल्या आधार कार्ड नंबर विषयी अधिक सतर्क राहायला हवं, जेणेकरून आपली खाजगीमाहिती इतर कुणी कुठल्याही वाईट कामांसाठीर वापरू शकणार नाही.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
______________________________

शुक्रवार, डिसेंबर ११, २०२०

असे करा आधार कार्ड केंद्र सुरू

असे करा आधार कार्ड केंद्र सुरू

♨️ असे करा आधार कार्ड केंद्र सुरू ♨️

-----------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
-----------------------------------------
दि ११ डिसेंबर २०२०
व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. देशात सध्या आधारकार्ड धारकांची संख्या खूप मोठी आहे. आधार कार्डमध्ये एखादी दुरूस्ती करावयाची असल्यास प्रत्येकवेळी आधार केंद्रात जावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या परिसरात एखादे आधार केंद्र सुरु केल्यास त्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते.
‼️ आधार केन्द्रात खालील कामे केली जातात
- नवं आधार कार्ड तयार करणं.
- आधार कार्डमधील स्पेलिंग, नावात बदल करणं
- पत्ता, जन्म तारीख चुकीची असल्यास ती दुरुस्त करणे
- फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अपडेट करणं
पण ही फ्रेंचाइजी घेणार कशी?
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल. जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया -
लायसन्स घेण्यासाठी UIDAIकडून एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा UIDAI सर्टिफिकेशनसाठी घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपल्याला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक करावं लागतं. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल.
सर्वप्रथम uidai.nseitexams.com या संकेतस्थळावर न्यू युजरसाठी जाऊन अर्ज करावा.
– न्यू युजर म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नोंदणीप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरू शकता.
– नोंदणी केल्यानंतर एका दिवसाने तुम्हाला लॉग इन करून परीक्षा देण्यासाठी आगाऊ वेळ घ्यावी लागेल.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,– परीक्षा देण्यासाठी तुम्हाला केंद्र निवडावे लागते. परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर तुम्हाला प्रवेश पत्र मिळेल.
– ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळेल.




संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पेमेंट करावं लागेल. पेमेंट करण्यासाठी Siteच्या Menuवर जाऊन पेमेंट वर क्लिक करा. त्यानंतर बँक अकाऊंट सिलेक्ट करा. खाली देण्यात आलेल्या Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. येथून चलानची पावती डाऊनलोड करुन ती प्रिंट करता येईल
सर्वप्रथम  NSEIT (https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action) वेबसाईटवर क्लिक करा.
- त्यानंतर Create New User वर क्लिक करावं लागेल.
- त्यानंतर एक XML File तयार होईल.
- Share Code enter करण्यासाठी सांगितलं जाईल.
- XML File आणि Share Code साठी आधारची वेबसाईट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपलं offline e aadhar डाऊनलोड करावं लागेल.
- येथून डाऊनलोड केल्यानंतर XML File आणि share code दोन्ही डाऊनलोड होतील. 
- त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल, त्यात काही खासगी माहिती भरावी लागेल.
- हा फॉर्म सबमिट केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर, यूजर आयडी आणि पासवर्ड येईल. 
- त्यानंतर Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉगइन करता येईल.
- त्यानंतर Continue बटणवर क्लिक करा.
- समोर एक फॉर्म, काही माहिती भरण्यासाठी येईल.
- फॉर्म भरल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करता येईल.
- त्यानंतर प्रिव्हयूचा ऑप्शन दिसेल. या प्रिव्ह्यूमध्ये संपूर्ण माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही, ते तपासा.
- आता Declaration Boxवर क्लिक करुन Proceed to submit formवर क्लिक करा.

रविवार, सप्टेंबर २०, २०२०

तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ कराच !

तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ कराच !

  तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ कराच !


.         दि. २० सप्टेंबर  २०२० 
  फेसबुक लिंक https://bit.ly/3hMCWkf      

युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने ‘आधार’कार्डचा डेटा सुरक्षित असल्याचे सांगितले असले तरीही त्याबाबत खात्री देता येत नाही. सोशल मीडियावर आधार डेटा लीक होत असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. आता यावर उपाय म्हणून युआयडीएआयनेच पुढाकार घेत आधारच्या सुरक्षेसाठी पावले टाकली आहेत. आता आधारचा डेटा लॉक करता येणार आहे. यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही.

तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ कराच !

आधारचा डेटा लॉक करण्याची सुविधा युआयडीएआयच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आपण घरबसल्या बायोमेट्रिक डेटा लॉक करता येणार आहे. जाणून घ्या आपला आधार डेटा कसा लॉक करायचा...
सर्वात आधी आधारची वेबसाईट https://uidai.gov.in/ ओपन करा

आधारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन आधार सर्विस मध्ये लॉक/ अनलॉक असा पर्याय दिसेल.
लॉक/ अनलॉक बायोमेट्रिक पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक लिंक ओपन होईल. त्यात तुम्हाला आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाकावा लागेल. त्यांनतर रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकल्यानंतर तुमचे अकाउंट लॉग इन होईल.
यानंतर तुमचा कोड टाकून अनेबल या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक झाल्याचा मेसेज येईल.
अनलॉक कसे करायचे
तुमच्या आधारकार्डची लॉक केलेली बायोमेट्रिक माहिती अनलॉक करण्यासाठी त्याच पद्धतीने लॉग इन करावे लागेल. यात फक्त अनेबल ऐवजी डिसेबल पर्यायावर क्लिक करा. यावेळीही सुरक्षा कोड टाकल्यानंतर डेटा अनलॉक होईल.
आधार ऑनलाईन सर्विस
आधार डेटा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तुमचे आधार कार्ड कधी आणि कोणत्या कारणासाठी वापरले आहे याचीही माहिती मिळते. आधार ऑनलाईन सर्विसमध्ये यासाठी पर्याय देण्यात आले आहेत. यात आधार कोणत्या अकाउंटला जोडले आहे, व्हेरिफिकेशन कशासाठी केले आहे याची माहिती मिळते. तसेच व्हर्च्युअल आयडीसुद्धा काढता येतो. आपण आधार क्रमांकाऐवजी व्हर्च्युअल आयडीही देऊ शकतो.