चंद्रपूर: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्य जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत केंद्रस्तरापासून तर जिल्हा स्तरापर्यंत अश्या नाविण्यपूर्ण नवरत्न स्पर्धाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. उर्जानगर केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धांचे आयोजन नुकतेच जिल्हा परिषद शाळा दुर्गापूर इथे करण्यात आले. या स्पर्धेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या विविध स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, सिनाळा येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.
नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सिनाळाचे विद्यार्थी चमकले Chandrapur news
उच्च प्राथमिक गट (इयत्ता ६ ते ८) यामध्ये वादविवाद स्पर्धेत कु.वेदिका कुमरे (प्रथम क्रमांक), सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत वेदिका कुमरे (प्रथम क्रमांक), कथाकथन स्पर्धेत रिद्धी नरुले (प्रथम क्रमांक), स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत प्रीती दुर्गे (प्रथम क्रमांक), वादविवाद स्पर्धेत भारती दुर्गे (प्रथम क्रमांक), सुंदर हस्ताक्षर नभ मंडलवार (प्रथम क्रमांक),स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धेत प्रीती दुर्गे (प्रथम क्रमांक), स्मरणशक्ती स्पर्धेत अमृता दुर्गे (प्रथम क्रमांक) यांनी पटकाविला.
प्राथमिक गट (इयत्ता १ ते ५) यामध्ये कथाकथन स्पर्धेत गुंजन आयलंवार, एकपात्री अभिनय जिया झरकर, स्मरणशक्ती गुंजन आयलंवार, स्वयंस्फूर्त भाषण जिया झरकर या सर्व विद्यार्थ्यांनी नवरत्न स्पर्धेत शाळेचा बहुमान राखला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवरत्न स्पर्धेत विद्यार्थ्याच्या यशात मुध्याध्यापिका श्रीमती नीती रामटेके, सौ रेखा केसकर, श्रीमती. चौधरी, श्री प्रफुल दयालवार, श्री कोसनगोटुवार यांनी अथक परिश्रम घेतले.