Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २३, २०२३

धक्कादायक । मंदिरात पडला रक्ताचा सडा; दोघांची हत्या | Chandrapur Crime News | Chandrapur hatyakand

*भद्रावती तालुक्यातील मांगली येथील घटना

शिरीष उगे (भद्रावती -प्रतिनिधी)
 भद्रावती तालुक्यातील मांगली येथे अज्ञात व्यक्तींनी जगन्नाथ बाबा मंदिर येथील दान पेटी फोडून तिथे राहणाऱ्या दोघांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Chandrapur Crime News | Chandrapur hatyakand

काल रात्री मांगली शेत मालक बापूजी खारकर ७० वर्ष व सहकारी मधुकर खुजे ७१ वर्ष हे शेतातील जगन्नाथ बाबा मंदिर येथे झोपले असताना काही दरोडेखोरांनी सर्व प्रथम झोपेत असलेल्या बापूजी व मधुकर यांच्यावर लोखंडी सब्बलीने वार करून दोघांची हत्या कण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांची हत्या केल्यानंतर दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटी घेऊन पसार झाले. ही हत्या लोखंडी सब्बल ने केली आहे. दरोडे खोर दान पेटी घेऊन पसार झाले. दानपेटीत किती रक्कम होती याबाबत पोलिस अनभिज्ञ आहेत. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हजर असून पोलीस तपास सुरू आहे. आहे. जिह्यात गुन्हेगारी चा ग्राफ वाढत असताना पोलिसांना आणखी या घटनेने चिंताग्रस्त केले आहे. दुहेरी खूनाच्या या घटनेने गाव हादरून गेले आहे. पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी असून आरोपीचा मागोवा घेतला जात आहे.





शेतकऱ्यांच्या हत्याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले विधानसभेत मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या मांगली परिसरामध्ये शेत शिवारात असलेल्या मंदिरात झोपी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चोरीच्या दृष्टीने आलेल्या या दरोडेखोरांनी शेतकऱ्यांची हत्या केली असून त्यांचा तपास तातडीने करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भद्रावती वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत केली आहे. 

भद्रावळी तालुक्यातील मांगली परिसरामध्ये जगन्नाथ बाबा मंदिर आहे शेतकरी बापूजी खारकर आणि त्याचे सहकारी मधुकर खोजे हे वयोवृद्ध असून दोघेही मंदिरात झोपले होते मंदिरात दानपेटी चोरीसाठी आलेल्या दरोडेखोरांनी या दोघांची हत्या केली या घटनेमुळे भद्रावती मतदारसंघांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सभागृहाचे लक्ष वेधले. या दरोडेखोरांची तातडीने चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

brutal-killing-of-two-farmers-in-jagannath-baba-math-in-bhadravati-taluka


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.