नागपूर:
मानव संसाधन विभागातील अधिकार्यांनी भविष्यातील आव्हाने ओळखून, कर्मचार्यांच्या तक्रारी आणि संबंधित समस्यांचे नियोजित वेळेनुसार निराकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांनी केले.
नागपूर परिमंडला अंतर्गत असलेल्या मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आपले दैनंदिन काम नियोजित पद्धतीने करतांना कर्मचार्यांची उच्चपद श्रेणी, त्यांचे दावे आदी कामात कुठलाही विलंब न करता सर्व प्रलंबित दाव्यांचा निपटारा येत्या ३० सप्टेंबर पूर्वी करण्याच्या सूचना देखील श्री दोडके यांनी उपस्थितांना केल्या.
या बैठकीला नागपूर परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री प्रदीप सातपुते, वरिष्ठ व्यवस्थापक श्री विवेक बामनोटे, व्यवस्थापक श्री कुणाल गजभिये, यांच्यासह नागपूर शहर मंडलच्या व्यवस्थापक श्रीमती सारिका तायडे, नागपूर ग्रामीण मंडलाच्या व्यवस्थापक अनुष्री पांडे आणि वर्धा मंडलचे व्यवस्थापक श्री प्रफुल गिरी यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.