Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १०, २०२३

पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द #NCP #SharadPawar #India #Maharashtra @ECISVEEP

पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द 
पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
Nationalist Congress Party loses national party tag: EC

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळं शरद पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. #NCP #SharadPawar #India #Maharashtra @ECISVEEP

 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा 2019 चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षासह तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. #NCP #SharadPawar #India #Maharashtra @ECISVEEP

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची ही यादी जाहीर 


Nationalist Congress Party loses national party tag: EC
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता. शरद गोविंदराव पवार हे  इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.