जुन्नर : निमगिरी येथे अंगणवाडीतील चिमुकल्यांना गणवेशाचे वाटप
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील निमगिरी येथील खांडीची वाडीमधील अंगणवाडीतील चिमुकल्यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल निंबा रढे यांच्या वतीने मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कुल निमगिरी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी.बी.मानकर, डी.एस.केंद्रे, लक्ष्मण रढे, भाऊ साबळे, वाळू रढे, सुदाम साबळे, विकास साबळे, लुपिन संस्थेच्या झुंबर साबळे, अंगणवाडी सेविका गंगुबाई साबळे, मदतनीस सावित्रीबाई भालेराव, केशिला साबळे, मनाबाई साबळे, मंदा मुंढे, शशिकला साबळे, बारखाबाई साबळे, शितल साबळे, डिगांबर साबळे, राजेंद्र साबळे, विठ्ठल साबळे, भास्कर भालेराव आणि परिसरातील पालक, शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
विठ्ठल रढे म्हणाले, समाजातील लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले. चिमुकल्यांच्या चेह-यावर हास्य पाहून खुप समाधान मिळाले. यावेळी झुंबर साबळे, डी.बी.मानकर, डी.एस.केंद्रे, भाऊ साबळे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण रढे यांनी तर आभार प्रदर्शन भास्कर भालेराव यांनी केले. कार्यक्रमानंतर खाऊ वाटप करण्यात आले.