|
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या ८ दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या भूमिकांविषयीच चर्चा सुरू आहे. त्यातच, महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळेचही अजित पवार आणि भाजप प्रवेश पुन्हा चर्चेत आहे. अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन त्यांना समर्थन देतील अशा चर्चा होत असतानाच, यावर आमदार रवी राणा यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपासोबत जातील असं बोलले जात आहे. सध्या यावर कुणीही थेट भाष्य करत नाही. मात्र ३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहेत असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी केले आहे.
सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.