असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती ; अनेकांचा पक्ष प्रवेश
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवगर्जना मेळावा स्थानिक सिद्धिविनायक मंगल कार्यालय वरोरा येथे पार पडला. यावेळी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, युवासेना विस्तारक शरद कोळी, पूर्व विदर्भ प्रमुख महिला आघाडी शिल्पा बोडखे, सुरेश सखरे पूर्व विदर्भ संघटक, युवासेना नागपूर विभागीय सचिव निलेश बेलखेडे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेकडो शिवसैनिकांचा शिवसेना व युवासेना मध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला.
तसेच शिवसेना व युवासेना नवनियुक्त पदाधिकारीची निवड करण्यात आली. शिवसेना ही फक्त उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचीच असे व्यक्तव चंद्रकांत खैरे यांनी केले.त्याच सोबत आपल्या वेगळ्या शैलीत युवासेना विस्तारक शरद कोळी यांनी विरोधक व शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकार व निवडणूक आयोगाचा समाचार घेतला या सभेचे सूत्रसंचालन जेष्ठ शिवसैनिक बंडू डाखरे यांनी तर आभार प शहर प्रमुख संदीप मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाजी दहिकर,तालुका प्रमुख नंदु पढाल, तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार,तालुका प्रमुख विपीन काकडे, तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते,शहर प्रमुख घनश्याम आस्वले,शहर प्रमुख सरताज सिद्धकी,शहर संघटक किशोर टिपले,युवासेना जिल्हा सनमव्यक दिनेश यादव, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, जिल्हा चिटणीस येशु आरगी, उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे, तालुका प्रमुख राहुल मालेकर, तालुका प्रमुख ओंकार लोडे, उपतालुका प्रमुख अक्षय झिले, शहर प्रमुख पियुष सिंग, शिवसेना उपतालुका लक्ष्मण ठेंगणे, उपतालुका सागर पिंपशेडे , शिवसेना उपशहर प्रमुख गजू पंधरे, उपशहर मनिष दोहतरे, जेष्ठ शिवसैनिक दडमल ,रमेश मेश्राम,अतुल नांदे, हरी वैद्य, डांगेजी,विनोद वाटमोडे,रवी वाटकर,उपजिल्हा सनमव्यक कीर्ती पांडे,माजी नगरसेविका सुषमा भोयर, माजी नगरसेविका प्रणाली मेश्राम, वंदना डाखरे, साधना मानकर, शहर संघटिका माया टेकाम, बेलेकरताई, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका यांनी अथक परिश्रम घेतले.