Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २१, २०२३

हल्ला करणारा बिबट बछड्यासह जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे बिबट्याने हल्ला करून एक महिला ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर गावामध्ये वाघाला पकडण्यासाठी तणाव निर्माण झाला. आज रात्री या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उप वनक्षेत्रातील वाघोली बुटी येथे पुन्हा बिबट्याने हल्ला करून एक महिला ठार केल्याची घटना घडली. एका महिन्यात दुसऱ्यादा घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले.

वाघोली बुटी येथील प्रेमीला मुकरू रोहनकर ही महिला आज शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिला जागीच ठार केले. घटनेची माहीती मिळताच वनविभाग व पोलीस विभाग घटनास्थळी गेले. 


यापूर्वी  वाघोली बुटी येथील महिला ममता हरिचंद्र बोदलकर (७०)  ह्या शेतात काम करण्यास गेल्या दरम्यान काम करत असतांना अचानक त्यांच्यावर हल्ला करून काही दूरवर फरफटत नेत ठार केले होते.

या दोन्ही घटनांमुळे या परिसरात खळबळ उडाली. (Woman killed in tiger attack in Wagholi) आमदार विजय वडेट्टीवार यांनीही आक्रमक पवित्र घेतल्यानंतर विभागाचे पथकाने या भागांमध्ये वैनगंगा नदीच्या परिसरात पिंजरे लावले होते. त्यानंतर मादी बिबट पिंजरा धडकला असून त्यासोबत दोन बछडे ही सापडले आहेत. 

दुसऱ्या एका घटनेत मेहा बूजरुक (Leopard attack at Meha Bk) येथे मागील महिन्यात पहाटेच्या सुमारास कवडू निकुरे यांच्या गोठ्यातून बिबट्याने वासरू ठार केला.  नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट पळून गेला. आज मेहा बुद्रुक येथे बिबट्याने डुकराची शिकार केली.. तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.