Nagpur संविधान चौकात साखळी मैत्रीण उद्योग समूहाच्या फसवणुकीला बळी पडलेल्या गुंतवणूकदार आणि एजंट गेल्या 18 दिवसांपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करत आहे या प्रकरणाची सीबीए चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारला केली आहे मैत्रीय उद्योग समूहाचे अध्यक्ष अटक करून गुंतवणूकदारांना न्याय देण्याची मागणी देखील केली जाते तरीही उपोषण सरकार गांभीर्याने घेत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय.
हमारी मांग इतनी है कि महाराष्ट्र सरकारने इस कंपनी को मान्यता दि महाराष्ट्र सरकारने इस कंपनी की प्रॉपर्टी सिल्की तो महाराष्ट्र सरकारने हमारे जो इन्वेस्टर जो एजंट है उनके पैसे देना चाहिए तो महाराष्ट्र सरकारने ऐसा ना करते हुए जो इकॉनॉमिकल जो क्राईम होते है उसका एक कोर्ट mp3 महाराष्ट्र सरकारने जो केस आहे फाईल की जिसे हमारे लोक सब लोक परेशानी मी आहे मैत्री कंपनीने आपणा उद्योग सुरू किया और 2016 मे बंद किया और 2016 से लेकर अभी तक नही पैसे के लिए दर्द की ठोकरे खा रहे है
चंद्रपूर जिल्ह्यातील मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी साखळी उपोषण केले. राज्य सरकारच्या विरोधात मैत्रेय प्रतिनिधींचा जबरदस्त रोष बघायला मिळाला. लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेबांचा राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा रोष दिसून आला ते पुढे म्हणाले राज्य सरकार आमच्याबरोबर चर्चा करायला तयार नाही. (Maitray investors)
चर्चेसाठी बसण्याची एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिम्मतच दिसूत नाही. मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधी शासनाने बैठक आयोजित करावी यासाठी उपोषणाला बसले आहेत. लोकाधिकार परिषदेच्या आंदोलनाची मीडियाने अजिबात दखल घेतलेली नाही. शासनाने प्रसार माध्यमाला मॅनेज केलं असावं असा आरोप लोका अधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केला. मैत्रीचं नाव काढलं की पत्रकार पडून जातात. महिला प्रतिनिधी 24 तास या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी यांना सिक्युरिटी द्यायला पाहिजे. पोलिसांचा सुद्धा या आंदोलनाकडे लक्ष नाही.
राज्यामध्ये लोकशाही नाहीशी झाल्यासारखे वाटते. असे कामगार नेते व पूर्व आमदार म्हणाले. ते पुढे म्हणाले मैत्रीच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींना न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून लवकरच काहीतरी तोडगा काढण्याच्या प्रयत्न त्यांनी करावा अन्यथा ही लढाई आता शेवटची लढाई असेल असा इशारा सुद्धा त्यांनी एस. क्यू .जमा यांनी दिला. चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल प्रसार माध्यमाने घेतली नाही म्हणून मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी प्रसार माध्यमाच्या विरोधात सुद्धा नारे लावले.
मैत्रेय समूहाच्या मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि. आणि मैत्रेय रिअॅल्टर्स या कंपन्यांबाबत महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (एमपीआयडी) न्यायालयांतर्गत कारवाई सुरू आहे.
: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदार, प्रतिनिधींनी मैत्रय सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केली. मात्र गेल्या 8 वर्षांपासून दोन्ही जिल्ह्यातील कंपनीचे कार्यालय बंद पडले. त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम मिळनेही आता दुरापास्त झाले आहे. ग्राहकांच्या तक्रारीवरून कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या रकमेतून पैशाची परतफेड केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील खातेदार, प्रतिनिधींना अजूनही त्यांच्या हक्काची रक्कम मिळालेली नाही. आपले पैसे परत मिळावे, यासाठी शेकडो खातेदार, प्रतिनिधी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.
