भगवान प्रभुविश्वकर्मा जयंती कार्यक्रम
चंद्रपुर (प्रतिनिधी)दिनांक 06/02/2023. स्थानिक बालाजी वार्डातील विठ्ठल मंदिर येथे भगवान प्रभुविश्वकर्मा जयंतीनिमित्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना समाजाचा विकास करायचा असेल तर तो स्वतापासुन करायला हवा. समाजातील प्रत्येक घट्काने शिक्षित झाल पाहीजे. समाजविकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. असे मत श्री कन्यका नागरी सहकारी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत खोलगडे यांनी कार्यक्रम प्रंसगी व्यक्त केले.
सविस्तर वृत्त असे की, प्रभु विश्वकर्मामय पांचाळ सुतार बहुउद्देशिय विकास मंडळ चंद्रपुर यांच्या वतीने प्रभुविश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम नुकता घेण्यात आला.कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष देविदास आसटकर, प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणुन श्री कन्यका नागरी सहकारी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत खोलगडे , माहीती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे यांनी यावेळी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. कृष्णकांत खानझोडे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन बोलतांना म्हणाले की, समाजाने एकत्रित येवुन केलेले कार्य हे यशस्वी होत असते. तेव्हा समाजातील प्रत्येकांनी समाजाभिमुख होवुन समाजाचा विकास करावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात हरिभाऊ वानखडे व रविन्द्र कदम यांचा सेवानिवृत्त झाल्यानिमित्ताने समाजातील जेष्ठ नागरीक म्हणुन नंदकिशोर खेडकर , गुणवंत विद्यार्थी म्हणुन प्राविण्य मिळविलेल्या कु. सेजल पुसदकर, रुची टवलारकर, मनस्वी खानझोडे सामाजिक क्षेत्रातील युवा नेतृत्व म्हणुन ऍड.प्रतिक्षा देवुळकर यांचा प्रभु विश्वकर्मामय पांचाळ सुतार बहुउद्देशिय विकास मंडळ चंद्रपुर यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिहर येलकर, सुत्र संचलन अनिल नानोटकर यानी तर आभारप्रदर्शन सौ. क्षमा नानोटकर यांनी केले. कार्यक्रमाला अशोक राजुरकर,अजय ईश्वरकर, हरीभाऊ वानखडे, दिलीप पुसदकर,मनोज तांबेकर, जयंतराव खंडाळकर, सुनिल बोरेकर, वसंतराव येणकर, दिपक टवलारकर व विश्वकर्मामय पांचाळ सुतार समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्यने उपस्थित होते.