Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे २०, २०२३

लाकडी दांड्याच्या साह्याने तरुणाची हत्या; पळून जाणाऱ्या आरोपीस नागपुरात अटक Chandrapur crime

लाकडी दांड्याच्या साह्याने तरुणाची हत्या; चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ



Chandrapur crime news

लाकडी दांड्याच्या साह्याने तरुणाची हत्या; पळून जाणाऱ्या आरोपीस नागपुरात अटक


Warora City Phuket Nagar
वरोरा शहरातील फुकट नगर येथे लाकडी दांड्याच्या सहाय्याने एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. रीतेश लोहकरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी विकी उर्फ अवनीश रेड्डी यास अटक करण्यात आली असून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना (Nagpur Central railway) नागपूर येथील रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

रितेश चा मृतदेह हा मानवी वस्ती पासून अगदी पन्नास मीटर अंतरावर आढळला. मात्र ही घटना होत असताना जवळच्या एका पानठेला चालकाने बघितली. हत्येचा थरार बघून तो घाबरून तिथून पळून गेला. या संदर्भात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सदर पणठेला चालकास सुद्धा ताब्यात घेऊन घटनेची शहानिशा केली. तेव्हा त्याने एका तरुणाने लाकडी दंड्याच्या साह्याने त्याच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचे सांगितले.

Police station पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. सदर तरुण हा कृषी महाविद्यालयात शिकत असल्याची माहिती आहे.


या घटनेनंतर आरोपी विकी उर्फ अमिनेश रेड्डी हा पळून जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर गेला होता. तो मुंबई पुणे ट्रेन मध्ये चढला असताना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. दरम्यान आरोपीचा वडील हा अवैध दारू विकत असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

murder news

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.