गोंडवाना विद्यापिठ नामांतरणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापिठाचे स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली असे नामकरण करण्याची मागणी क्रा. नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेचे अशोक तुमराम यांनी केली आहे.
GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI
महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत.या भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडणे आवश्यक आहे. यासाठी चंद्रपूर गडचिरोली या भागात वास्तव्यास असणा-या आदिवासी जमातीसाठी खालील बाबी शासनाने विचारात घ्याव्या व आदिवासी समाजाला विकासाची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी देखील अशोक तुमराम यांनी केली आहे.
ते म्हणाले की, हा प्रदेश गोंडवन म्हणून ओळखला जातो. कारण या प्रदेशात आदिवासी गोंड राजांचे जवळपास सातशे वर्ष एकछत्री साम्राज्य होते. या प्रदेशात आदिवासी जमाती मोठया प्रमाणात वास्तव्यास आजही आहेत. जंगल जिव्हारात, डोंगर द-यात या जमाती आपले आयुष्य आपल्या परीने जगत आहेत. GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना महाराष्ट्रातील आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष होत आहे. आदिवासी जमाती नागरी संस्कृती पासून खुप दुर रानावनात राहतात. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून फारच लांब असलेल्या या जमाती सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टया आजही मागासलेल्या आहेत. या जमातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. गोंडवानात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी जमातींना शिक्षणासोबतच उदरनिर्वाहासाठी व्यवसाय उपलब्ध करुन त्यांची आर्थिक स्थिती मजबुत करणे गरजेचे आहे. या भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडणे आवश्यक आहे. यासाठी चंद्रपूर गडचिरोली या भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी जमातीसाठी खालील बाबी शासनाने विचारात घ्याव्या व आदिवासी समाजाला विकासाची संधी उपलब्ध करुन द्यावी या एकमेव उद्देशाने निवेदन सादर करण्यात येत आहे. GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI