Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २२, २०२३

चंद्रपूर : अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार | Chandrapur Accident

चंद्रपूर : अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार | Chandrapur Accident Doctor Family Death

चंद्रपूर : भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) व डॉ. अतुल गौरकार (34) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. (Dr. Ashwini Gaurkar- Zade and Dr. Atul Gaurkar)
चंद्रपूर : अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार | Chandrapur Accident
डॉ. अश्विनी गौरकार व डॉ. अतुल गौरकार

ही घटना वरोरा- भद्रावतीजवळ घडली. ते दोघे आपल्या चिमुकल्या बाळाला घरी आई वडीलाजवळ ठेवून वरोरा येथे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-34- AM- 4240 ने गेले होते.

वरोरा हायवे (Wani- Varora Highway)वर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 ने समोरासमोर जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार तब्बल अर्धा किलोमीटर ट्रक ने खेचत नेली. या घटनेत डॉ. अश्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असल्याने डॉ. अतुल यांना उपचारार्थ हलविण्यात आले. चंद्रपूर ला नेत असताना भद्रावती जवळ डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला. 
महामार्गावरच्या शेंबळ गावाजवळ अपघात झाल्यावर स्थानिकांनी दोघांना वरोरा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोवर उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.