Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे १९, २०२३

चंद्रपुरातील या ४ इमारतीवर चालला बुलडोझर | Chandrapur news

अवैध बांधकामावर मनपाची मोठी कारवाई ४ बांधकामावर बुलडोझर |

चंद्रपूर १९ मे - चंद्रपूर महानगरपालिकेने अवैध बांधकामावर कारवाई केली असुन कोनेरी तलाव,बाबुपेठ व नागपूर रोड येथील एकुण ४ बांधकामे जेसीबी व अतिक्रमण पथकाच्या मदतीने (bulldozer) काढण्यात आले आहे. (avaidh atikraman)


कोनेरी तलाव जवळील जेलच्या मागील परीसरात गफ्फुर वल्द शेख अलमुद्दीन यांचे घराचे अवैध बांधकाम, हुडको कॉलनी बाबुपेठ येथील चरण पोरटे यांचे पहिल्या माळ्यावरील अवैध बांधकाम, सुरेश डाबरे यांचे टिनाच्या शेडचे व बाथरूमचे अवैध बांधकाम व नागपुर रोडवरील अमित व अभिषेक येरगुडे यांचे २ मजली इमारतीचे अंदाजे क्षेत्रफ़ळ ११०० चौरस फूटाचे अवैध बांधकाम असल्याचे तक्रार महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाली होती. 

मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता बांधकाम हे अवैधरीत्या केले असल्याचे आढळून आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांना मनपा (CMC Chandrapur) कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ अन्वये नोटीस बजाविण्यात आली तसेच बांधकाम स्वतः हुन हटविण्याविषयी वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु अवैध बांधकामधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोलीस पथकाच्या संरक्षणात बांधकाम काढण्यात आले. (avaidh atikraman)

Bulldozers on illegal construction शहरातील अवैध बांधकामाची वाढती प्रकरणे पाहता आयुक्त यांनी अश्या बांधकामांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तिन्ही प्रभागाचे सहायक आयुक्त यांनी कार्य सुरु केले असुन अवैध बांधकाम - अतिक्रमण यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाणार आहे. सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त सचिन माकोडे, नरेंद्र बोभाटे, सहायक नगर रचनाकार सारिका शिरभाते, राहुल भोयर, आशिष भारती यांनी केली. यावेळी मनपा अधिकारी,पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.



स्थानिक मुलांना कामावर न घेतल्यास कंपनीसमोर आत्मदहन 
आवारपुर अल्ट्राटेक सिमेंट ( Ultratech Cement Plant Awarpur) कंपनीत  लोडींग भरतीत स्थानिक मुलांना कामावर न घेतल्यास कंपनीसमोर आत्मदहन किंवा आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतच्या माजी सदस्य शीला धोटे यांनी दिला आहे. 

आवारपुर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत गेल्या 1982-  83 पासून लोडिंगच्या कामावर इतर ठेकेदाराकडे स्थानिक मुले काम करीत होते. आवारपूर दत्तक गावातील या भरतीत सर्वप्रथम स्थानिक मुलांना घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य शीला धोटे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड पी. एस.  श्रीराम यांच्याकडे अर्ज देखील दिले. त्यांच्या कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यांनी अनेकदा आश्वासन देखील दिले. मात्र, भरतीमध्ये स्थानिक मुलांना घेण्यात आलेले नाही. आवारपुर सिमेंट वसाहतीतील मृत आणि पॅरालिसिस किंवा सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांनी १९ एप्रिल 2023 पासून टोकाची भूमिका घेऊन आंदोलन सुरू केले. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुलांना नोकरीवर घेण्यासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.