Gmail खाती आणि Google Photos खाती गुगल बंद करणार
जीमेल अकाउंट : गुगलने मोठा निर्णय घेतला आहे. लाखो Gmail खाती आणि Google Photos खाती गुगल बंद करणार आहेत. Google ने घोषणा केली आहे की डिसेंबर 2023 च्या सुरुवातीपासून, Gmail आणि Google Photos खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. गुगलने म्हटले आहे की जी जीमेल खाती गेल्या 2 वर्षांपासून वापरात नाहीत, अशी ती खाती बंद केली जातील. Google वर्कप्लेस वरून देखील सामग्री हटविली जाईल. जीमेल, डॉक्स, ड्राइव्ह, मीट, कॅलेंडर, YouTube आणि Google फोटो आदी हटविण्यात येतील.
एखादे Google खाते किमान दोन वर्षांपासून साइन इन केले नसेल आणि वापरले जात नसेल तर ते खाते हटविले जाऊ शकते. Google Workspace व्यतिरिक्त, Gmail, Docs, Drive, Meet आणि Calendar, YouTube आणि Google Photos वरील डेटाही हटवला जाणार आहे. Google चा हा नवा नियम पर्सनल Google खात्यांसाठी केला जाणार आहे. शाळा किंवा कंपन्यांसारख्या संस्थांसाठी हा नियम लागू नसेल अशीही माहिती समोर येत आहे. २०२० मध्ये Google ने सांगितले होते की निष्क्रिय खात्यांमधून डेटा डिलीट होईल पण अकाउंट डिलीट होणार नाही. पण आता कंपनीच्या म्हणण्यानुसार अकाउंट्सही डिलीट केली जाणार आहेत.
"Our internal analysis shows abandoned accounts are at least 10x less likely than active accounts to have 2-step-verification set up. Meaning, these accounts are often vulnerable, and once an account is compromised, it can be used for anything from identity theft to a vector for unwanted or even malicious content, like spam," said Google in the blog post, explaining the reason behind the decision.
Google says that it will take a phased approach, starting with accounts that were created and never used again. "Before deleting an account, we will send multiple notifications over the months leading up to deletion, to both the account email address and the recovery email (if one has been provided)," it added in the post.