चंद्रपूर शहरातील बस स्थानक ते रेल्वे स्टेशन मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर अनेकांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहने लावण्यासाठी पार्किंगसाठी गैरसोय होऊ लागली. या विरोधात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. Removal of Encroachments
Railway Station, Bus Stand, Court Premises, Collectorate office
चंद्रपूर शहरातील काही महिलांनी रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची बाब निदर्शनास आणण्यासाठी हातात फलक घेऊन आंदोलन केले. बस स्थानक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पानठेले, फळ विक्रेते, हातगाडी यांची मोठ्या प्रमाणात येथे गर्दी असते. तेच अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश मुळे यांनी दिली.
रेल्वे स्थानक, बसस्थानक, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ही कारवाई वाहतूक शाखा, रामनगर पोलीस ठाणे, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महानगरपालिका यांच्या माध्यमातून करण्यात आली.
Traffic Police Branch, Ramnagar Police Station, Sub-Regional Transport Department, Municipal Corporation chandrapur.