वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे.गेल्या आठवडाभरापासून वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.दरम्यान कोलार पिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा वाघ आज जेरबंद करण्यात आला. आज जेरबंद केलेल्या वाघाला नागपुरच्या #गोरेवाडा येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. tiger
यवतमाळ च्या वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. गेल्या आठवडाभरापासून #वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.
वणी तालुक्यात मागील पंधरवाडयात भुरकि (रांगणा) येथील अभय मोहन देउळकर व कोलेरा (पिंपरी) येथील रामदास जगन्नाथ पिदुरकर या दोन्ही व्यक्तीला नरभक्षी वाघाने ठार केले होते. त्याची गंभीर दखल घेउन खासदार बाळुभाउ धानोरकर यांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकरी, तहसिलदर वणी, वणी येथील विश्रामगृहात सकाळी 07.30 वाजता तातडीची बैठक लाउन सर्व अधिका-यांना धारेवर धरले. खासदार बाळू धानोरकर यांनी केलेल्या पाठपुरावानंतर या वाघाला जेरबंद करण्यात यश आले आहे. tiger
या परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती मरण पावले. लोक मरण पावल्यानंतर तुम्ही वाघाला पकडणार का? असा दम अधिका-यांना दिला. त्यात वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरात आस्टेलियन बाभळीचे जंगल मोठया प्रमाणात वाढल्यामुळे नरभक्षी वाघाचा वावर गेल्या दोन वर्षापासून या परिसरात आहे. ऑस्टेलियन बाभळी तात्काळ साफ करून परिसरातील रस्ते मोकळे करण्यात यावे. व तात्काळ वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावावे व वाघ जेरबंद करावा अशा सुचना बाळुभाउंनी संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. त्यात वाघाचा बंदोबस्त करत नसेल तर वेकोलिच्या अधिका-यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे अशी मागणी केली. त्यात प्रत्यक्ष दोनही गावात जाउन कुटुंबियाना मदत व सांत्वना केली. गावक-यांना धिर देउन तात्काळ समस्या मार्गी लावून वाघाला पकडण्यासाठी सर्व संबंधित वनविभाग तालुका प्रशासन वेकोलि प्रशासन व जिल्हा प्रशासन यांना सुचना दिल्या.
खासदार यांच्या सुचनेनंतर तेवढयाच वेगाने प्रशासनाने चक्र फिरविले व त्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद केले. त्यामुळे खासदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यामुळे तालुक्यातील जनता आभार मानत आहे.
tiger Wani #tiger #wildlife #animals #nature
दरम्यान #कोलारपिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा #वाघ आज जेरबंद करण्यात आला. याठिकाणी वेकोलीच्या कोळसा खाणी असून त्यांनी डम्पिंग वर लावलेल्या ऑस्ट्रेलियन बाभळीच्या जंगलात वाघांचा अधिवास वाढला आहे, हे वाघ मानवी वस्तीत येऊन मानवावर व पाळीव जनावरांवर हल्ले करू लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. झुडपी वृक्ष कापावे व वाघांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb