नागपूर प्रतिनिधी --
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंध संस्थान नागपूर येथे तिन दिवसीय निवासी नर्सरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातुन प्रशिक्षणार्थी आले होते.सदर प्रशिक्षणामध्ये फळ रोपे, भाजीपाला रोपे तयार करणे, फळे भाजीपाला अभिवृद्धी, फळबाग आखणी आणि उभारणी, बागेचा आराखडा, नर्सरी उद्योगांची उभारणी आणि व व्यवस्थापन, पिकांचे पीक संरक्षण निगा आणि काळजी, नर्सरीसाठी परवाना प्रक्रिया, नर्सरीमधील सुरक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रक्षेत्र भेटी आदी विषयांचा समावेश होता. प्रशिक्षण विनामूल्य होते. सदरचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले आहे, या कार्यशाळेत प्रमुख उपस्थितीत हेमंत जगताप, दिगंबर साबळे , रुपकुमार पगारवार,दिपक बेदरकर, प्रभाकर शिवणकर, डॉ अश्विनी गायधनी,कोनन इंद्रपाल सिंग, डॉ सिमा ठाकरे , कांतिलाल पवार,सरोज देशमुख, पुजा वासोदे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर हा कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ कैलास मोते, मिलींद आकरे, डॉ आशिष जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत जगताप यांनी केले तर आभार हबिब शेख यांनी मानले