Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २५, २०२३

अमृत पाणीपुरवठा योजना: टेस्टिंगच्या नावावर जनतेला भूलथापा Amrit Water Supply Scheme


अमृत नळ योजनेचा पाणीपुरवठा नियमित करा

भाजप मध्य मंडळाच्या पदाधिका-यांची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी*



चंद्रपूर:- अमृत नळ योजनेचा पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत भाजप मध्य मंडळाच्या पदाधिका-यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर करुन मागणी केली आहे.

सदर निवेदनातून म्हटले आहे की स्थानिक समाधी वार्ड व गणपती वार्ड येथे गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची टंचाई आहे.चंद्रपूर महानगरात अमृत योजनेच्या निमित्ताने या वार्डातील जनता प्रफुल्लीत झाली असे काहीसे वाटले होते.पण गेल्या एक वर्षापासून अमृत योजनेच्या नळाची जोडणी झाली असूनसुद्धा जनतेला तहानलेले ठेवले आहे.सतत एक वर्षापासून तोंडी व लेखी तक्रार देऊनसुद्धा या वार्डातील जनतेला पाण्याच्या संकटातून मुक्त करण्याचा विचार महानगर पालिकेतील अधिका-यांनी केलेला असावा असे आम्हाला दिसत नाही.आज नळ जोडणी करुन एक वर्ष लोटून सुद्धा फक्त टेस्टिंगच्या नावावर जनतेला भूलथापा देत पाण्यापासून वंचित ठेवले आहे.तरी सदर योजनेअंतर्गत लवकरात-लवकर आम्हाला सुरळीत पाणी दिले नसल्यास आम्ही महानगर पालिकेसमोर विराट मोर्चा काढून आंदोलन करु असा इशारा या निवेदनातून दिला आहे.याप्रसंगी मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,नकुल आचार्य,कार्तिक मुसळे,लक्ष्मण महालक्ष्मे, मयुर घरोटे,सतिश चांदेकर,बरेच कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.