चंद्रपूर :
देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने येत्या दि. ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करणेबाबत सर्व सार्वजनिक व खासगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना सुचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने येत्या ४ मार्च रोजी महावितरणमध्ये सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे चंद्रपूर परिमंडळात आयोजन करण्यात आले आहे.
जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवादेतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडलस्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्याहस्ते गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदी कार्यालय प्रमुख या कार्यक्रमास मार्गदर्शन करतील. शिवाय महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
बल्लारपूर रोड वरील बाबुपेठ कार्यालयात, सकाळी ११ वाजता मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच सर्वच ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये वीजसुरक्षेची शपथ, वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. राज्यात विविध स्तरावर ४ मार्च रोजी होणाऱ्या या लाईनमन दिवस कार्यक्रमास नियमित व बाहयस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
चंद्रपूर परिमंडळात ,‘लाईनमन ’ म्हणजेच प्रकाशदुत किंवा जनेतचा मित्र ‘जनमित्रांनी ’ चंद्रपूर व गडचिरेालीसारखा दुर्गम प्रदेश, जंगल, दऱ्या खोरे, पहाडावर काम कधी वादळ कधी वारा, पूरपाऊस तर कधी कडयाक्याची थंडी. हे सर्व ऋतू एक प्रकारे महावितरणच्या कर्मचाऱ्याची परिक्षा पहात असतात. गडचिरेाली सारख्या दुर्गम जंगली भागात शकडो किमी वीजवाहिनीची देखभाल दुरूस्ती, तर कधी पावसात, नदी नाल्यातून गेलेल्या वीजवाहिण्या, इंसुलेटर्सची दुरूस्ती वीजग्राहकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर दुरूस्त होणे हे एकमेव ध्येयाने वीजेरी, डिसचार्ज रॅाड, वितळतार इ. इत्यादी साधने घेवून , चंद्रपूर वाघांचे नंदनवन, अशा या वाघासारखे हिंस्त्र प्राण्याच्या सानिध्यात रात्री अपरात्री वीजपुरवठा सुरळीत केला आहे.भर उन्हात दुपारी ११ वा १२ ची वेळ किंवा संध्याकाळ, रात्र केव्हाही वीज पुरवठा खंडीत झाल्याची तक्रार सोडविण्यासाठी लाईनमन आपली, कवच कुंडले, रबराचेहातमोजे, डिस्चार्ज रॉड, हारनेस, झुला घेवून वीजेच्या खांबावर रोहित्रांवर काम उन्हाच्या चटक्याची पर्वा न करता, मार्च, एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधित महावितरणच्या प्रकाशदुतांनी तांत्रिकस्वरूपाच्या ४३ हजार ३३४ तक्रारी भर उन्हातान्हात, रात्रीच्या उकाडयात, कडाक्याच्य थंडीत व पावसात, जंगलात वाघ अस्वले तथा वण्यप्राण्यांच्या सानिध्यात सोडवल्या आहेत.