पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाकडे प्रगती करीत आहे मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच आज देशाला विश्वामध्ये मोठे स्थान निर्माण झाले आहे. देशाची आर्थिक स्थिती त्यांच्यामुळेच उंचावली आहे त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा विराजमान होतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
आघाडीमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थानी ठेवले जात असे, आम्ही देखील मोठ्या मनाने ते स्वीकारत होतो. यामुळे आमचे कार्यकर्ते मागे पडायचे, ही खंत असायची. मात्र तो भूतकाळ समजून, सर्व काही विसरून, सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयातून संधी प्राप्त होणार आहे. या संधीचे सोने करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे मार्गदर्शन आज नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.
मागील दोन महिन्यांमध्ये एक वेगळा विचार करण्याचा प्रसंग का आला? भूतकाळात पक्ष वाढीचे जे प्रसंग आले त्यात आम्ही वरचढ असूनही दुय्यम स्थान आम्हाला देण्यात आले. नेहमी आघाडी टिकवण्यासाठी आम्हाला माघार घ्यावी लागली. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी, जनतेच्या हितासाठी व विकासासाठी आज जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आपल्या सर्वांच्या भल्यासाठी असून आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही, याची ग्वाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यात व शहरात पक्ष वाढीसाठी आगामी काळात जास्तीत जास्त जागा घेऊन पक्षाचा विस्तार व संघटन करणार आहोत. जे गेले त्यांची चिंता न करता जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन विदर्भात पक्षाचा विस्तार व वाढीसाठी कार्यकर्त्यांना ताकदीने संधी देण्याचे काम करू, असे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम, राजेंद्र जैन, सुनिल फुंडे, शिवराज बाबा गुजर, प्रशांत पवार, श्रीकांत शिवणकर, अनिल अहिरकर, आभा पांडे, राजुभाऊ कारेमोरे, ईश्वर बाळबुदे, राजेश माटे, अरविंद भाजीपाले, रवी पराते, नाना पंचबुधे, गंगाधर परशुरामकर, धनंजय दलाल, मधुकर कुकडे, रविकांत बोपचे, जयंत किनकर नरेश अरसडे, राजाभाऊ आखरे, भागेश्वर फेंडर, सुधाकर तिंबोडे, हरिदास मेश्राम, रवी वैद्य, आशिष पाटील, सतिश शिंदे, सोपान गभने, नरहरी देवाडे, शैलेश भुरे, कपिल वानखेडे, भुजंग भोजनकर, आनंद सोनवणे, सचिन आमले, प्रशांत अग्रवाल, विशाल खांडेकर सहित हजारोंच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Ajit Pawar Sunil Tatkare
#NCP #Nagpur #मेळावा