अभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची केली उधळण
दी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अॅण्ड वॉटर पार्कमध्ये सहा तरुणींना अश्लील नृत्य करताना व त्यांच्यावर १२ शौकिनांकडून नोटांची उधळण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. नोटांची उधळण करणाऱ्यांमध्ये डॉक्टर व्यावसायिक व बिल्डरचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी धूम्रपान साहित्य व विदेशी दारूसह तीन लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील राजेंद्र पडोळे यांच्या मालकीचे उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यातील तिरखुरा गेटजवळील दी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अॅण्ड वॉटर पार्कमध्ये पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान, सहा तरुणी अश्लील नृत्य करताना आढळल्या. १२ पुरुष नोटांची उधळण करीत होते. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला आहे. या रिसॉर्टमध्ये धनाढ्यांचे लग्नसमारंभ, रिसेप्शन आदी कार्यक्रम व बीभत्स नृत्याच्या पार्टीचे आयोजन होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी रिसॉर्टची नाकाबंदी करून छापा टाकला. दरम्यान, २० ते २४ वयोगटांतील सहा तरुणी अर्धनग्न कपड्यांमध्ये बीभत्स नृत्य करीत होत्या.
पुरुष दारूच्या नशेत मुलींसोबत डान्स करून नोटांची उधळण करीत होते. आरोपींमध्ये ललित नंदलाल बैस (५०, रा. खात रोड, भंडारा), अभय रमेश भागवत (४९, रा. रामायणनगरी, खात रोड भंडारा), गोपाल सत्यनारायण व्यास (४८, रा. भंडारा), पंकज तुलशीराम हाथीठेले (३६, रा. समतानगर, जरीपटका, नागपूर), मनीष ओमप्रकाश सराफ (४७, रा. एमआयडीसी वर्धा), समीर कमलाकर देशपांडे (५५, रा. सुरेंद्रनगर, नागपूर), रजत विनोद कोलते (३२, रा. कोदामेंढी, ता. मौदा, जि. नागपुर), मंगेश सुरेश हरडे (३८, रा. खरबी रोड, नंदनवन, नागपूर), आशुतोष शेषराव सुखदेवे (२८, रा. शिवनगर, खामला नागपूर), केशव रवींद्र तरडे (३५, रा. कोदामेंढी मौदा, जि. नागपूर), पारस ज्ञानेश्वर हाथीठेले (२६, रा. वॉर्ड क्रमांक दोन, जमील ले-आउट गोधनी, नागपूर), अरुण अभय मुखर्जी (४७, रा. मनीषनगर, नागपूर) आदींचा समावेश आहे. नृत्यांगना या नागपुरातील असल्याची माहिती आहे.
छाप्यादरम्यान ध्वनी उपकरणे किंमत एक लाख ६० हजार रुपये, स्मोक मशीन किंमत पाच हजार, स्टेबलायझर किंमत सात हजार, साउंड लेव्हल मशीन किंमत पाच हजार रुपये, एम्प्लिफायर किंमत १२ हजार, साउंड मिक्सर किंमत पाच हजार, एच. पी. कंपनीचा लॅपटॉप किंमत ३० हजार, लॅपटॉप किंमत १५ हजार, रॉयल स्टॅग विदेशी दारू किंमत ३०० रुपये, रॉयल चॅलेंज विदेशी दारू किंमत ३०० रुपये, ब्लॅक अॅण्ड व्हाइट विदेशी दारू दोन बॉटल किंमत दोन हजार ४२४ व नगदी रोख रक्कम एक लाख ३० हजार ३०० रुपये, असा एकूण तीन लाख ७२ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. पखाले, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, डीवायएसपी झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय ओमप्रकाश कोकाटे, पीएसआय आशिष मोरखडे, हवालदार नरेंद्र पटले, मिलिंद बांदूरकर, अरविंद भगत, नायक पोलीस रोहन डाखोरे, बालाजी साखरे, अजिज दुधकानोडा, मयूर ढेकळे यांनी केली.