संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३१ डिसेंबर:-
नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील भिवखिडकी गावातील मार्तंड श्रावण कापगते यांचे शेतामध्ये गुरुवार दिनांक २९ डिसेंबर रोज शुक्रवारला ऊस पिकाची कापणी सुरू होती. दरम्यान सकाळी ११.०० वाजता ऊस तोडणी मजुरांना बिबट्याचे दोन बछडे उसाच्या शेतात आढळून आले. याबाबतची माहिती कापगते यांनी क्षेत्र सहाय्यक बाराभाटी यांना दिली. या माहितीवरून नवेगाव बांध स्थित शीघ्र कृती दलाचे पथक घटनास्थळी रवाना होऊन पाहणी केली. जवळपास मादी बिबट्याचे वास्तव्य आढळून आले नाही. यावरून वरिष्ठांचे व पशुवैद्यकीय डॉक्टरांचे मार्गदर्शनानुसार बिबट्याचे पिल्लांना सुरक्षित करण्यात आले. ऊस पिकाची कापणी त्वरित बंद करून, जवळपासच्या नागरिकांचा अडथळा होणार नाही.याबाबत वन कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली. बिबट्याचे शावकांना प्लास्टिक क्रेटमध्ये ठेवून निगराणीसाठी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले. मादी बिबट्याने निसर्गतः आपल्या शावकांना घेऊन जागा बदलावी,याकरिता कमीत कमी अडथळा येईल. याबाबत काळजी घेण्यात आली. रात्री अंदाजे ६.३० ते ७.०० वाजे दरम्यान मादी बिबट येऊन, आपले पिल्लांना तोंडामध्ये पकडून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.
सदर ठिकाणी दादा राऊत सहायक वनसंरक्षक नवेगावबांध, सचिन कटरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नवेगावबांध यांचे मार्गदर्शनात व उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. यामध्ये क्षेत्र सहाय्यक बाराभाटी करंजेकर, वनरक्षक रीना लांजेवार, शीघ्र कृती दलाचे मिथुन चव्हाण, सतीश शेंद्रे, अमोल चौबे, धकाते व इतर क्षेत्रीय वन कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी केली.
Gondia navegaon bandh