Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २३, २०२३

आठ दिवसांपासून बेपत्ता दोघांचेही मृतदेह सापडले; मृत तरुण महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय नेत्याचा पुतण्या

माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पुतण्या आणि त्याच्या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. आठ दिवसापूर्वीच बेपत्ता झाल्याची तक्रार चंद्रपुरात देण्यात आली होती.



The nephew of former Union Minister Hansraj Ahir and one more person were found hanging in Chandigarh after the two went there from their native Chandrapur in Maharashtra more than a week ago.

प्राप्त माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार, सध्या मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे (NCBC) अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पुतण्या महेश हरिश्चंद्र अहिर आणि त्यांचे मित्र हरीश धोटे आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील चंद्रपूरहून चंदीगडला गेले होते. त्यानंतर कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क करू शकले नाहीत. “कुटुंबातील सदस्यांनी 15 मार्च रोजी चंद्रपूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी एक पथक चंदीगडला पाठवले. बुधवारी संध्याकाळी चंदीगडमध्ये अहिर आणि धोटे यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. चंडीगडच्या सेक्टर ४३ मधील बसस्थानकासमोर सापडले. (आयएसबीटी-४३) सेक्टर ५२ अंतर्गत कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेतला होता. त्यांच्या खिशात असलेल्या आधार कार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे.



महेश हरिश्चंद्र अहीर (वय २४, रा. कोतवाली वॉर्ड जलनगर चंद्रपूर) आणि हरीश प्रदीप धोटे (२७, रा. बालाजी वॉर्ड चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.
दोघांचे नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी चंदीगडला रवाना झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला असून तो चंद्रपूरला आणण्यात येणार आहे त्यानंतर त्यांच्यावर शांतीधाम येथील स्मशानभूमी अंत्यविधी केला जाईल.
दरम्यान ही घटना आत्महत्या की हत्या याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

The bodies of both, missing for eight days, were found

Mahesh Harishchandra Ahir and his friend Harish Dhote, both in their mid-20s, had gone to Chandigarh eight days ago.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.