Akola अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळीची आरती सुरू असताना मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या शेड खाली आरतीसाठी अनेक लोक उपस्थित होते. त्यावेळी मंदिराला लागून भलं मोठं कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. त्यावेळी शेड खाली असलेले सर्व लोक दबले गेले. या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागलाय. Paras temple
पावसामुळे मदतीला अडचण निर्माण होत आहे. सततच्या पावसामुळे झाड बाजूला करताना अडचणी येत आहेत. अकोला जिल्ह्यातील पारस गावात वादळानं लिंबाचं मोठं झाड बाबूजी महाराज मंदिराच्या शेडवर कोसळले. बाबुजी महाराज संस्थानाच्या मंदिरात हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच बचाव दल अकोल्यावरून पारसमध्ये दाखल झाली आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त, डीआयजीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
Akola Maharashtra India