Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०४, २०२३

अड. दत्ताञय फडतरे यांचे आॅल इंडीया बार परीक्षेत यश Ad. Dattanaya Phadtare




पुणे : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील अॅड .दत्ताञय फडतरे यांनी आखिल भारतीय बार परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .नुकतेच बार कौन्सिल आॅफ इंडीया दवारे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले .या निकालादवारे अॅड . फडतरे भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयांत तसेच सर्वोच्च न्यायालयात वकीली करण्यासाठी पाञ ठरले आहेत . पुरंदरच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुबांतील अॅड. फडतरे यांनी आॅल इंडिया परिक्षेत बाजी मारली आहे .यामुळे त्याचे सर्वञ कौतुक होत आहे .




कोणतीही मोठी पार्श्वभुमी नसताना ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षण  ते  न्यायव्यवस्थेतील एका मानाच्या उंचीवर ते वकीली करण्यासाठी पाञ ठरले आहेत.

 त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत झाले .   पदवीपर्यंतचे शिक्षण  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय , सासवड मधुन तर  पदव्युत्तर पदवीचे शिक्षण एस.पी काॅलेज टिळक रोड येथुन घेतले .पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री  नवलमल फिरोदिया  विधी महाविद्यालयातुन कायद्याचे ( एलएल.बी )शिक्षण  पुर्ण केले आहे . ते सध्या पुणे जिल्हा आणि सञ न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत.


जीवनात यशस्वी होण्यासाठी  सकारात्मक विचारांच्या संगतीत राहणे , आपल्याबददल आजुबाजुचे लोक काय विचार करतात या गोष्टी पुर्णपणे बाजुला ठेवुन सध्याच्या  जगत असलेल्या परिस्थितीचे भांडवल व   दिखावा न करता मोठे ध्येय   घेवून  जगले तर यशस्वी होणे अवघड नसल्याचे अॅड . फडतरे यांनी सांगितले . 


शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक व शालेय अभ्यासक्रमांबरोबरच , त्यापलीकडे पाहण्याची दुरदृष्टी अधिक विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.