♨️ असे करा आधार कार्ड केंद्र सुरू ♨️
-----------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
-----------------------------------------
दि ११ डिसेंबर २०२०व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. देशात सध्या आधारकार्ड धारकांची संख्या खूप मोठी आहे. आधार कार्डमध्ये एखादी दुरूस्ती करावयाची असल्यास प्रत्येकवेळी आधार केंद्रात जावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या परिसरात एखादे आधार केंद्र सुरु केल्यास त्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते.
‼️ आधार केन्द्रात खालील कामे केली जातात
- नवं आधार कार्ड तयार करणं.
- आधार कार्डमधील स्पेलिंग, नावात बदल करणं
- पत्ता, जन्म तारीख चुकीची असल्यास ती दुरुस्त करणे
- फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अपडेट करणं
पण ही फ्रेंचाइजी घेणार कशी?
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल. जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया -लायसन्स घेण्यासाठी UIDAIकडून एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा UIDAI सर्टिफिकेशनसाठी घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपल्याला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक करावं लागतं. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल.
सर्वप्रथम uidai.nseitexams.com या संकेतस्थळावर न्यू युजरसाठी जाऊन अर्ज करावा.
– न्यू युजर म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नोंदणीप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरू शकता.
– नोंदणी केल्यानंतर एका दिवसाने तुम्हाला लॉग इन करून परीक्षा देण्यासाठी आगाऊ वेळ घ्यावी लागेल.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,– परीक्षा देण्यासाठी तुम्हाला केंद्र निवडावे लागते. परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर तुम्हाला प्रवेश पत्र मिळेल.
– ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळेल.
संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पेमेंट करावं लागेल. पेमेंट करण्यासाठी Siteच्या Menuवर जाऊन पेमेंट वर क्लिक करा. त्यानंतर बँक अकाऊंट सिलेक्ट करा. खाली देण्यात आलेल्या Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. येथून चलानची पावती डाऊनलोड करुन ती प्रिंट करता येईल
सर्वप्रथम NSEIT (https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action) वेबसाईटवर क्लिक करा.
- त्यानंतर Create New User वर क्लिक करावं लागेल.
- त्यानंतर एक XML File तयार होईल.
- Share Code enter करण्यासाठी सांगितलं जाईल.
- XML File आणि Share Code साठी आधारची वेबसाईट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपलं offline e aadhar डाऊनलोड करावं लागेल.
- येथून डाऊनलोड केल्यानंतर XML File आणि share code दोन्ही डाऊनलोड होतील.
- त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल, त्यात काही खासगी माहिती भरावी लागेल.
- हा फॉर्म सबमिट केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर, यूजर आयडी आणि पासवर्ड येईल.
- त्यानंतर Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉगइन करता येईल.
- त्यानंतर Continue बटणवर क्लिक करा.
- समोर एक फॉर्म, काही माहिती भरण्यासाठी येईल.
- फॉर्म भरल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करता येईल.
- त्यानंतर प्रिव्हयूचा ऑप्शन दिसेल. या प्रिव्ह्यूमध्ये संपूर्ण माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही, ते तपासा.
- आता Declaration Boxवर क्लिक करुन Proceed to submit formवर क्लिक करा.