झरखंड राज्यातील गुमला जिल्ह्यातील डुमरी परिसरात भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात आपल्या मुलीचे लग्न लावून परतणाऱ्या पालकांसह चार जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अचानक चालकाचा पिकअप व्हॅनवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट केले. (Road accident)
सुंदर ग्यार हे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह मुलीच्या लग्नासाठी गेले होते. ही घटना घडली तेव्हा कुटुंबीय लग्न करून परतत होते. आपल्या मुलीच्या लग्नासाठी हे कुटुंब मंगळवारी सकाळी नऊ वाजता झरी पोलीस ठाण्याच्या सारंगडीह गावात पोहोचले होते. लग्न आटोपून रात्री साडेआठ वाजता पिकअपवरून परतत होते. दरम्यान, जर्दा गावाजवळ चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले. गाडी खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, मे ०३, २०२३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments