Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०८, २०२३

11 मार्चपासून चंद्रपुरात 35वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन | Maharashtra Pakshimitra Samelan





11 मार्चपासून चंद्रपुरात 35वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन | Maharashtra Pakshimitra Samelan


चंद्रपूर: यंदा 35वे पक्षिमीत्र संमेलनाचे आयोजन चंद्रपूर शहरात येत्या 11 व 12 मार्च रोजी वन अकादमी परिसरातील ‘प्रभा’ हॉल मध्ये केले आहे. या संमेलनाचे उदघाटन राज्याचे वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. यावेळी पक्षी छायाचित्र प्रदर्शनीचे सुध्दा उद्घाटन करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील पक्षी अभ्यासक, तज्ञ एकत्रीत येणार आहेत. पक्षिमित्रांचा अभ्यास, संशोधन यावर सादरिकरण, व्याख्याने होणार असून या शिवाय पक्षिनिरीक्षणांचा कार्यक्रम असेल.


सदर संमेलनाचे आयोजन जिल्हयातील पर्यावरण क्षेत्रातील कार्यरत इको-प्रो संस्थेने केले असुन, सह आयोजक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर वनविभाग आहे. सदर संमेलन जिल्हयातील 'वरोरा' तालुक्यात अस्तित्व असलेले संकटग्रस्त अशा 'माळढोक' पक्ष्याचे भविष्यतिल संवर्धन तसेच जुनोना परिसरातुन शेवटचा ‘सारस’ पक्षी सुध्दा संपुष्टात आल्याने येथील सारस अधिवास संवर्धन या संमेलनाच्या चर्चेचा मुख्य भाग असणार आहे. याकरीता 'माळढोक व सारस' पक्षी यावर अभ्यास असणारे तज्ञ, मार्गदर्शक यांचे सादरीकरण व अभ्यास मांडण्यात येणार आहे. सोबतच राज्यातील पाणस्थळ, रामसार दर्जा स्थळ, माळरानातील पक्षी, विवीध जलाशयावर येणारी स्थंलातरीत पक्षी, वन्यपक्षी आदी पक्षी व पक्षी अधिवास संरक्षण व संवर्धनाविषयी महत्वपुर्ण मांडणी येणारे पक्षीमित्र करणार आहे.

३५वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष श्री. राजकमल जोब हे आहेत. उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या सहा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, तसेच पक्षी विषयक पुस्तके प्रकाशित होणार आहेत. शिवाय, पर्यावरण अभ्यासक किशोर रिठे यांची प्रगट मुलाखत होईल, ही मुलाकात पर्यावरण कार्यकर्ते स्वानंद सोनी घेणार आहे.
WhatsApp share | Share on WhatsApp


सदर पक्षिमीत्र संमेलनादरम्यान 'माळढोक' पक्षी यावर वाईल्डलाईफ इस्टीटयुट ऑफ इंडीयाचे डॉ. सुतीर्था दत्ता, अहमदनगरहुन डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. अनिल माळी, डॉ अनिल पिंपळापुरे यादी मान्यवर चर्चासत्रात सहभागी होतील. सोबतच 'सारस' पक्षी यावरभंडारा-गोंदिया चे मुंकुंद धुर्वे, सावन बाहेकर व रवी पाठेकर चर्चासत्रात सहभागी होतील. याशिवाय पक्षी छाायाचित्रण संरक्षण व जनजागृती, वन्यपक्षी, पाणस्थळ, रामसार स्थळ, माळरानातील पक्षी यावर सुध्दा सादरीकरण व चर्चासत्र होणार आहे.

यावेळी पक्षी छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात येणार असुन ही प्रदर्शनी अनेक पक्षी व पक्षी अधिवासाची छायाचित्रे प्रदर्शीत केले जाणार आहे. यासोबतच 'पक्षी छायाचित्र स्पर्धा' सुध्दा आयोजीत करण्यात आलेली असुन राज्य व राज्याबाहेरून सहभाग घेतलेल्या स्पर्धकांची पक्षी छायाचित्रे सुध्दा या प्रदर्शनात बघायला मिळतील. सदर संमेलनात राज्यभरातुन येणारे जवळपास तिनशे पक्षिमित्र निवासी असणार आहे. या संमेलनात चंद्रपूर शहरातील पर्यावरण प्रेमी, पक्षी अभ्यासक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.