Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी २५, २०२३

शिबिरार्थ्यांनी केले उत्स्फूर्तपणे तांत्रिक मेंटेनन्सची निःशुल्क कामे

मोरवा येथे आय.टी.आय.च्या रासेयोचे श्रमसंस्कार शिबिर




चंद्रपूर ( प्रतिनिधी)- 
     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे  विशेष श्रमसंस्कार शिबिर मोरवा येथे सुरू आहे.हनुमान  मंदिर चौकात आयोजित 'मी दारुड्या बोलतोय "या एक तासाच्या आत्मकथनपर कार्यक्रमात मारोती साव यांनी आपल्या  जीवनात घडलेल्या सत्य घटना सांगत उपस्थितांना व्यसनमुक्तीचे धडे दिलेत. केवळ संगतीमुळे बियर पासून सुरू झालेला प्रवास पुढे देशीदारू पर्यंत कसा पोहोचला .  शारीरिक, आर्थिक आणि संसारिक हाल अपेष्टा  कश्या भोगाव्या लागल्यात .  या काळात त्यांचा  जीवघेणा अपघात झाला, त्या अपघातातून कसेबसे ते  वाचले  आणि  गुरुदेव सेवा मंडळाच्या  माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्धार केला. आता ते पूर्णतः व्यसनमुक्त असून  उच्च शिक्षणही घेतलेले आहे. यामुळे शारिरीक, आर्थिक , सामाजिक प्रगती  करू शकलो.हा चमत्कार केवळ व्यसनमुक्तीमुळे झाला. म्हणून  युवकांनी तंबाखू दारू सारख्या घातक व्यसनांपासून दूर राहावे,  तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मिती साठी प्रयत्न करावे असे भावनिक आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  बंडोपंत बोढेकर होते.  मुख्य कार्यक्रम अधिकारी नामदेव गेडकर , सरपंच सौ. स्नेहा साव, पोलीस पाटील नरेंद्र  डोर्लिकर,भगवती पिदूरकर, मुख्याध्यापक अनिल आंबटकर, आदींची यावेळी उपस्थिती होती.  स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियानात  सेवा देणारे बाबा पानघाटे, शेषराव गुरनुले, विठ्ठल चौधरी, धनराज घोरूडे यांना गौरव चिन्ह व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामविकासाच्या गीतांचे गायन श्रीगुरुदेव सेवा मंडळ मोरवा व चारगाव यांनी  केले.  बुधवारच्या सायंकाळच्या सत्रात  अंधश्रद्धा निर्मूलन विषयांवर  प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन इंजि. प्रदीप अडकिणे यांनी केले. याप्रसंगी प्रदीप अडकिने म्हणाले की, आपण जीवन जगत असताना बुवाबाजी पासून दूर राहिले पाहिजे .सदैव वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगला पाहिजे, जेणेकरून आपले शोषण होणार नाही. अंधश्रद्धामुक्त समाज निर्मितीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. तर रोजगाराच्या संधी या विषयांवर नामदेव गेडकर म्हणाले की रोजगार आताही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण ते  प्राप्त करण्यासाठी आपल्या अंगी जिद्द आणि स्पर्धेची मानसिकता ठेवून तशी सकारात्मक तयारी करावी लागते , त्या दृष्टीने आजच्या युवकांनी विचार करावा, असे ते म्हणाले. संपुर्ण शिबिर  प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांच्या प्रमुख सुरू असून दररोज दुपारच्या सत्रात  स्वच्छता अभियानासह इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, वेल्डिंगची कामे, गवंडीची कामे ,प्लंबिंगची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. शाळा मैदान व कचरा व्यवस्थापनावर विशेष जोर देण्यात आला. याकरिता निदेशक  बंडोपंत बोढेकर, महेश नाडमवार,  प्रभाकर हनवते ,बंडू कांबळे, रामभाऊ लांडगे,  किशोर बोंबले, जयेंद्र आसुटकर, रमेश रोडे, ए.बी. बोढाले, रमेश रणदिवे  आदींनी परिश्रम घेतले. सहभागी शिबिरार्थींनी नवमतदार व  अल्पमुदती व्यवसाय अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या युवकांचा सर्वे करण्यात आला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.