Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १०, २०२३

झाडीबोलींच्या अस्सल कवितांमुळे रसिकात हास्यकल्लोळ Zadiboli



"तुझा हा बुळगा काहा असा करते...
कवंर सुदरल वं..
अन् जुन्या भदाळावानी एकदिवस भळाळनं वदरल वं..."




गडचिरोली (प्रतिनिधी) - झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात पार पडलेल्या कविसंमेलनात युवा कवी गुलाब मुळेच्या या झाडीबोली कवितेने रसिकांना पोटभरून हसविले. कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री प्रा. ज्योती कावळे होत्या तर कवी अरूण झगडकर , श्रीकांत धोटे, गझलकार मिलिंद उमरे म्हणून उपस्थित होते. या विदर्भस्तरीय काव्यसंमेलनान एकूण ५५ कवींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या बहारदार रचना सादर केल्यात .कवी उपेंद्र रोहणकर यांनी 'मोबाईल' कविता विनोदी पद्धतीने सादर करतांना...


"तसा मोबाईल चांगला नाही
पण आदत लागली हेंदळी
जवरून बोलणारी बायको
दुरून मेसेस धाडू लागली"

अशा ओळींने मोबाईलच्या दुष्परीणामाची सत्यता समाजापुढे मांडतात .
     तर कवी नंदू मसराम यांनी खेड्यातले लोक आता हौस कशी भागवतात हे मांडताना...
"बैल नाय तं पोरा कोटचा,कोटची आली दिवारी
नंदीबैल पुजावाचा भलता उरकून येते"
  या अस्सल झाडी शब्दात त्यांचा समाचार घेऊन हसवितात. अशा एकापेक्षा एक बहारदार रचना या मैफिलीत सादर करतांना कवींनी मनातील आशा,निराशा,चीड,प्रेम,उपहास,विडंबन दिलखुलास प्रगट केली.आणि नव्या जुन्या कवींनी या संमेलनात रसिकांची वाहवा मिळवली. 


  या काव्यमैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन कवी डॉ.प्रवीण किलनाके यांनी केले तर आभार संजीव बोरकर यांनी मानले. या कवीसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ.चंद्रकांत लेनगुरे,विनायक धानोरकर,कमलेश ,झाडे,मारोती आरेवार,जितेंद्र रायपुरे,वर्षा पडघन,प्रेमिला अलोने,मालती सेमले,पुरूषोत्तम ठाकरे,प्रमोद राऊत , वरून धोडरे , संकेत भजभुजे यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.