मधुसूदन सत्पाळकर नामक व्यक्तीने १९९८ मध्ये मैत्रेय कंपनीची स्थापना केली. यात बचत ठेव करण्याची सुविधा होती. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही या कंपनीची सुरुवात झाली. कंपनीने दोन्ही जिल्ह्यात कार्यालय सुरू केले. हळूहळू कंपनीचा व्याप वाढला. बल्लारपूर आणि सिंदेवाही येथेही कंपनीने कार्यालय सुरू केले. सुशिक्षित बेरोजगारही या कंपनीचे एजंट बनले. त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या हितचिंतकांनी शेकडो रुपयांची मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केली. प्रारंभीचे काही वर्षे कंपनीचा कारभार सुरळीत सुरू होता. मात्र, २००९ मध्ये मैत्रेय सर्व्हिसेस प्रा.लि. बंद करण्यात आली. कंपनीकडे ग्राहकांची कोट्यवधींची रक्कम आहे. मात्र, ते देण्यास टाळाटाळ सुरू आहे.
---------------------------
भामटा शब्द हटविण्याच्या घोषणेचा निषेध
औरंगाबाद येथील सकल राजपूत समाज मेळाव्यामध्ये 14 मे रोजी राजपूत भमटा जातीतून भामटा हा शब्द हटविण्याची घोषणा करण्यात आली. सदर शब्द हटविण्याची मागणी खऱ्या राजपूत भमटा समाजातील नागरिकांनी केलेली नाही. त्यामुळे शब्द हटविण्याच्या घोषणेचा निषेध करीत असल्याची माहिती रामराव चव्हाण यांनी दिली.
चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.यावेळी विश्वनाथ राठोड, प्रकाश राठोड, अशोक राठोड यांची पत्रकार परिषद मध्ये उपस्थिती होती.
रामराम चव्हाण यांनी सांगितले की बोगस राजपूत भामटा आमच्या विमुक्त जाती प्रवर्गात घुसखोरी केली आहे. विमुक्त जातीच्या सवलतींवर फक्त विमुक्त जातीच्या लोकांचा अधिकार आहे, या प्रवर्गात समाविष्ट नसलेल्या बिगर मागास आणि संवर्ग राजपूत लोकांनी हस्तक्षेप करू नये. हा अन्याय करणारा निर्णय जर मागे घेतला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये बंजारा, वडार, कैकाडी, छप्परबंद, कंजारभाट, आदी समूहातील नागरिक मतदान करणार नाहीत असा इशारा रामराव चव्हाण यांनी दिला आहे.
--------------------
घर खाली करून घेण्यासाठी तडीपार व्यक्तीकडून तगादा; पीडित महिलेची पत्रकार परिषदेमध्ये तक्रार
रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून बंदुकीचा भाग दाखवून घर खाली करून देण्यासाठी एक तडीपार व्यक्ती धमकी देत असल्याची तक्रार राजीव नगर येथील महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप या महिलेने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
समीर अब्दुल सत्तार असे आरोपीचे नाव असून तो राजीव नगर चंद्रपूर येथे वास्तव्यास आहे. तक्रारदार महिलाही दोन मुलींसह त्याच परिसरात वास्तव्यास असते. घराच्या शेजारीच राहणाऱ्या समीर अब्दुल सत्तार हा मूळचा हरियाणातील रहिवासी असून, आपल्या मुलाबाळांसह राहतो. त्याच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. महिला राहत असलेल्या खुल्या जागेवर काही लोकांनी नजर ठेवली आहे, हीच संधी साधून सादिक शेख नावाच्या व्यक्तीने चंद्रपूर न्यायालयात खोटी केस देखील दाखल केलेली आहे. दरम्यान समीर अब्दुल सत्तार हा व्यक्ती धमक्या देऊन घर खाली करून घेण्यासाठी तगादा आहे. यासंदर्भात तक्रार करून देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप देखील या महिलेने केला आहे.