अयोध्येतील राम मंदिर |
*देशातील सर्वोत्तम सागवान काष्ठ दिल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार*
*वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंदिर महासचिवांचे पत्र*
*अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी २९ रोजी जाणार लाकूड*
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवले जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या पुढाकारातून मोठ्या थाटामाटात, भव्य पूजापाठ आणि रॅलीतून लाकडे पाठवणार येणार आहेत. यासाठी रामायणातील काही पात्र आणि संगीत क्षेत्रातील कलावंत, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे. २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकार मधील तीन कॅबिनेट मंत्री तथा अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार
ayodhya ram mandir चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या दरवाजांसाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे.
श्रीराम जन्मभूमी निर्माणाधीन समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील देहराडुन येथे असलेल्या फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अॅन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांची चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली होती. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या या विषयात व्यक्तीश: लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्याची सूचना संबंधितांना केली होती.
सागवानचे हे काष्ठ २९ मार्च २०२३ रोजी शोभायात्रा काढत अयोध्येकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच ट्रस्टने ना. श्री. मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
*लाकडावर करणार नक्षीकाम व कोरीवकाम *
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी ayodhya ram mandir मिळणाऱ्या लाकडावर अभियंते व कलावंत नक्षीकाम करणार आहेत. सागवानच्या हे काष्ठ ना. श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शुभहस्ते अयोध्येकडे प्रस्थान करावे, अशी विशेष विनंतीही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी पत्रात केली आहे.
दि. २९ मार्च रोजी होणाऱ्या काष्ठ पुजन शोभायात्रेच्या नियोजनासंदर्भात रामबाग (चंद्रपूर) येथील बैठक संपन्न झाल्यानंतर लागलीच बल्लारपूर येथील पदाधिकाऱ्यांसह स्थानिक शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठ पूजन समितीची बैठक संपन्न झाली. 29 किंवा 30 मार्च रोजी मोठा पूजा होणार आहे. राम मंदिराच्या उभारणीत चंद्रपूरच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले.
दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा पाठोपाठ अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उच्च प्रतिचे सागवान लाकूड पुरवठा करण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मौलिक सागवान देखील देशातील अनेक आकर्षक व देखण्या इमारतींमध्ये वापरले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेतून दिल्ली येथे आकाराला येत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा या इमारतीत चंद्रपूरचे उच्च प्रतिचे सागवान वापरण्यात आले आहे.
भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड https://t.co/7IrhZ1LIfE https://t.co/Hb4QbrHnGY
— खबरबात™ | 𝐊𝐡𝐚𝐛𝐚𝐫𝐛𝐚𝐭™ (@khabarbat) March 21, 2023 >अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिरात देखील चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरण्यात येणार आहे. या सागवानाची निवड करण्यासाठी अयोध्येतून एक चमू चंद्रपूरला आली. राम मंदिराचे काम असल्याने त्यासाठी अतिशय माफक दरात हे सागवान उपलब्ध करून देण्यात आले आहे. राम मंदिराचे महाद्वार तथा मंदिरातील इतर अनेक ठिकाणी चंद्रपूरचे सागवान वापरण्यात येणार आहे.
ram-mandir-teak-wood-will-be-sent-from-chandrapur-of-maharashtra-for-the-construction-of-ram-temple-in-ayodhya