स्वाती बावणे महेशकर
नागपूर म्हणजे Tiger capital of India मात्र ज्या जिल्ह्यात सर्वात जास्त वाघ आहेत तो म्हणजे चंद्रपूर! चंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर मध्ये काम करताना आपण आपलं कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत उत्तमरित्या निभावत आहात. अतिक्रमण हटवताना बल्लारपूर क्षेत्रात सराईत गुन्हेगार आपण पायी पाठलाग करून पकडले. भद्रावती हे मानव वन्यजीव संघर्ष साठी अतिसंवेदनशील क्षेत्र आहे, येथे काम करत असताना आपण अनेक वन्यप्राणी बचावाचे कार्य केले. वाघ, बिबटे, अस्वल, हरीण इत्यादी. भद्रावती मधील 2 बिबट्या आणि 2 अस्वल प्रकरणी अटक केलेले गुन्हेगार ताब्यात असताना आरोपीच्या घरातील लोकांनी आपल्या कार्यालयावर अचानक उपस्थिती लावून गोंधळ केला व आरोपीला पळवून लावले, अश्या परिस्थितीत आपण मोठ्या शिताफीने पुढील तपास चालू ठेवला. वन्य प्राणी Rescue करत असताना अनेकदा लोकांचा रोष ही अनुभवला आहात तरीही आपण नेहमी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत आहात. आरोपींना गुन्ह्यात पकडणेच नाहीतर त्यांना कोर्टात सादर करून त्यांच्यावर योग्य कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणे ही आपण अत्यंत संयमाने करत आहात. अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत असताना आपण वन संरक्षण बाबत समाजात योग्य संदेश पोहोचण्याची जबाबदारी पार पाडत आहात.
भद्रावती परिक्षेत्रामध्ये काम करत असताना एकाच वेळी आपण 9 ट्रॅक्टर, लाखोंचा मुद्देमाल आणि गुन्हेगार पकडून पुढे योग्य ती कारवाई केली. पिंपरबोडी गावामधून सराईत गुन्हेगाराला पकडताना क्रिकेट मॅच लावण्याची आपली युक्ती अफलातूनच! ही व्यूहरचना यशस्वी पार पडली आणि आपण गुन्हेगार पकडले. बफर क्षेत्रातील अतिक्रमण काढताना लोकांशी आपला संपर्क योग्य होऊन अतिक्रमण काढणे यशस्वी पार पडले.
ताडोबा पर्यटन मध्ये आपण पार पाडत असलेली जबाबदारी स्थानिक लोकाना रोजगार मिळण्यास मदत करते. आदिवासी आणि जंगला लगतच्या लोकांच राहणीमान उंचावण्यास आपले कार्य नक्कीच उपयोगी पडत आहे. वन आणि वन्यजीव यांची काळजी घेताना अनेक अडचणींना सामोरे जाताना आपण एका वाघिणी सारखच लढत आहात.
आपली जिद्दी, सातत्य आणि मेहनत अशीच द्विगुणित होवो.
आज Exploring Womanhood Foundation चा वनदुर्गा सन्मान 2022 आपणास प्रधान करताना आम्हास अत्यंत आनंद होतो आहे.
आपल्या अभिनव कार्यास आमचा सलाम.
आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.
Exploring Womanhood Foundation
Nagpur, India
Website - www.exploringwomanhoodfoundation.com
Email id - exploringwomanhoodfoundation@gmail.com